श्रीवाहिनी बुधवार श्रीधर तिळवे नाईक
आरंभी : वॉर्निंगवजा फीलॉसॉफी : Good Warning मंडळी
आपल्या प्रज्ञेचा वास्तवाशी थेट संबंध येत नाही आपली इंद्रिये, आपला पूर्वानुभव अशा अनेक गोष्टी प्रज्ञा आणि वास्तव ह्यांच्या दरम्यान कलमडतात ज्याला आज आपण व्यक्ति म्हणतो ते अनेकदा अशा मध्येच कलमडणाऱ्या गोष्टींचे गाठोडे असते. वास्तविक व्यक्ति म्हणजे हे गाठोडे नव्हे तर ह्या गाठोड्याला बाजूला सारून त्या वास्तवाला थेट पाहणारी वा अनुभवणारी प्रज्ञा ! हे थेटपण हेच खरे साधन ! दुर्देवाने आपण ते आज गमावत चाललोय आणि संगणक, चॅनेल, इंटरनेट ह्या गोष्टी मात्र मध्येच कलमडणाऱ्या गाठोड्याला आता अनेक पटींनी मल्टीप्लाय करत ह्या थेटपणाच्या साधनालाच धोक्यात आणतायत
तेव्हा थोडक्यात काय
आमचे चॅनेल पहा ह्या न्यूज पहा
पण स्वतःचे थेटपण गमवू नका.
आजच्या ठळक बातम्या
मिडिआ इज नॉट डेड आणि जर तो मेलेलाच असेल तर त्याने मृत्यूनंतर नरकात पोहचून त्या नरकातून हे जग चालवण्याची कोशीश चालवली आहे अशी तिखट प्रतिक्रिया पत्रकार तरुण अधू ह्यांनी दिली. "मीडिया हा विनाकारण सेक्सी दिसण्याचा प्रयत्न करतोय वास्तविक त्याला असं सेक्सी दिसण्याची काहीही गरज नाही " असे ते म्हणाले. श्रीधर तिळवे ह्यांनी ही सर्वच घटना Semiotic किंवा Mediatic Thriller आहे आणि पत्रकारांनी प्रेक्षक उठून गेल्यावर सस्पेन्स दाखवण्याऐवजी आत्ताच काय तो सस्पेन्स दाखवावा असे आवाहन केले. हिंदुस्थानी पक्षाचे अध्यक्ष श्री नारायण ह्यांनी मी पैसे घेतले नसताना केवळ स्पेशल इफेक्टच्या सहाय्याने तसे ते घेतल्याचे दाखवून चॅनेल्सनी आपली बालबुद्धीच प्रकट केल्याचे सांगितले. ह्या घटनेमुळे भाजपचे माजी अध्यक्ष जीवदानी ह्यांनाही जीवदान मिळण्याची शक्यता मात्र त्यांनी फेटाळली एका रचित खोटेपणामुळे दुसऱ्या खऱ्यांचाविषयी शंका घेणे ह्यालाच विश्वसहिता धोक्यात येणे म्हणतात असं ते म्हणाले. विजयन ह्यांनी मात्र चिन्हांच्याशिवाय सत्य शोधण्याचा दुसरा कुठलाच मार्ग मानवजातीपुढे उपलब्द नसल्याने आणि चिन्हांना originality नसल्याने आयुष्याचा सरफेसपणा उघड करणाऱ्या अशा घटना भविष्यात वारंवार घडणे अटळ आहे असे सांगितले. शेवटी चिन्हे आणि भाषा बनवणारे आपणच तेव्हा सत्य आणि असत्य बनवणारेही आपणच तेव्हा भाषिक चक्रव्यूहात सापडून भाषेकडून मारले जाणे हे अटळच असे ते म्हणाले.
भाजप नेते हिरवाणी ह्यांनी बाबरी मशिद हा खरेतर कायद्याचा प्रश्न आहे वगैरे सर्व गोष्टी बकवास असल्याचे सांगितले हा खरेतर status चा हिंदूच्या status चा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. ह्या देशावर हजार वर्षे मुसलमानांनी राज्य केले होते पण ते संपले हे हिंदू कधीच सांगू शकले नाहीत ज्याप्रमाणे १५ ऑगस्ट १९४५ हा दिवस ब्रिटिशांचे राज्य संपल्याची निशाणी होता त्या प्रमाणे ६ डिसेंबर १९९२ हा दिवस हिंदुस्तानातील मुसलमानांचे हिंदुस्तानवरचे साम्राज्य पूर्ण संपलेले आहे हे सत्य सांगणारा दिवस होता दुर्दैवाने हिंदूना त्यांच्या गोष्टी कधीही नीट बोलता येत नाहीत त्यांच्या मनात एक असते आणि ते भलतंच काहीतरी बोलत असतात. मुसलमानांना हे ऐकणे जड जाते आहे. "आम्ही काहीही करू, कुठेही करू आणि कसेही करू हा जो तेराशे वर्षांचा त्यांचा गर्व आहे तो आम्ही धुळीस मिळवला आहे. आमच्या मुर्त्या जशा फोडल्या जाऊ शकतात तशा तुमच्या मशिदीही पाडल्या जाऊ शकतात एवढे लक्ष्यात ठेवा" असा हा मेसेज होता. मुसलमानांना तो बरोबर कळाला म्हणूनच त्यांची एवढी तिखट प्रतिक्रिया त्यानंतर आली. एक मशिद पाडली तर एवढे दुःख झाले होते मग इतरांची मंदिरे पाडली तेव्हा त्यांना किती दुःख झाले असेल ह्याची थोडीशी कल्पना ह्या घटनेवरून मुस्लिमांना आली असेलच. प्रत्येक वेळेला काळ हा जणू आमचाच आहे अशा थाटात जगणाऱ्या मुसलमानांना काळ आता त्यांचा राहिलेला नाही हे जितक्या लवकर कळेल तितक्या लवकर त्यांची प्रगती होईल असे ते म्हणाले. मुस्लीम जग एका भ्रमात जगत असून एकविसाव्या शतकात त्यांचा हा भ्रम तुटेल असे ते म्हणाले. मौलाना रिझवी ह्यांनी हिरवाणी ह्यांच्या ह्या वक्तव्याचा जाहिर निषेध करून सरकारने त्यांना अटक करावी अशी मागणी केली. नास्तिक नेते श्री चावकि ह्यांनी अस्तित्वात नसलेल्या ईश्वराच्या आधारे हे जे भांडण दोन धर्मात चालले आहे ते मानवजातीला हानीकारक आहे असे सांगितले. मानवजातीने लवकरात लवकर ईश्वर अस्तित्वात नाही हे सत्य स्विकारावे असे ते म्हणाले.
प्रिया नार्वेकर ह्यांनी "Soap Operas सत्य अस्तित्वात नाही हेच अंतिमतः सांगत असतात. त्यामुळे अस्तित्वात नसलेली सत्ये शोधून दाखवण्यात एकता कपूर ह्यांना प्रचंड यश मिळते आहे " असे सांगितले. अभिनेते एकतर अक्कलशून्य असतात किंवा mad तरी असतात असे त्या म्हणाल्या. माणसे सत्यावर श्रद्धा ठेवतात कारण सत्यावर श्रद्धा दाखवली नाही तर आपले अस्तित्व निराधार होईल अशी भीती त्यांना वाटते असं त्या म्हणाल्या जतीन नार्वेकर ह्यांनी मात्र कलेत सत्याचे काही काम नाही असे सांगितले Twin Tower वरचा attack हा आजही सौन्दर्यपूर्ण वाटतो असे ते म्हणाले. T. V. वर दाखवलेला हा शॉट माझ्या संपूर्ण आयुष्यात मी जेवढे शॉट पहिले त्यात Best होता. सुमंगला नार्वेकर ह्यांनी असे वाटणे हे सिनीक आहे असे सांगितले. "एखादी गोष्ट उध्वस्त होताना सुंदर दिसते " हा एक दुर्मिळ फिनॉमेना असल्याने ट्वीन टॉवरची घटना ही एकाच वेळी हृदयद्रावक व सुंदर अशी वाटते असे प्रकाश नार्वेकर म्हणाले. स्नेहल ह्यांनी मात्र त्या घटनेत सूडपूर्तीचे समाधानही काही जणांना लाभले असणार आहे सांगितले शेवटी जतीन नार्वेकर ह्यांनी Guilted Beauty- building असे ह्या घटनेला नाव घेऊन चर्चा संपवली.
