Monday, 10 July 2017

shridhar tilvechya kavita

श्रीवाहिनी मंगळवार

An interview with Businessman 

S : धंदा चाललाय कसा ?
B : अनेक पायांनी अबस्ट्रॅक्ट

S : Is it dead style of management or style of death preserved by manager.

B : Management is always an open text

S : Who says ? Management - school is closed down

B : But market is booming

S : It's tone is blooming

B : Music ?

S : Market is traveling all travels traveled by Humankind

B : Do you mean Philosophy moves ?

S : Anything goes

B: But philosophy never goes

S: You mean it's there ?

B: T.V set is there set top box is there set up is there. Everybody is having like an actor on set everybody is set. So what do you expect ?

S: You are presenting Stunt - giri.......... public stungiri

B: That is why it's so stunning.

S: But empty cadboureybox

B: It sells - सब मोठा हो जाए

S: Is this your definition of prosperity

B: Business defines everything

S: You are stockpiling

B: No dear I am avoiding piles. I am powerful coordinator who coordinates power fools

S: We need feedback

B: Facebook is enough

S: Big- boss ?

B: In India, we are waiting for it. Participation of audience. A text written by an audience

S: You means business is now written by customers

B: Bu we businessmen publishes it so we are the controller. Who has time to check the correct counting of voting. Just Make the good commercial of counting and everything will fall in it's own place.

S: Rock on !

B:  Do you mean we should blast

S: Terrorists are doing it

B: I think it's future market.

S: It's market

B: It's always steppingstone for beguiner

S: Do you get extraordinary satisfaction

B: I make my products for ordinary people

S: Let's dance

B: Let them dance. But tune must be mine


Regular Internet 

Free                    which is in                       Net
Walk                   autonomously                  In irain of Sings
Icon                    yourself  in                       Mint
Desroy                which is                            Violent
                                                                     Pornographic
                                                                     Unreal
                                                                     Trite
                                                                     Vapid
                                                                     Conformist
                                                                     Consumerist
                                                                     Meaningless
                                                                     Brainless
                           assumed by shot                Odlies in eighties
                           shot down their gun of Golden age
Question            their authenticity of passive voice
                                                           passive intelligence
                                                           passive creativity
                                                           passive rebellion
Ride                   while mobiling                    Landscape
Invent                Wikipedia of                        001
Celebrate            the secrecy of                     007

Express              balancing the           Terrorism Dynamicity
                                 and
Empower           Powerlessness of     Moment to Moment
                           Movement          
Independent       the body of              In bed partner
                           Luxury
Sing                    your voice               uniquely
Raise                  it like                        God
Stand up             online                       Souling the sole and
Make                   the world                 Heard

मोबाईला मोबाईला 
।। सतराचा शेवट ।।
ता. क
पहिला मोबाईल दुसऱ्या मोबाईलला म्हणाला
"बोलणे म्हणजे काय ?"
दुसरा आजतागायत बडबडतोय स्पष्ट करतोय
त्याने पहिल्याला
तो बहिरा असल्याने आजतागायत सांगितलेले नाही