प्रिया नार्वेकर ह्यांनी ह्या सर्व गोष्टीवर आपण अजूनही postmodernism च्या तावडीतून न सुटल्याचे हे लक्षण आहे अशी प्रतिक्रिया दिली Everybody in my generation wants to kill postmodernism but nobody knows where it's heart lies. असे त्या मराठीत म्हणाल्या. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रिया नार्वेकर व श्रीधर तिळव्यांच्यासारख्या लोकांनी खरेतर इंग्रजीतच लिहायला हवे हे लोक मराठीत का लिहतात अशी प्रतिक्रिया एका श्रोत्याने दिली त्यावर प्रिया नार्वेकर ह्यांनी मोबाईलवर बोलताना मराठीत बोलता ना असा प्रतिप्रश्न केला.
चुंबन घेतलेल्या जोडप्यावरून मुंबईत पडलेले दोन गट अधिकच जहाल झाले. चुंबनवादी लोकांनी ज्यांना स्वतःला प्रेम करता येत नाही आणि जे फक्त मनातल्या मनात मांड्या खातात अशा लोकांचा समूह म्हणजे हा उत्तरधार्मिक गट असल्याचे सांगितले त्याचे नेते सु. आ. शरीरे ह्यांनी हे सर्व मूळचे हिंसक तणावाचे मेकॅनिकल गुलाम लोक असल्याने सांगितले. ह्या गटाचे नेते श्री ज. कृ. उपाध्ये ह्यांनी रिक्तता मॅनेज न करता आलेले वियर्ड आणि चक्रम लोक म्हणजे हा ग्रुप असे भक्कमपणे सांगितले. जेष्ठ विचारसेनानी श्री. पाध्ये ह्यांनी शेवटी हृदय काय किंवा शरीर काय शेवटी प्रत्येकाच्या वाट्याला मृत्यू अटळच तो शेवटी सगळ्यांना पुरून उरणार आहे ह्याचे भान बाळगावे आणि ते प्रत्येकाने बाळगावे असे सांगितले तर तरुण विचारसेनानी श्री दयेंद्र नाईक ह्यांनी "ह्या निमित्ताने संपूर्ण मुंबई मनमोकळेपणाने हसली " ही मुंबईकरासाठी मोठी अचीवमेंट असल्याचे सांगितले.
चंद्रदेवबाबा आणि रवीबाबा ह्यांच्यात लंबकणाऱ्या काही भक्तांनी "बाबा लोकांना व त्यांच्या भक्तीला असं vibrator मोडवर ठेवू नये " असे आव्हान केले त्यावर रवीबाबा ह्यांनी " आपण जिथे असतो त्यापेक्षा कैकपटींनी आपण कित्तेक जागी नसतो हे भक्तांनी स्वीकारून आयुष्यात पेन्डूलम असणे स्विकारावे" असे आवाहन केले.
ज्योतिषांनीही रवीबाबांच्या म्हणण्याला पाठिंबा देऊन ज्योतिषशास्त्र हे जिथे आपण नसतो त्याचा जिथे आपण असतो त्यावर नेमका काय परिणाम होतो ते अभ्यासण्याचा प्रयत्न आहे असे सांगितले. विखरून पडलेला वारा एका श्वासात बांधायचा अशक्य प्रयत्न करणाऱ्या ज्योतिषांना उत्तेजन देण्याऐवजी लोक त्यांच्यावर बंदी घालायचा प्रयत्न करतात हे दुःखद आहे असे हे ज्योतिषी म्हणाले.
श्रीधर तिळवे ह्यांनी आज पुन्हा एकदा Postmodernism is dead अशी घोषणा दिली.
त्यांच्या मते पहिल्या महायुद्धानंतर हिटलरशाही, मुसलोनिशाही, स्टॅलिनशाही अश्या अनेक हुकूमशाह्या सत्तेवर येऊन विज्ञानाचा प्रचंड दुरुपयोग करताना ह्या पिढीने पहिल्या. ह्याचकाळात ब्रिटिश, फ्रेंच वगैरेंची त्यांच्या कॉलोनीजमध्ये जे काही केले ते कुठल्याही हिटलरपेक्षा कमी नव्हते. म्हणजे तथाकथित लोकशाह्या ह्या स्वतःखेरीज इतर देशात हिटलरच होत्या. त्यांनी other is hell असे न मानता other is heaven but I will create hell for it म्हणून ह्या कॉलनीजमध्ये स्वतःचे नरक निर्माण केले व ते करताना विज्ञान वापरले अमेरि केने जपानच्या सामान्य जनतेवर कसलाही विचार न करता अणुबॉम्ब टाकला कोणत्याच अर्थाने तो rational नव्हता आणि आजही अमेरिका इराक अफगाणिस्तानमध्ये जे काही करतीये ते हुकूमशाहीच आहे.
आता अशा भयावह वातावरणात कोणता शहाणा विज्ञान व सत्ता ह्यावर विश्वास ठेवेल ? दुर्दैवाने ह्याच हुकूमशाही कालखंडात हायझेनबर्गने प्रिन्सीपल ऑफ अनसर्टनटी सांगितले आणि विज्ञान अंतिम व निश्चित असे काही सांगेल ह्यावरचा विश्वास उडाला. Empericism वर कांटने पहिला घाला घातलाच होता आता हा दुसरा घाला होता पहिल्या घालाने विज्ञानावरची श्रद्धा घालवली व आधुनिकवाद जन्माला घातला तर दुसऱ्याने विज्ञानावरचा विश्वासही उडवला. विज्ञानावरची उडालेली श्रद्धा आणि त्यावेळी प्रतिसृष्टीय तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या अभूतपूर्व वस्तू ह्यातूनच निर्मिकाच्या निर्मितीविषयीचा विश्वास वाढवला व अंतिम सत्याबाबत संशयही निर्माण केला ह्या दोन्ही गोष्टी उराशी बाळगत ह्या लोकांनी नवीन संरचना निर्माण केल्या ह्या संरचनेतील घटक सृष्टीय विज्ञानासारखे निश्चित नव्हते तर ते काहीसे उस्फूर्त व arbitary होते. ह्या संरचनेत एकच घटक स्थिर होता तो म्हणजे संरचक उस्फूर्त संरचक आणि arbitary संरचन ह्यातून जन्मलेल्या ह्या संरचना आधुनिक माणसाची सगळी anxiety व्यक्त करत होत्या हायझेनबर्गने ह्या सगळ्याच संरचनावादाला छेद दिला अणु हा closed Text होता पण तो फुटला आणि अणु हाही open text असल्याचे स्पष्ट झाले. पुढे हायझेनबर्गने अणूचे open text हे कसेही व irrational वागणारे आहे असे सांगितले त्यातून subject वरचा विश्वास उडणे अटळ होते. प्रकाश हा closed कणांनी बनलेला होता पण तो wave रूपात असल्याचे कळाल्यावर open text झाला Relativity च्या सिध्दांताने तर objectivity मोडीत काढली. ह्या सगळ्यातून सगळेच अनिश्चित झाले. सत्य आणि सत्ता ह्या दोन्ही अशा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या. Postmodernism हा ह्या संशयाचाच अविष्कार आहे.
ईश्वरावरची श्रद्धा आणि संशय ह्यांच्या फेऱ्यात सापडत नव्याने सापडलेल्या विज्ञानाचा उत्सव साजरा करायचा की नाही ह्या आवर्तात सापडत मानवजातीने आख्खे क्षेत्रिय युग वाया घालवले मग विज्ञानावरील श्रद्धा आणि संशय ह्यांच्या फेऱ्यात सापडत नव्याने सापडलेल्या तंत्रज्ञानाचा उत्सव साजरा की नाही ह्या आवर्तात सापडत मानवजातीने आख्खे विशिय युग वाया घालवले आणि आता चिन्हीय युग आपल्यासमोर उभे ठाकले आहे तंत्रज्ञानावरील श्रद्धा आणि संशय ह्यांच्या विलक्षण भोवऱ्यात आपण सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. धर्मयुगाचे मंत्र अध्यात्मयुगाचे trkntr विज्ञानयुगाचे यंत्र तंत्रज्ञानयुगाचे तंत्र आणि चिन्हयुगाचे जंत्र हे सर्वच घेऊन आपण एकविसाव्या शतकात दाखल होतो आहे अशावेळी नव्याने सापडलेले इंटरनेट, कम्प्युटर ह्यांचा निदान मुक्त उत्सव आपण साजरं करावा हे करायचे असेल तर हे postmodernism चे भूत आपण जितक्या लवकर आपल्या मानगुटीवरून उतरवू तितके बरे ! जग , विश्व , सृष्टी, प्रतिसृष्टी आणि चिन्हसृष्टी ह्यांचे प्रत्येकाचे आधारभूत सत्य आहे. ह्या सर्वांचे celebration करायचे की ह्यांच्या नावाने आपापसात भांडत, चिंताग्रस्त होऊन आयुष्य घालवायचे हे ज्याने त्याने ठरवायचे आहे असे ते म्हणाले.
FASHION- SHOPPING- KITCHEN
FASHION SHOW मधून
तुझ्या कंबरेला कोणतं वळण लावू ? इनस्विंग ठेवू की आऊट स्विंग? स्किनीफिकेशन अटळ आहे पोरी! ते किंवा क्रूसिफिकेशन ! जी मॉडेल त्वचाळत नाही ती मॉड नाही . स्कीनफ्लेशनचा डेंजर वारा मादक वाटतो पण साधक हो . ह्या हवेत आयुष्याचा लेझर माऊस भटकता ठेव पापण्यांच्या आसपास ! अन्यथा त्यांच्या पिपाण्या करून निघून जाईल तुझ्या काळजातली अनकॉन्शस सेक्सडॉल !
दिसतं तसंच असतं
तिथंच करिअर वसतं
हे लवबॉम्बिंग नाही हा आहे डिरेक्टरचा सावधसोहळा ! माझा प्रत्येक क्षण कॅरमबॉलसारखा उगवतो पोरी ! माझं रक्त डीझेल हायड्रॉलिकसारखं धावतं बाईपुढे बोलताना ! ही घाई नाही . ही आहे वाळवंटात सापडलेल्या बंगाली टायगरला आमूर टायगर बनवण्याची खेळी !तात्पुरत्या बदलांचा हा प्रकाशझोत कॅटवॉक करताना उपयोगी पडेल ओ भीगी बिल्ली! परम पाद सोपान पतम पतंग उडवत जा कपड्यांचे ऑडियन्सच्या आकाशडोळ्यात.
जा आणि सर्वांना खड्यात घाल
सर्वांगाने
***
लव ऑपेरा इन रुईया कॉलेज
मी व्यास झालो तरी
द्रौपदीची पाच पतीपासून सुटका झाली नसती
तू गार्गी असतीस तर
वेदच शिकावे लागले असते
तर मी व्यास होत नाही
तूही गार्गी होऊ नकोस
त्यापेक्षा द्रौपदीची पाच पतीपासून मी सुटका करतो
तू वेद पाठ करायला नकार दे
आता बघ
व्यास आंबेडकरांच्या बरोबर बुद्ध डिस्कस करतायत
आणि
गार्गी गेम थेरी शिकवत आयुष्य टाईप करतीये
मात्र हे आता नको विचारू
व्यास आणि गार्गी ह्यांच्यादरम्यान काय होईल ?
कदाचित ते आपल्याप्रमाणेच एकमेकाच्या प्रेमात पडतील
किंवा कदाचित त्यांनाही
एकमेकाचं काय करायचं हे कळणार नाही.
***
शंभर बहाण्यांचा रच डाव
फेक रमीतील फेक दिलफेक पत्ते
सकाळचं दूध संध्याकाळी ताक होईपर्यंत
प्रतिक्षा करव
दहा वाजता अकरा वाजता बारा वाजता
दहा काट्यांच्या घड्याळात वेगवेगळ्या मुद्रा धारण कर
जॉब धर जॉब सोड जॉब मुठीत पकड मूठ मार बॉसवर
रच शंभर डाव
फेक दिलफेक पत्ते
संध्याकाळी प्रतीक्षा
दहा वाजता मुद्रा धारण कर
जॉब मुठीत पकड मार बॉसवर
रच फेक पत्ते
संध्याकाळी मुद्रा धारण कर
जॉब मार बॉसवर
फेक मुद्रा धारण कर
संध्याकाळी मार
फेक संध्याकाळी
मार
फेक मार
फेक
***
पाण्यात पाहिलं तर सोमवार होता
कॅमेऱ्यात पाहिलं तर मंगळवार
चित्रात पाहिलं तर बुधवार होता
फोटोत पाहिलं तर गुरुवार
कवितेत पाहिलं तर शुक्रवार होता
आरश्यात पाहिलं तर होता शनीवार
कंटाळून पाहिलं तर सर्वत्र रवीवार
आणि स्वतःत पाहिलं तर काळच नव्हता
शेवटी
तुझ्या डोळ्यात पाहिलं तर सुट्टी होती
आणि तू डोळे मिटलेस तेव्हा सुरु झाला
माझ्या जगाचा अंत
तुझ्या जगाची सुरवात
***
कॉलेज युथ कट्टा
टर्रटर्र फाड
कर्रकर्र ताजा हो
खर्रखर्र खरखर
गुर्रगुर्र फिर
तर्र्तर्र झिंग
झर्र्रझर्र्र चाल
चर्रचर्र सोस
छर्र्रछर्र्र भेद
जर्रजर्र निसर्ग
फुर्रफुर्र थंडव
पर्रपर्र पाद
बर्रबर्र शोध
भर्रभर्र उलट
मर्रमर्र काम कर
सर्रसर्र निघ
डुर्रडुर्र संपात
हर्रहर्र ध्यान कर
ठर्रठर्र ठराव
डर्रडर्र घाबर
इर्रइर्र इंटरनेटव
नर्रनर्र नाट लाव
हुर्रहुर्र हुसकाव
आर्रआर्र आयकॉनव
ब्रर्रब्रर्र बोल
फर्रफर्र फोन
घुर्रघुर्र न्याहाळ
ओर्रओर्र चॅट
टूर्रटूर्र प्रवास
ठुर्रठुर्र ठोक
यर्रयर्र गुगल
लर्रलर्र लवर
शर्रशर्र सही कर
उर्रउर्र धपाप
षर्रषर्र पोटव
ळर्रळर्र वळव
ज्ञर्रज्ञर्र ज्ञानव
क्षर्रक्षर्र क्षारव
गुर्रगुर्र कबूतर
घोर्रघोर्र झोपी जा
भुर्रभुर्र उडून जा
ह्या काऊचिऊच्या गोष्टीतून
प्रत्यक्ष चिमण्यांच्याकडे
मोबाईलची रेंज पोहचत नाही अशा प्रदेशात
जिथे त्या तुझी वाट पाहतायत
***
क्रीडा sports
चल पुन्हा सुरु करू एक नवा पिकअप एक नवी इनिंग
न सरावलेली पण जिच्यासाठी सराव केला होता
न ठरलेली पण जिच्यासाठी ठराव केला होता
डोक्यापासून पायापर्यंत
काळाचं काय ? Time is itself tragedy of timeless
तो धावा जमवतो तो धावा चिरडतो
ह्या मैदानावरून तो त्रयस्थासारखा पुढच्या मैदानाकडे वळेल
आपल्या पायात त्याचे गोळे येतील
पण तो कापसाच्या बोळ्याइतक्या सहजतेने निघून जाईल
पण तरीही ..... चल
शतक होईल न होईल
विजयी होऊ न होऊ
पण प्रयत्न सेलिब्रेट करू
चल
जरी समोर माझा मृत्यू वाहे
इथे ह्याक्षणी मी आहे मी आहे
मागच्या इनिंगचं फर्निचर हटव
स्वतःला स्वतः नव्याने भेटव
बॅट कम्फरटेबली पकड
कम्फरटेबल बॅट पकड
हात हलके कर वजनदार शॉटसाठी
धावा दगडासारख्या जड असतात
धावा नर्तकासारख्या चपळ असतात
धावा अलंकारिक चकाचक असतात
धावा चमचम असतात
आपण प्रत्येकीपुढं कोर्टींग करू चल
आनंद
जो मरून गेलाय मैदानात
अजूनही वाट पाहतोय
चल मृत्यू धावात गोळा करून त्याला जिवंत करू
चल
घे खोल श्वास
मैदानभर पसरतोय नव्या ओपनिंगचा सुवास
चल
अत्तरात अडकून न पडता
***
लव ऑपेरा इन जे एस हॉल
***
सिनेमा
^^^^^
सॉंग्ज अँड पोएम्स
१.