           ।। अठरावा  शेवट ।।
            हे सर्व दिनांक २४ जानेवारी २००४ साली घडलं. इतिहासाच्या मते बोलणारे सर्व कवी होते. समाजशास्त्रज्ञांच्या मते ही फेअरटेलने प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली खेळी होती. राज्यशास्त्रज्ञ अजूनही सरकार कधी चौकशी समिती नेमतंय ह्याची वाट पाहतायत. अर्थशास्त्रज्ञांच्या मते ह्या घटनेपासूनच इंडियाची मोबाईल इकॉनॉमी अधिकच बूम झाली
         ।। एकोणिसावा शेवट ।।
          मोबाईलचा कोलाहल ऐकून अकबर बादशहा अस्वस्थ झाला त्यांनी बिरबलला सांगितले काहीही करून हा कोलाहल थांबाव. बिरबल म्हणाला, "अर्थखातं चिदम्बराकडून काढून घेऊन मला देत असाल तर हा कोलाहल थांबवतो. झालं. बिरबलाने अर्थखाते मागितले म्हणून  भारतभर बोंब झाली चॅनेल्स कोकलायला लागली." प्रधानमंत्री म्हणाले, "आधीच सोनीयाचे लगेज मानेवर होते आता हा बिरबल कुठून आला" गृहमंत्री म्हणाले, "साक्षात अकबराने त्याला मुख्य सल्लागार मानलाय तेव्हा आपण त्याचे काहीही वाकडे करू शकत नाही. अकबर हा मुस्लिम  समजूतदारपणाचा शेवटचा अंश आहे त्यामुळे त्याला आपण दिल्लीतून हटवूच शकत नाही. शेवटी तुम्हीही मायनॉरिटीत असूनही बादशहा झाला हे विसरू नका प्रत्येक मायनॉरिटीतल्या बादशहाला एकतरी मेजॉरिटीतला बिरबल लागतो हे विसरू नका" पंतप्रधान बुद्धिमान होते अचानक त्यांचे डोळे तेजाळले.
"ह्या कथात एक गोष्ट लक्षणीय आहे ते म्हणजे बिरबलने धर्मांतर केलेले नाही" धर्मांतर केल्यानंतर बिरबल हा बिरबल राहिला नाही काय ? की ह्या कथा लिहिणाऱ्याला तो मुसलमान झाल्यानंतर त्याच्या शहाणपणाच्या कथा रचाव्याश्या वाटल्या नाहीत ? नेमके काय झाले ? की ह्या कथा प्रत्यक्षात घडल्याच नाहीत ? मग बिरबलने अर्थखाते कसे काय मागितले ? की हा बिरबल मोबाईलवरच्या कुठल्या गेममधली मोबाईल  व्यक्तीरेखा आहे ?"
                   गृहमंत्री म्हणाले, "गृहखात्याकडे ह्या विषयी काही माहिती नाही पण मी  माहिती आली की कळवेन फक्त एक गोष्ट सांगतो बिरबलने अर्थखाते फक्त एका दिवसासाठी मागितले आहे"
                   पंतप्रधान  म्हणाले, "पण शंकरच्या त्या साऊथ इंडियन फिल्ममध्ये हिरोने असेच एक दिवस मुख्य मंत्रिपद घेतले होते आणि मग त्यातून त्या व्हिलनची म्हणजे मुख्यमंत्र्याची वाट लागली होती तसे काही अर्थखात्याचे झाले तर  .. . . . . . .  "
                   गृहमंत्री म्हणाले, "अहो पण तुम्ही हा चित्रपट कसा काय पहिला ?"
                   पंत्रप्रधान म्हणाले, "त्यात मनीषा कोईराला  होती म्हणून पहिला ती नेपाळच्या राजकीय नेत्याची मुलगी पडली ना ?"
                   गृहमंत्री म्हणाले, "पण मग गृहखात्याकडे ह्याचा कसा काय रिपोर्ट आला नाही ?"
                   पंत्रप्रधान म्हणाले, "हा प्रश्न खरेतर मी तुम्हाला विचारायला हवा. असो. आता सांगतो ते करा त्या बिरबलला म्हणावं मी एक दिवस देऊ शकणार नाही पण आज रात्री अर्थमंत्री झोपी जातील तेव्हा त्यांची झोप संपेतोवर तो हे खातं सांभाळू शकतो "
                   गृहमंत्री पंतप्रधानांनी पिक्चर पाहिल्याचा रिपोर्ट आपल्याकडे आला नाही म्हणून आधीच लज्जाळू झाले होते त्यामुळे त्यांनी वाद न घालता हे मिशन स्वीकारले व बिरबलाला हा निरोप दिला.
                   बिरबलाने आनंदाने ही मर्यादित वेळ स्विकारली आणि अर्थमंत्री झोपी गेल्यावर एका तासातच सर्व बोलणाऱ्या मोबाइल्सना  एक मेसेज पाठवला.
                "सेन्सेक्स तीन हजारांनी कोसळला "
                प्रत्यक्ष अर्थखात्याकडून न्यूज आल्याने मार्केट काही काळ स्तंभित झाले. काही काळ कोलाहल थांबला. बादशहा अकबर खुश झाला त्याने आपल्या श्वासाचा रिंगटोन ऐकते स्वतःचे फुफ्फुस ऐकायला सुरवात केली.
             
।। विसावा शेवट ।।
मोबाईल बोलून बोलून एगजॉस्ट होतायत आणि त्यांना माहित नाही
त्यांना रिप्लेनीश करणारे हात
पोस्टमॉडर्न शहाजहानने
ते काळा ताजमहाल बांधतील म्हणून
आधीच कापलेत

।। एकविसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
आणि  त्यातून भाषेचं एक महाकोलाज तयार होत चाललंय
का ते मला माहीत नाही
पण मला ते युद्धासारखं दिसायला  लागलय
                 
।। बाविसावा शेवट ।।
मोबाईल
जे घरंदाज बायकासारखे दिसतायत

हळूहळू  -
बोलता बोलता
प्रॉस्टिट्यूटसारखे दिसायला लागलेत.

मी त्यांना म्हणू  इच्छितोय
की तुम्ही उदाहरणार्थ वेश्यांसारखे दिसताय
पण मी भालचंद्र नेमाड्यांची आठवण येऊन
तसे म्हणत नाहीये

मी काही म्हणत नाहीये
आणि मोबाईल
जे आतापर्यंत  त्यांची निरागसता टिकवून
बोलत होते
आता अस्सल रंडीसारखे
बाजारात उभे राहून
बोलतायत.

।। तेवीसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
आणि त्यांची पॉप्युलॅरीटी वाढत चाललीये
त्यांना वाटतय
की ते आता इलेक्शनला भारतभर उभे राहून
निवडून येऊ शकतात
त्यांना पंतप्रधान कोणाला करायचं
ते ठरवायचयं
आणि ते बोलत बोलत "पंतप्रधान " ठरवतायत

।। चोविसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
मोबाईलवर बोलणं आश्चर्यकारक असतं
हे ओळखून
चकीत होण्यासाठी
मोबाईल
मोबाइल्सची जाहिरात करत
एकमेकाशी बोलतायत

त्यांना खात्री आहे
एक दिवस ते भाषा जिकंतील

तिला जिंकल्यानंतर तिचं काय करायचं
हे मात्र त्यांना माहिती नाही

कदाचित ते तिला ठार मारतील
किंवा जिंकल्यानंतर पट्टाराणी  करतील

मोबाईल बोलतायत

।। सव्वीसावा शेवट ।।
मोबाईल  बोलतायत
प्रथम शब्द होते
मग ते मोबाईल झाले
आणि त्यांनी मोबाईल तयार  केले

शब्दांच्या लक्ष्यात आले की
त्यांना फक्त सात दिवसात जग तयार  करायचय

मग त्यांनी
प्रथम सात दिवस तयार केले
आणि मग ते क्लोनिंग शिकले

मग ते
सोमवारपासून आणखी काही सोमवार
मंगळवारपासून आणखी काही मंगळवार
बुधवारपासून आणखी काही बुधवार                
गुरुवारपासून आणखी काही गुरुवार
शुक्रवारपासून आणखी काही शुक्रवार
शनीवारपासून आणखी काही शनीवार
रवीवारपासून आणखी काही रवीवार
तयार करू लागले

तेव्हापासून
आठवडे बनतायत
आणि तेच तेच सात दिवस तयार होतायत

सात दिवस संपत नाहीयेत
आणि जग संपूर्ण तयार होतच नाहीये

शब्द सहा दिवस काम करतायत
आणि रवीवार मोबाईलसोबत घालवतायत

रवीवार
कधीपासून तेही आता आठवत नाही
तयार होतायत
आणि मोबाईल बोलतायत

।। सत्ताविसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
मला खात्री आहे की मोबाईल बोलतायत