सर्वत्र माणसे
स्वतःला नष्ट करतायत
त्यांना हरायला जागा मिळावी म्हणून
मी कविता लिहतोय
मी ती अस्तित्वात आहेत
ह्याचा पुरावा लिहितोय.
***
२
जो अलग है वो गलत है
जो सही है वो दही है
प्रत्येक फुटावर फुटेज खाणारा हा नार्सिसीस्ट खेळ आसपास विखुरलेला अभिनयाची दिवाळी साजरी करत स्वतःत सक्रांत सोसणे उफ ये लाई गे आहेस तर गे रहा मित्रा
मी हेट्रोसेक्चुअल आहे तरी माझा तुला पाठींबा आहे
मात्र गे होणे ही साथ आहे हा तुझा दावा मला अमान्य दादागिरी बहुसंख्याकांची असो वा अल्पसंख्याकांची मला अमान्य Bad Boss होऊ नकोस हे बॉक्समध्ये अलंकारिक जगणे युनिवर्सल नाही केबीन म्हणजे सेक्युअल सत्ता नाही तुझ्या श्वासांची रिऍलिटी ही माझ्या फुफ्फुसाहून नाहीये वेगळी तुझ्या रक्ताचा ह्रिदम माझ्या हृदयापेक्षा नाही आगळा पण लिंगाच्या खाजगी जागा वेगळी वेगळी खाज मागतात त्याला मी काय करू ? मला पुरुष attract करत नाही त्याला मी काय करू ? लैंगिकतेच्या इलाक्यातील भय मायाळू असतं तसं पायाळूही असतं तेव्हा हा माझ्या चेहऱ्यावर रोखलेला पाय होल्ड कर गे असणे म्हणजे फार क्रांति कारक वगैरे बाळबोध लिंगसमज माझ्याजवळ नाहीयेत मी मला जसा परवडतो तसाच असतो मॅसीव कनफ्युजनचा तुझ्या चेहऱ्यावरचा हा पिसारा स्वतःत वाकून बघ आणि सोड मला वाऱ्यावर
माझ्या हेट्रोसेक्सुअल हवेत.
माझा श्वास घ्यायला.
***
Desire is the error in creativity
पर क्या करे
creativity has the desire for reality
कम्बख्त
Reality is a Myth
Good यार
We assume Quyamat & it happens
झुमरी तलैय्या
था था थैय्या
या खुदा !
ना
ये खुदा खुदको कितना बुलन्द करू ?
ना
ये, खुदको कितना बुलन्द करू ?
ना
कितना बुलन्द ?
ना
कितना बुन्द ?
ना
बुन्द ?
ना
बुन ?
ना
बू ?
Correct
***
सिनेमा
**********
Songs and Poems
लोक लोकांच्याच प्रेमात इतके मशगुल आहेत
की त्यांना त्यांच्या एकांताचा शोध पुन्हा लागायला
थोडा वेळ लागेल
पण मला खात्री आहे की
ह्या गर्दीतला प्रत्येक माणूस
कधी ना कधी स्वतःच्या एकांताकडे वळेल
तिथे मग त्याला स्वतःचा खोलात जाऊन
शोध घ्यावासा वाटेल
त्याच्या त्या शोधाच्या आरंभी
मी माझ्या कलाकृती ठेवून दिलेत
कदाचित त्या त्याला शोध घ्यायला मदत करतील
कदाचित त्या त्याला सांगतील
त्याचा एकांत माझा एकांत
वेगळे आहेत
तो वेगळ्या कलावंताचे वेगळे एकांत चाचपेल
त्याला कदाचित त्यांच्यात त्याच्या एकांतासारखा एकांत मिळेल
मला त्याचा आनंदच आहे
आणि मला खात्री आहे
की ह्या जगात जे माझ्यासारखे आहेत
तेही माझ्यासारखेच त्यांच्या कलाकृती निर्माण करून
त्याची वाट पाहतायत
तो येईल
आम्ही सर्वच वाट पाहतोय
आपल्या आपल्या जागी
आमच्या एकांताच्या वधाची
एकांत जो लोकात बसूनच लिहिला गेला होता.
......................................................................................................................................................................................................................................................................................................................................
मी बोलतोय मी मोबाईल आहे म्हणून बोलतोय मी इंटरनेट आहे म्हणून बकतोय माझ्यातला मेल इमेल होत चाललाय स्क्रीनवर ई-मेसेज फडफडतायत त्यांच्या आवाजातून मी बोलत सुटलोय I have thousand e-tongue to shake hand I have one ehand to shake thousand tongues खुलं जा सीम सीम म्हणत मी सीम कार्डच्या गुहा बदलत खोलतोय- बोलतोय मी भाषिक डेसिबल्स Hot & cold करत बोलतोय टल्ली भाषेचा मिल्क शेक उडवतोय माझ्यातून हजारो झल्ली कारंजी शब्दात बदकं पोहतायत मेसेजमध्ये राजहंस पोहतायत एमएमएसमध्ये कावळे पोहतायत फक्त चिमण्याच दिसत नाहीयेत त्या माझ्या मोबाईलमुळे उडून गेल्या काय? की माझ्या मोबाईल टॉवरने त्यांचा चारा पळवून न्हेला ? त्याच्या पिलांचा मी ई-खुनी आहे ? चिमण्यांनो कुठे आहात ? माझा मोबाईल तुमचं अन्न का तयार करू शकत नाहीये आणि तुम्ही परत फिरायला तयार नाही? मी मिसकॉल देतोय तुमचे रिकामे घरटे पहात आणि तुमचा रिप्लाय नाही. मी तुम्हाला मिस्प्लेस केलं काय ? की मोबाईलधारी हाच ह्या सृष्टीतील रॉंग नंबर आहे ?
e - नसलेल्या चिमण्यांनो बोला
मी बोलतोय
आणि ऐकायला चिमण्या नेटवर्क रेंजमध्ये नाहीयेत
आता सर्व ठीक होईल
मोबाईल सर्व ओके करतील
शब्द हरवणार नाहीत
व्यवस्थित पोहचतील
हरवले तर रेकॉर्ड रूममध्ये सापडतील
माणसे ठीक होतील
भाषा ठीक होतील
O: K होईल बिलकूल ठीक
देर आये मगर दुरुस्त मोबाईल आये
ठीक ठाकठीक एकदम ......
।। बेचाळिसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
सर्वत्र
माणसांच्यावर ट्रक घालून - त्यांना सपाट करत
ज्याच्यावर लिहलय
Horn O.K. Please
आता आज नाहीतर उद्या
।।त्रेचाळिसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
त्यांचा आवाज माझ्या काळजात प्रेग्नंट होतोय
मला ते मान्य नाही
माझे हात कानावर हात ठेवून ओरडतायत
"नाही "
गर्भ फिक्स झालाय पण रक्त लोकेशन बदलतय
मी गाडी चालवता चालवता
एफ एम ऐकता ऐकताच
बहुधा बाळंत होईन
।।चव्वेचाळीसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
फोकस डीकंस्ट्रक्ट होत
भाषा चालू ठेवतोय
त्याला त्याची गद्दारी फील होतीये
एका सुरा - भाषेत Hidden
सर्व कनेक्ट करतोय
।।पंचेचाळिसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
ह्याचा अर्थ असा नाही की
माणसं बोलत नाहीयेत
पण माणसं मोबाईलवरून बोलतायत
आणि मोबाईल बोलतायत
ह्या दोन वाक्यात फरकय
जसा की
श्रीधर तिळवे कविता लिहितो
आणि कवी श्रीधर तिळवे कविता लिहितो
ह्या दोन वाक्यात फरकय
मी डोळे बंद करून झोपेत जातोय
मी डोळे बंद करून झोपी जातोय
मी डोळे बंद करून झोपेत चालत जातोय
।।छेचाळिसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
मला ते समजायला
आयुष्याची तीस वर्षे लागणार आहेत
।। सत्तेचाळिसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
ते बोलणाऱ्या माणसाचं प्रतिनिधित्व करत नाहीयेत
ते माणसांच्या बोलण्याचंही प्रतिनिधित्व करत नाहीयेत
ते फक्त मत तयार करतायत
किंवा असं म्हणता येईल
तयार झालेलं मत मांडतायत
किंवा असंही म्हणता येईल
की ते बोलून
स्वतःचं मत काय आहे
ह्याचा अंदाज घेतायत
किंवा ते आपल्याविषयी दुसऱ्याचं मत काय आहे
ह्याचा अंदाज घेतायत
मोबाईलची बॉडी लँग्वेज होतीये
आणि मोबाईल दर पल्सला स्क्रीन बदलत
माणसाचा गेस्ट अपिरियन्स धारण करत
नटांसारखे धोरणी बोलतायत
।। अठ्ठेचाळिसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
गेस्ट किंवा
घोस्ट किंवा
गोष्ट किंवा
गोश्त
।। एकोणपन्नासावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
चड्डीत
जंगल जंगल पता चला है
चड्डी पाहणके फूल खिला है
।। पन्नासावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
गोल्डन ज्युबिली
***
वर्कप्लेस फेस टू फेस
कार्पोरेट कल्चर उराशी घेऊन चौघेजण बोलतायत एकमेकातल्या बेडशी चौघांनाही अंदाज येत नाहीये बाई
ग्लोबल आहे की लोकल
नागडी आहे की कापडी
वेश्या आहे की विश्य
प्रत्येकाचं काळीज टोलजंग मनोरा बांधतय जो कळत नाहीये
झुलता आहे की कलता
पिसाचा आहे की पैश्याचा.
प्रत्येकाला माहीत आहे की समोरचा समलिंगी आहे पण हे स्पष्टच होत नाहीये की जो समोर आहे. तो
मिसप्लेस्ड पुरुष आहे की मिसप्लेस्ड स्त्री
प्रत्येकाला ओरडून सांगायचय की तो समलिंगी आहे पण कुणालाच कळत नाहीये हे बोलणे
मिसप्ले होईल की डिसप्ले
प्रत्येकजण नजर रोखून आहे
प्रत्येकाचा डोळा ओशाळलेला
टेबल टकामका पाहतय संगमरवरी अंगाने प्रत्येकाचे नाक जे कळत नाही
श्वासात बुडालय की वासात
चहा कपातून उठून हवेत चाललाय त्याला कळत नाहीये त्याचा चॉईस
कप की हवा
चेअर्स सहन करतायत मानवासन जे कळत नाहीये
बलात्कार आहे की प्रीती
सगळं कसं गोंधळलय अनिश्चित लिंगचाचणी आणि चाचपणीत
आणि पृथ्वी हा सगळा गोधळ निमूट सोसत
स्वतःला प्राप्त होणारं नपुंसकलिंगत्व
आउट होतीये.
***
लव ऑपेरा इन दहिसर ३
ज्यांना मृतांनी खाऊन टाकलंय
त्यांच भक्ष्य होण्याची माझी तयारी नाहीये
अनिरुद्ध काय आणि आठवले काय ?
एका rational impulse नं तू त्यांना जाऊन भेटतीयेस
आणि परततीयेस ते घेऊन
जे मृत आहे
मी फोन उसना घेतला म्हणून संतपणारी तू
आता काय काय उसनं घेतीयेस
की मी घेतला तर ओझं
तू घेतलास की पतंग ?
Double coding चा हा डबल क्रॉसिंग फ्लॅश
वारवांर दूखावतोय माझ्या रक्ताला फ्लशमध्ये
तुझ्यामुळे गरम होणाऱ्या नसेत
तुझ्या politics ला माफ करेल असं प्रेम तुला हवं आहे
आणि मी ते देऊनही
अंतिमतः तू त्या प्रेमाचं crystallization च करणार ह्या शंकेने अस्वस्थ
मशिदीत बसून फतवे काढणारे
आणि स्वतःची वेळ आली की त्यांची मन मुरगळणारे इमाम
आणि तू
ह्यांच्यात काय फरकय ?
तुझ्यापुढे आरसा धरला तर तू चेहरा फोडण्याचाच मागे लागणार
मिळाला तर माझा
नाही मिळाला तर स्वतःचा
एक Bluff master गिळत चाललाय माझा तुझा आदिम वास
आणि एक जंगल निर्माण करू पाहणारी वनस्पती
under observation
छोटी छोटी होत शेवटी मायक्रोस्कोपखाली श्वास घेत
फ्रीज्ड झालेल्या ओठांवर मी खेळवतोय कीस
आणि तुला आलेला कंटाळा बर्फात जांभई देतोय
किस द्यायचा नसला की बायका नसलेल्या गोष्टी शोधून किस पाडतात
तू अखंड संतापत स्वतःचच रक्त फाडतीयेस
आणि मी कागदी बोटी सोडत
त्यातून पार
मला गोष्टी जशा माझ्या टेबलवरून दिसतात
तशा तुला तुझ्या टेबलावरून दिसत नाहीत
अशावेळी टेबलावर येऊनही
वाटाघाटी काय होणार ?
कारण कुठलंही टेबल निवडलं तरी
ते एकतर तुझं
किंवा माझं
दोघांपासून बनलेलं टेबल कुठून आणू हे टेबलीके
तेव्हा उबव खुर्ची
आणि ज्या आधीच मृत झाल्याने तुला सर्वशक्तिमान समजतात
अशा आणखी काही खुर्च्यांना जन्म दे.
***
FACE TO FACE
***
डेथबेडवरची स्वगते
भर चाळिशीतही ज्याचा स्ट्रगल संपत नाही त्याने चाळी पाडल्या काय किंवा बांधल्या काय ? एन्थुसियझमची सियासत संपुष्टात येऊन आता त्याचं फक्त अँथम वाजतय हे तर स्पष्टच दिसतंय अपयशाच्या कारणमीमांसेत पहिला चेहरा आपल्या अहंकाराचा दुसरा आपल्या टॅलन्टची भीती वाटणाऱ्या पाट्याटाकू रोजनदारांचा आणि तिसरा सवतीमत्सराच्या चाबुकाचा आपण पोहचण्याआधीच पोहचल्या आपल्या विषयीच्या अफवा हवा स्पीन करायला गेलो तर श्वासांची बोटे जखमी मूळ स्टोरीज ऐकवल्या तर लोक म्हणाले ह्याची हॉलिवूड सीडी कुठली ? चोऱ्या करायची सवय झालेले हात आपले ओरिजनॅलिटीची डिमांड करणारे नशिब लिहित राहिले आणि आपण आपली क्रिएटीव्हीटीची खाज रायटर्स असोसियेशनमध्ये जाऊन फक्त रजिस्टर करत राहिलो.
एक लगान आली तर त्याचे टायटलक्रेडीट बळकावून माजला एक मराठी गुडघा आणि आपण माधवराव पेशव्यांच्या दरबारी मुजरा का प्रस्तुत केला नाही अशी विचारणा करणारा फतवा काढला इंडस्ट्रीने. आपली सचोटी पूर्णच पराभूत झाली. दोस्तांच्या गैरवापरनाम्यात आणि त्यांनी यशासाठी आपापसात केलेले तह पाहून वाटाघाटीच्या टेबलाखालून निमूटपणे निघून गेली. आपली बॉडी आपल्या परमिशनची वाट न पाहता.
आईला एक साधं सुखाचं लुगडं पुरवू शकले नाहीत आपले हात केवळ दोनचार दिवसांच्या भेटीत फॅमिली सेटिंग करून आपण टाकत राहिलो ह्या महानगरावर आपल्या चिन्हसृष्टीचं अनेकदंतीय जाल पण आपल्या वाट्याला आली फक्त कॉस्मॉपॉलिटीन हवा
कुणास ठाऊक आपल्यासारखे किती आले ह्या ग्लॅमरयुगीन फिल्म्शैलीत स्वतःची सही घेऊन पण ऑनलाईन फेक आयडेंटिटीने सवांचीच जिर व ली मान
आता ही छाती पिचलेली म्हणायचेही त्राण उरलेलं नाही आपल्या फुफ्फुसात आता फक्त जेल पेन विकत घ्यायचे ह्या इनजेलसिटीत आणि इनव्हिजिबल रहात पहात बसायची सक्सेलफूल माणसाच्या कव्हरस्टोरींची मुखपृष्ठ
हे तसं बरंच की आपला जन्म मलपृष्ठावर झाला ह्या संस्कृतीच्या
हे तसं बरंच की आपण जन्मलो तेव्हा आपल्या आईबापांच्या आकाशगंगी सक्सेस नावाचा तारा नव्हता
हेही तसं बरंच की आपल्याआधीच्या आपल्या बारा पिढ्या मातीतच वारल्या होत्या आणि आपल्या जन्ममूठीतून उठून गेली होती हिरवी शाई
आता हे इथं असं स्वतःचं प्रेत दहन होताना पाहताना थोडं व्याकूळतय आत काहीतरी.