मी त्यांच्याविषयी जितका विचार करतोय
तितके मोबाईल त्यांच्याविषयी माझ्याशी बोलतायत

मला खात्री आहे की
मी मोबाईल आहे
मी मोबाईलसारखा आहे
मी मोबाईलसारखा नाहीये
कदाचित मोबाईल माझ्यासारखे आहेत

मोबाईल माझ्यासारखे नाहीत
म्हणूनच मोबाईल मोबाईल आहेत

मी मोबाईलसमधून स्वतःला गोळा करतोय
पण इतक्या एसएमएसमध्ये मी मला कुठेच
आढळत नाहीये

मोबाईल
ज्यांचे  चार्जर माझ्या त्वचेसारखे काळे आहेत
ज्यांचा चेहरा माझ्यासारखा दिसण्याचा प्रयत्न करतोय
माझ्यासारखे होत नाहीयेत

माझ्यातून मोबाईल बोलतायत
आणि मी मोबाईलमध्ये नाहीये

।। अठ्ठाविसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
आणि माझ्याभोवती महाजाल तयार होत  चाललय
सगळं कसं मोबाईलतय

घनात  घट मोबाईलतायत
काळात कळा मोबाईलतायत
अवकाशात पातळ्या मोबाईलतायत

मी बाईसमोर उभा राहतोय
तर ती विचारतीये
सॅमसंग की नोकिया की एलजी

मी जंगलासमोर उभा राहतोय
तर ते विचारतय
रेंज किती
एक बार दोन बार तीन बार की फूल ?

मी मेन्यूत काळीज
बॉडीत माझं रक्त
आणि टॉवर्समध्ये माझं घर ठेवून
हिंडतोय

वाघांना मोबाईल कसे वाटतात
माश्यांना ? धुळीला ? झाडांना ? मोबाईल कसे वाटतात ?

मोबाईलशास्त्र हे कळण्याइतकं विकसीत झालेलं नाही
कंपन्यांना झाडांना किंवा माश्यांना मोबाईल्स विकायचेही नाहीत
त्यामुळे ते विकसीत होण्याची शक्यताही कमी आहे

मोबाईल मोबाईल असल्याने
सतत प्रवास करतायत
आणि एकमेकांना एकमेकांच्या साईटविषयी
सतत काहीना काही नवीन पुरवतायत

मोबाईल बोलतायत
मला एक दिवस त्यांना खरोखरचं
म्हणजे जाहिरातीतल्या मोबाईलसारखं खोटं खोटं नव्हे
नाचताना बघायचय

।। एकोणतिसावा शेवट ।।
 मोबाईल बोलतायत
मोबाईलांनो बोला
पण बोलल्यानंतर स्वतःत काय घेऊन येणार आहात

कॉलचं डुरेशन ?
कॉलचं बील ?
कॉलची नोंद ?

ही सगळी तर दुनिया आहे

मोबाईलांनो
परततांना कुठल्याच कॉलमध्ये न अडकता
माझ्यातच परता

।।तिसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत

बोलण्याचं एक अकॉस्टीक असतं
तस ऐकण्याचंही

मी सगळे मोबाईल ऐकतोय

माझा कान विश्वाएवढा होत चाललाय
आणि जग
जे ग्लोबल व्हिलेज बनायला चाललं होतं
हळूहळू माझा कान बनत चाललंय

।। एकविसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
आणि त्यांनी बोलण्यातून निर्माण केलेली वादळे
कुठल्या दिशेनं जायाची म्हणून कनफ्युज आहेत
सर्वत्र भाषेच्या दिशा आहेत
आणि सर्वत्र शब्दहिन शांततेची टंचाई

मी गातोय शांततेचं गाणं
तर तेही शांततेला अडथळा ठरतय

मला शांतता गायाचीये
आणि माझ्यातून मोबाईल बोलतायत

                                                       ।। बत्तीसावा शेवट ।।
मोबाईल्स बोलताहेत
आणि मी त्यांच्या गर्दीतून वाट काढत
एकटाच निघालोय

माझ्या अंगावरच्या खिडक्या
रेंज बघून उघडतायत - बन्द होतायत

मी शोधतोय तो टॉवर
जो ह्या मोबाईलनां बोलायला भाग पडतोय

मला एक स्वच्छता हवी आहे
आणि व्हिज्युअल साफसफाई

मी वाट पाहतोय
त्या झाडूची
जो ही गर्दी एका स्वीपमध्ये साफ करेल

झाडू येत नाहीये
आणि मी टॉवर शोधत
ह्या गर्दीतून चाललोय

इटज बुलशीट- आय  नो -
बट आय कान्ट हेल्प - I have to walk through these mobile
मोबाईल बोलतायत
आणि मी असहाय्यपणे त्यांच्यातून चाललोय

।। तेहत्तीसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
त्यांची छोटी आणि प्रभावी बॉडी
दिवसेनदिवस तेजस्वी होत चाललीये
उत्क्रांतीच्या उन्हात

बॅटरी रिचार्ज करण्याची त्यांची कपॅसिटी दिवसेनदिवस वाढतीये
त्यांचा मेनू भरगच्च होत चाललाय

दिवसेनदिवस ते सेक्सी दिसायला लागलेत
पुरुष त्यांच्याबरोबर  राहून गे बनत चाललेत
बायका लेस्बीयन

त्यांना लिंग नाहीये
आणि ते उभयलिंगी नेटच्या झाडाखाली उभे राहून
बोलतायत

आपण आख्ख जग मोबाईल बनवतोय
ह्याचं त्यांना समाधान आहे
आणि आख्ख जग
मोबाईलवरून
स्वतः चा लॅण्डनंबर विचारतंय

                                       ।। चौत्तीसावा शेवट ।।
मोबाईल्स बोलतायत

मोबाईल पहिला
जो मी एका लक्झरीत खरेदी केला  होता

मोबाईल दुसरा
जो मी एका परफारमन्सच्या अगेन्स्ट मागितला होता

मोबाईल तिसरा
जो मी एक स्टाईल स्टेटमेंट म्हणून विकत घेतला होता

मोबाईल चौथा
जो माझ्या जिभेचे कवर म्हणून आणला होता

मोबाईल पाचवा
ज्याचा हिडन मेन्यू मला आवडला होता

मोबाईल सहावा
जो कुठल्याही हवामानात टिकेल
ह्याची गॅरन्टी दिली गेली
म्हणून मी हातावर टेकवून घेतला होता

मोबाईल सातवा
त्याच्यात परकायाप्रवेश शक्य आहे म्हणून
एका परकायाप्रवेश करणाऱ्या स्त्रीला पहात
मी खरेदी केला होता

मोबाईल आठवा
जो मला झोपाळू मुलीने मला झोपता झोपता दिला होता

मोबाईल नववा
जो मला लॉटरी म्हणून लागला होता

बोलतायत
आणि मी
दहाव्या मोबाईलची बॉडी  शोधत
ह्या समुद्रकिनारी
बॉडीशॉपींग करतोय

मला इतकंच माहीत आहे
माझा दहावा मोबाईल
समुद्रात आहे


                                                   ।। पस्तीसावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
आणि त्यांना आयुष्याची शेवटची ओळ
सापडतच नाहीये

ते धास्तावलेत
त्यांना एवढंच कळालय
हा त्यांचा शेवटचा कॉल आहे
आणि एक वाऱ्याची हलकीशी झुळूक
त्यांना धुळीस मिळवणार आहे

ते ती झुळूक येण्यापूर्वी
आयुष्याच्या त्या शेवटच्या ओळीत पोहचण्यासाठी
बोलतायत
***************************************************************************

                    थांब ! फील होत असेल चैतन्य तर ! नाहीतर कंटाळवाणं डील होईल. सर्वत्र fearosphere पसरत चाललंय  ! त्यातून बाहेर ये तृष्णाचं शेपूट वाकडं!  सोड .
बोलणं हेच पहिलं फ्लर्टींग कार्ड
तेच फ्लोटिंग राहिलं डोळ्याला डोळे भिडताना तर
अनोळखी नजरेनंच पहात राहिल आतलं केस  सलज्ज प्रेम
तुझे भूरळे केस आहेत रस्त्याइतकेतच लांब
माझ्या बोटांना त्यात घेऊ दे सॉफ्ट लॉँग ड्राईव्ह
बटा बटबटीत वाटतात  बाई डेटिंगमध्ये उपस्थित नसली की.