मित्रांनो, चाललो बाबांनो
पण जाताना ती राख नीट गाडा किंवा फेका पाण्यात चुकुन धुगधुगली तर नवं टॅलेन्ट घेऊन उगवेल आणि फळं मोडता मोजता तुमची बरगडी मोडेल
मेल्यानंतर टँलेन्टेड माणसं आधीक बदतमीज होतात असं म्हणतात म्हणून सांगतोय.
थोडं स्पिरिच्युअल
भोवळ येऊ न देता मी चाललोय एका गॅजेटीग रोलर कोस्टरमधून लाथ मारेन तिथे पाणी काढेन म्हणणारा पाय अचंबित पाऊल पडेल तिथे गॅजेट उगवताना पाहून माझे डोळे थेट CACNA 1A मधून प्रक्षेपित होतायत familial hemiplegic migrane ची संध्याकाळ सर्व शरीरभर पसरलेली ह्या गॅजेट्स मला फाडून खायच्याही आहेत आणि पचवायच्याही आहेत डिप्रेशनचे करडे फुल आणि त्याचा अगतिक गंध टेक्नॉलॉजी इनिशियेट करणारे हात गुलाब घेऊन येतायत मला कळत नाहीये माझी कबर झालीये की खबर ? नेसेसरी चा
नार्सिसिझम आरश्यात आणि माझा टेक्नोफेस त्यात फेशियल करत migraine सांभाळत.
भोवळ येतीये पण ती सांभाळत मी निघालोय मॉलचा दरवाजा ओलांडून सूर्यास्ताच्या दिशेनं
एक सौन्दर्य लालचुटुक ओठांनी मावळतय आसपासच्या बायकांच्या लिपस्टीकच्या कांड्या कडाकड मोडत निसर्गदत्त
फोटो घ्यावा की हा सूर्य तसाच सोडावा ?
पझेसिवनेसचा डिजिटल कोपरा ढुश्या मारतोय हातातील डिजिटल कॅमेऱ्याला !
सगळं कॅमेऱ्यात कैद करणारा तुरुंगाधिकारी उगवतोय भोवळ हलतीये मी बीचवर थोडासा भेलकांडतोय
हा क्षण जगावा की हा क्षण शूट करावा ?
मोबाईल बीप करत नाहीये नेटवर्क गायब
ही रात्र आता विदाऊट टेक्सट आणि मेसेजशिवाय
गॅजेट्स मरत चाललेत सूर्य मावळत चाललाय मी जो भोवळत चाललोय migraine दुरुस्त करत निरोप देतोय- मलाच - जो ऍडिक्ट होऊन मॉलमधून बाहेर पडला होता. डिजिकॅमची बॅटरी संपत चाललीये
लाटा वाजतायत सूर्याला निरोप देत
" ह्या क्षणी हा सूर्य जगण्यासाठी मला फक्त डोळे आणि कान
आवश्यक आहेत "
मी - सू र्या स्त - ज ग तो य
मी सूर्य जगतोय
चेक कर शेवट

पेन्टींगमध्ये थांबलेली रियॅलिटी
मोडून काढ
चित्रपटातील दिसेनाशी झालेली गतिमानता
मोडून काढ
टीव्हीतील चॉकलेट्स आणि केक वाटणारी बाळबोधता
मोडून काढ
ह्यांच्यापुढे मोडून पडण्यापेक्षा
ह्यांनाच मोडीत काढलेल बरं
तर
किती चिल्लर हाताशी लागली
युग मोडून
***
मुलाकात
An interview with an educationist
S: Why don't you resign your post ?
E: You mean Postmodernism
S: Postmodernism is dead !
E: But our student have to learn it ?
S:Why we teach dead things ?
E: Only dead things can be educated ?
S: To give education means to teach how to live
E: All things ultimately reach to textbooks
S: Postmodernism is outspaced in India. We should provide them an
alternative
E: An alternative to dead things ? Contradictory to your initial
things!
S: Yea ! Agree !
E: We should apply this new system in Indian education
system
S: Message ?
E: Approach !
S: Concrete ?
E: Multi formal
S: What do you mean ?
E: Brick by brick, Construction.
S: But today we are weaving brick to brick meganets
E: Why are you texting expiry date ऑफ postmodernism
S: To kill it. It's the only way to make it out of date.
E: Fashionable murders don't stand in textbook of history
S: History is dead. It's the time of post nets.
E: Education is always posthings
S: Is it state of mind ?
E: Yes. Mind setup. production of mind set up !
S: Internet is new grand narrative or i can say grandnettive or I
can say grandnettive which is open & yet live. We should teach it.
E: How can we get teachers for it ? Internet can't teach
Internet
S: Internet can teach Internet
E:You mean techeducation ?
S:Not only tech but techview
E:But it can be fake
S:All educational systems are right now fake.
E:It's bold statement. I can't take it.
S:Then leave it.
E:OK. I am leaving.
S: I don't mean program
E: भाडमे जा Bhadmein Ja !
Regular Internet
The world is sold
out In
words
or may be
actually
Who knows
Laden
is more powerful than Masses
And Bush
Who Knows
Barbarist are using Technology cluelessly
Teachers in
Q
Watching Their Videos
Dear friends just give me a call
And tell me
What's fanatic
and
What's fantastic
The wall of my screen
is just broken.
*********************************
चवथी नवता चवथी नवता
मी फक्त बोलत सुटलोय मी बोलतोय मी जीभा वाजवतोय मी तरंगत्या जिभेत मेंदू वाजवतोय मी गोठलेल्या जिभेत काळीज पेटवतोय माझ्या सगळ्या अवयवांना आताशा माझ्या जिभेचा वास यायला लागलाय.मी बोलतोय मी मोबाईल आहे म्हणून बोलतोय मी इंटरनेट आहे म्हणून बकतोय माझ्यातला मेल इमेल होत चाललाय स्क्रीनवर ई-मेसेज फडफडतायत त्यांच्या आवाजातून मी बोलत सुटलोय I have thousand e-tongue to shake hand I have one ehand to shake thousand tongues खुलं जा सीम सीम म्हणत मी सीम कार्डच्या गुहा बदलत खोलतोय- बोलतोय मी भाषिक डेसिबल्स Hot & cold करत बोलतोय टल्ली भाषेचा मिल्क शेक उडवतोय माझ्यातून हजारो झल्ली कारंजी शब्दात बदकं पोहतायत मेसेजमध्ये राजहंस पोहतायत एमएमएसमध्ये कावळे पोहतायत फक्त चिमण्याच दिसत नाहीयेत त्या माझ्या मोबाईलमुळे उडून गेल्या काय? की माझ्या मोबाईल टॉवरने त्यांचा चारा पळवून न्हेला ? त्याच्या पिलांचा मी ई-खुनी आहे ? चिमण्यांनो कुठे आहात ? माझा मोबाईल तुमचं अन्न का तयार करू शकत नाहीये आणि तुम्ही परत फिरायला तयार नाही? मी मिसकॉल देतोय तुमचे रिकामे घरटे पहात आणि तुमचा रिप्लाय नाही. मी तुम्हाला मिस्प्लेस केलं काय ? की मोबाईलधारी हाच ह्या सृष्टीतील रॉंग नंबर आहे ?
e - नसलेल्या चिमण्यांनो बोला
मी बोलतोय
आणि ऐकायला चिमण्या नेटवर्क रेंजमध्ये नाहीयेत
*************************
मोबाईला मोबाईला
।। छत्तीसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
ते त्यांच बोलण संपलं की
कधीही तुमच्यापर्यंत येऊन पोहचतील
असं समजू नका की तुमचे कान
त्यांच्या फिल्डमध्ये समाविष्ट नाहीत
वाचक आहात म्हणून काय झालं
मी थोडीच तुमच्या सिक्युरिटीची गॅरन्टी घेतलीये
तेव्हा ते कधीही त्यांच बोलणं संपवून
तुमच्या कानापर्यंत पोहचू शकतात
Everything is written off you know ?
।। सदतिसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
ते पुन्हा पुन्हा स्वतःची नियती निवडतायत
शब्द निवडताना
वाक्ये निवडली जातायत
वाक्ये निवडताना
परिच्छेद निवडले जातायत
प्रकरणं निवडताना
प्राक्तनं निवडली जातायत
शब्दांना वाटतय
ते बाहेर हाकलले गेलेले गुन्हेगार आहेत
आणि माणसांना वाटतय
शब्द आयुष्याच्या केंद्रस्थानी आलेत
मोबाईल
शब्द आणि माणूस
दोघांना जोडतायत
त्यांना Anthropometry
poetry सारखी बनवायचीये
आणि कविता
त्यांच्या मिशनमध्ये
आपण केवळ भुतासारखे दिसू म्हणून
संपाट होत चाललीये
मोबाईल बोलतायत
आणि शब्द
सुरवातीलाच शेवट निवडत
वाक्ये तयार करतायत
।। अडतिसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
उबट
रानव
फझबक
रौपौझोवोउ
तलटफलट
टिगीझिमीपीहीक्षी
खेनेवेज्ञे
क्षोऊकौटाबक
लो
दो
गॅटपॅकॅव
बुमबुमझुमझुम
शकशकशाकालाका
शब्द म्हणती शब्द म्हणती
झवण्यापूर्वी माझ्यात वाका
।। एकोणचाळिसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
काळ्या रंगात विधुर आवाजात
पांढऱ्या अंगात संन्यासी टोनमध्ये
निळ्या शब्दात निस्तब्ध सळसळीत
लाकडी गळ्यातून मेटॅलिक जंगलात
धृपद पायात निष्कंठ शांकरीत
मॉडिफाईड माणसात पाशवी डरकळ्यात
सर्वनाशी प्रोसेसमध्ये खराब रस्त्यावर उभे राहून
रेस्टलेस चिंतनात चिंतेचा उच्चार न करता
भारदस्त थ्रिलमध्ये
कूल चील चिल्लाहाटीत
गोल्डन थॉटच्या स्वस्त सुंदर टिकाऊ सुवर्णमध्यात
गाणे नाणे बहाणे पहाणे सोसत
जगण्याच्या शॉकमध्ये फुलप्रूफ जॅकेटमध्ये
बुलेटप्रूफ 'आज' टिकण्याची गॅरन्टी देत नसताना
ध्वनी ध्वनी खूनी होताना
जागृती झोपेची वाट पाहतिये तरीही
निसर्ग टीका करत नसताना
कयामातीच्या शेपटावर पाय ठेवत
त्यांच्याशिवाय जग शक्य आहे हे माहीत असताना
त्यांच्याशिवाय ते कसं अशक्य आहे ह्याची जाहिरात करत
प्रत्येक प्रत्येक सुद्धा सुद्धा
पॉज न घेता क्लॉज न टाकता
पॉश
।। चाळीसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
माणसे मरून गेल्यानंतर
ती निदान आपण बोलल्यानंतर जिवंत होतील
ह्या आशेने
व्हाईसमेलमध्ये धाडले गेलेले
पण माणसांच्यापर्यंत
न पोहचवलेले सर्व भाषाळ
गोळा करत
माणसांना जिवंत करण्यासाठी ते माणसांत धाडत
मोबाईल बोलतायत.
।।एक्केचाळिसावा शेवट ।।आता सर्व ठीक होईल
मोबाईल सर्व ओके करतील
शब्द हरवणार नाहीत
व्यवस्थित पोहचतील
हरवले तर रेकॉर्ड रूममध्ये सापडतील
माणसे ठीक होतील
भाषा ठीक होतील
O: K होईल बिलकूल ठीक
देर आये मगर दुरुस्त मोबाईल आये
ठीक ठाकठीक एकदम ......
।। बेचाळिसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
सर्वत्र
माणसांच्यावर ट्रक घालून - त्यांना सपाट करत
ज्याच्यावर लिहलय
Horn O.K. Please
आता आज नाहीतर उद्या
।।त्रेचाळिसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
त्यांचा आवाज माझ्या काळजात प्रेग्नंट होतोय
मला ते मान्य नाही
माझे हात कानावर हात ठेवून ओरडतायत
"नाही "
गर्भ फिक्स झालाय पण रक्त लोकेशन बदलतय
मी गाडी चालवता चालवता
एफ एम ऐकता ऐकताच
बहुधा बाळंत होईन
।।चव्वेचाळीसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
फोकस डीकंस्ट्रक्ट होत
भाषा चालू ठेवतोय
त्याला त्याची गद्दारी फील होतीये
एका सुरा - भाषेत Hidden
सर्व कनेक्ट करतोय
।।पंचेचाळिसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
ह्याचा अर्थ असा नाही की
माणसं बोलत नाहीयेत
पण माणसं मोबाईलवरून बोलतायत
आणि मोबाईल बोलतायत
ह्या दोन वाक्यात फरकय
जसा की
श्रीधर तिळवे कविता लिहितो
आणि कवी श्रीधर तिळवे कविता लिहितो
ह्या दोन वाक्यात फरकय
मी डोळे बंद करून झोपेत जातोय
मी डोळे बंद करून झोपी जातोय
मी डोळे बंद करून झोपेत चालत जातोय
।।छेचाळिसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
मला ते समजायला
आयुष्याची तीस वर्षे लागणार आहेत
।। सत्तेचाळिसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
ते बोलणाऱ्या माणसाचं प्रतिनिधित्व करत नाहीयेत
ते माणसांच्या बोलण्याचंही प्रतिनिधित्व करत नाहीयेत
ते फक्त मत तयार करतायत
किंवा असं म्हणता येईल
तयार झालेलं मत मांडतायत
किंवा असंही म्हणता येईल
की ते बोलून
स्वतःचं मत काय आहे
ह्याचा अंदाज घेतायत
किंवा ते आपल्याविषयी दुसऱ्याचं मत काय आहे
ह्याचा अंदाज घेतायत
मोबाईलची बॉडी लँग्वेज होतीये
आणि मोबाईल दर पल्सला स्क्रीन बदलत
माणसाचा गेस्ट अपिरियन्स धारण करत
नटांसारखे धोरणी बोलतायत
।। अठ्ठेचाळिसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
गेस्ट किंवा
घोस्ट किंवा
गोष्ट किंवा
गोश्त
।। एकोणपन्नासावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
चड्डीत
जंगल जंगल पता चला है
चड्डी पाहणके फूल खिला है
।। पन्नासावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
गोल्डन ज्युबिली
***
वर्कप्लेस फेस टू फेस
कार्पोरेट कल्चर उराशी घेऊन चौघेजण बोलतायत एकमेकातल्या बेडशी चौघांनाही अंदाज येत नाहीये बाई
ग्लोबल आहे की लोकल
नागडी आहे की कापडी
वेश्या आहे की विश्य
प्रत्येकाचं काळीज टोलजंग मनोरा बांधतय जो कळत नाहीये
झुलता आहे की कलता
पिसाचा आहे की पैश्याचा.
प्रत्येकाला माहीत आहे की समोरचा समलिंगी आहे पण हे स्पष्टच होत नाहीये की जो समोर आहे. तो
मिसप्लेस्ड पुरुष आहे की मिसप्लेस्ड स्त्री
प्रत्येकाला ओरडून सांगायचय की तो समलिंगी आहे पण कुणालाच कळत नाहीये हे बोलणे
मिसप्ले होईल की डिसप्ले
प्रत्येकजण नजर रोखून आहे
प्रत्येकाचा डोळा ओशाळलेला
टेबल टकामका पाहतय संगमरवरी अंगाने प्रत्येकाचे नाक जे कळत नाही
श्वासात बुडालय की वासात
चहा कपातून उठून हवेत चाललाय त्याला कळत नाहीये त्याचा चॉईस
कप की हवा
चेअर्स सहन करतायत मानवासन जे कळत नाहीये
बलात्कार आहे की प्रीती
सगळं कसं गोंधळलय अनिश्चित लिंगचाचणी आणि चाचपणीत
आणि पृथ्वी हा सगळा गोधळ निमूट सोसत
स्वतःला प्राप्त होणारं नपुंसकलिंगत्व
आउट होतीये.
***
लव ऑपेरा इन दहिसर ३
ज्यांना मृतांनी खाऊन टाकलंय
त्यांच भक्ष्य होण्याची माझी तयारी नाहीये
अनिरुद्ध काय आणि आठवले काय ?
एका rational impulse नं तू त्यांना जाऊन भेटतीयेस
आणि परततीयेस ते घेऊन
जे मृत आहे
मी फोन उसना घेतला म्हणून संतपणारी तू
आता काय काय उसनं घेतीयेस
की मी घेतला तर ओझं
तू घेतलास की पतंग ?
Double coding चा हा डबल क्रॉसिंग फ्लॅश
वारवांर दूखावतोय माझ्या रक्ताला फ्लशमध्ये
तुझ्यामुळे गरम होणाऱ्या नसेत
तुझ्या politics ला माफ करेल असं प्रेम तुला हवं आहे
आणि मी ते देऊनही
अंतिमतः तू त्या प्रेमाचं crystallization च करणार ह्या शंकेने अस्वस्थ
मशिदीत बसून फतवे काढणारे
आणि स्वतःची वेळ आली की त्यांची मन मुरगळणारे इमाम
आणि तू
ह्यांच्यात काय फरकय ?
तुझ्यापुढे आरसा धरला तर तू चेहरा फोडण्याचाच मागे लागणार
मिळाला तर माझा
नाही मिळाला तर स्वतःचा
एक Bluff master गिळत चाललाय माझा तुझा आदिम वास
आणि एक जंगल निर्माण करू पाहणारी वनस्पती
under observation
छोटी छोटी होत शेवटी मायक्रोस्कोपखाली श्वास घेत
फ्रीज्ड झालेल्या ओठांवर मी खेळवतोय कीस
आणि तुला आलेला कंटाळा बर्फात जांभई देतोय
किस द्यायचा नसला की बायका नसलेल्या गोष्टी शोधून किस पाडतात
तू अखंड संतापत स्वतःचच रक्त फाडतीयेस
आणि मी कागदी बोटी सोडत
त्यातून पार
मला गोष्टी जशा माझ्या टेबलवरून दिसतात
तशा तुला तुझ्या टेबलावरून दिसत नाहीत
अशावेळी टेबलावर येऊनही
वाटाघाटी काय होणार ?
कारण कुठलंही टेबल निवडलं तरी
ते एकतर तुझं
किंवा माझं
दोघांपासून बनलेलं टेबल कुठून आणू हे टेबलीके
तेव्हा उबव खुर्ची
आणि ज्या आधीच मृत झाल्याने तुला सर्वशक्तिमान समजतात
अशा आणखी काही खुर्च्यांना जन्म दे.
***
FACE TO FACE
***
डेथबेडवरची स्वगते
भर चाळिशीतही ज्याचा स्ट्रगल संपत नाही त्याने चाळी पाडल्या काय किंवा बांधल्या काय ? एन्थुसियझमची सियासत संपुष्टात येऊन आता त्याचं फक्त अँथम वाजतय हे तर स्पष्टच दिसतंय अपयशाच्या कारणमीमांसेत पहिला चेहरा आपल्या अहंकाराचा दुसरा आपल्या टॅलन्टची भीती वाटणाऱ्या पाट्याटाकू रोजनदारांचा आणि तिसरा सवतीमत्सराच्या चाबुकाचा आपण पोहचण्याआधीच पोहचल्या आपल्या विषयीच्या अफवा हवा स्पीन करायला गेलो तर श्वासांची बोटे जखमी मूळ स्टोरीज ऐकवल्या तर लोक म्हणाले ह्याची हॉलिवूड सीडी कुठली ? चोऱ्या करायची सवय झालेले हात आपले ओरिजनॅलिटीची डिमांड करणारे नशिब लिहित राहिले आणि आपण आपली क्रिएटीव्हीटीची खाज रायटर्स असोसियेशनमध्ये जाऊन फक्त रजिस्टर करत राहिलो.
एक लगान आली तर त्याचे टायटलक्रेडीट बळकावून माजला एक मराठी गुडघा आणि आपण माधवराव पेशव्यांच्या दरबारी मुजरा का प्रस्तुत केला नाही अशी विचारणा करणारा फतवा काढला इंडस्ट्रीने. आपली सचोटी पूर्णच पराभूत झाली. दोस्तांच्या गैरवापरनाम्यात आणि त्यांनी यशासाठी आपापसात केलेले तह पाहून वाटाघाटीच्या टेबलाखालून निमूटपणे निघून गेली. आपली बॉडी आपल्या परमिशनची वाट न पाहता.
आईला एक साधं सुखाचं लुगडं पुरवू शकले नाहीत आपले हात केवळ दोनचार दिवसांच्या भेटीत फॅमिली सेटिंग करून आपण टाकत राहिलो ह्या महानगरावर आपल्या चिन्हसृष्टीचं अनेकदंतीय जाल पण आपल्या वाट्याला आली फक्त कॉस्मॉपॉलिटीन हवा
कुणास ठाऊक आपल्यासारखे किती आले ह्या ग्लॅमरयुगीन फिल्म्शैलीत स्वतःची सही घेऊन पण ऑनलाईन फेक आयडेंटिटीने सवांचीच जिर व ली मान
आता ही छाती पिचलेली म्हणायचेही त्राण उरलेलं नाही आपल्या फुफ्फुसात आता फक्त जेल पेन विकत घ्यायचे ह्या इनजेलसिटीत आणि इनव्हिजिबल रहात पहात बसायची सक्सेलफूल माणसाच्या कव्हरस्टोरींची मुखपृष्ठ
हे तसं बरंच की आपला जन्म मलपृष्ठावर झाला ह्या संस्कृतीच्या
हे तसं बरंच की आपण जन्मलो तेव्हा आपल्या आईबापांच्या आकाशगंगी सक्सेस नावाचा तारा नव्हता
हेही तसं बरंच की आपल्याआधीच्या आपल्या बारा पिढ्या मातीतच वारल्या होत्या आणि आपल्या जन्ममूठीतून उठून गेली होती हिरवी शाई
आता हे इथं असं स्वतःचं प्रेत दहन होताना पाहताना थोडं व्याकूळतय आत काहीतरी.
मित्रांनो, चाललो बाबांनो
पण जाताना ती राख नीट गाडा किंवा फेका पाण्यात चुकुन धुगधुगली तर नवं टॅलेन्ट घेऊन उगवेल आणि फळं मोडता मोजता तुमची बरगडी मोडेल
मेल्यानंतर टँलेन्टेड माणसं आधीक बदतमीज होतात असं म्हणतात म्हणून सांगतोय.
थोडं स्पिरिच्युअल
भोवळ येऊ न देता मी चाललोय एका गॅजेटीग रोलर कोस्टरमधून लाथ मारेन तिथे पाणी काढेन म्हणणारा पाय अचंबित पाऊल पडेल तिथे गॅजेट उगवताना पाहून माझे डोळे थेट CACNA 1A मधून प्रक्षेपित होतायत familial hemiplegic migrane ची संध्याकाळ सर्व शरीरभर पसरलेली ह्या गॅजेट्स मला फाडून खायच्याही आहेत आणि पचवायच्याही आहेत डिप्रेशनचे करडे फुल आणि त्याचा अगतिक गंध टेक्नॉलॉजी इनिशियेट करणारे हात गुलाब घेऊन येतायत मला कळत नाहीये माझी कबर झालीये की खबर ? नेसेसरी चा
नार्सिसिझम आरश्यात आणि माझा टेक्नोफेस त्यात फेशियल करत migraine सांभाळत.
भोवळ येतीये पण ती सांभाळत मी निघालोय मॉलचा दरवाजा ओलांडून सूर्यास्ताच्या दिशेनं
एक सौन्दर्य लालचुटुक ओठांनी मावळतय आसपासच्या बायकांच्या लिपस्टीकच्या कांड्या कडाकड मोडत निसर्गदत्त
फोटो घ्यावा की हा सूर्य तसाच सोडावा ?
पझेसिवनेसचा डिजिटल कोपरा ढुश्या मारतोय हातातील डिजिटल कॅमेऱ्याला !
सगळं कॅमेऱ्यात कैद करणारा तुरुंगाधिकारी उगवतोय भोवळ हलतीये मी बीचवर थोडासा भेलकांडतोय
हा क्षण जगावा की हा क्षण शूट करावा ?
मोबाईल बीप करत नाहीये नेटवर्क गायब
ही रात्र आता विदाऊट टेक्सट आणि मेसेजशिवाय
गॅजेट्स मरत चाललेत सूर्य मावळत चाललाय मी जो भोवळत चाललोय migraine दुरुस्त करत निरोप देतोय- मलाच - जो ऍडिक्ट होऊन मॉलमधून बाहेर पडला होता. डिजिकॅमची बॅटरी संपत चाललीये
लाटा वाजतायत सूर्याला निरोप देत
" ह्या क्षणी हा सूर्य जगण्यासाठी मला फक्त डोळे आणि कान
आवश्यक आहेत "
मी - सू र्या स्त - ज ग तो य
मी सूर्य जगतोय
चेक कर शेवट
No comments:
Post a Comment