डेट डाटा उध्वस्त करत.

                   घरी येतेस ? माणसांचा  अभाव आहे माझ्या घरात. कॅलिबर नसलेलं आक्रमण आणि कॅडबरी झालेली तुझी बॉडी कुठलं कॅरेक्टर व्यक्त करतीये ?
                     सरळमुखानं ये. क्यू देणारी पावलं टाकत. प्रतिसादाच्या खिडक्या खुलतायत दोतरफा. त्यांना भिंत देऊन  ये. फोरव्हीलर स्कीनफ्लॉवरमध्ये उमलवण्यास.
                      जिथंपर्यंत तुझे डोळे तिथपर्यंत तुझं प्रेम
                       इंटरेस्ट दाखव मुद्दल ठेवतो.
संभोगापूर्वीचा अदमास बॅकेबल लागतो. आकाश, तारे, चंद्र, भानगडी नकोत. दे चुंबनासाठी ओठ, पानासाठी स्तन आणि वीर्यासाठी योनी, सुपीक रोमॅन्टीसिझम फक्त वेळ खातो रक्ताचा. शरीरत ये शरीरात. पार्क हो.
                   कण्याचा शामियाना खुला कर.
                   पाठमोरी पाठलिपी अवगत करत सरकतय स्पर्शाचं जेल पेन.
                   खांदा खळखळतोय रक्तात.
                 
                     आयकॉनीक होतोय बंदा रुपया दोन मांड्यात.
                     मोडीत काढून  सुट्टा कर
                     सुटका कर

                     Is this a date ?

                     काळ दाबतोय कीज
                     आणि दोन देहातील  लॉक्ड वीज
                     आईस्क्रीममध्ये अनलॉक होऊन
                      काळापलीकडे चाललीये

                     बर्फ आणि तंगड्या तोडत
***
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
माझे कपडे माझी त्वचा नेसून येतायत तुझ्याकडे फॅब्रीक श्वास घ्यायला. ही सुवासांची सेल्समनशीप नाहीये किंवा माझ्यातील बॅड बॉयचं मार्केटिंग ! ही आहे अस्सल फीलींगची इमोशनल थ्रेड कनेक्टीविटी जी त्वचेला जपत कपड्यात जप करत जपजपतीये तुझ्या हवेत जी तुझ्या रक्तानं भारलीये
         एक निळसर कापूस आहे रक्तात तयार होणारा माझ्यात एक चंदेरी सुई आहे हांडांना टाके घालणारी एक सोनेरी दोरा आहे मांसाला शिलाई मारून ते अनंताला  जोडू  पाहणारा !
        मी कबीरासारखा विणकर नाही किंवा रोमान्टिक कवीसारखा दिनकर पण तरीही मला माझा ऑटोग्राफ तुझ्या शरीरात  ओतून काही क्षण फॅशनफ्लॅश व्हायचं आहे. तुझ्या सफेदफ्लेश अंगकांतीत बर्थ डिफेक्ट दुरुस्त करणारी फर्टिलीटी माझ्या जवळ नाही पण त्यांचा विसर पडणारी  जनेटिक नशा माझ्या सेक्स स्टेशनवर मुबलक आहे ये, पी आणि मांड लिबिडोगेम ह्या चावणाऱ्या लक्झरीत जिचे दात ना तुला दिसतायत ना मला !ये! तुझ्या इनहाऊस मांड्यात डाउनलोड कर माझ्या मांड्यातील फ्रस्टेशन नाहीसं  करणारं प्लेस्टेशन ! वासनेचा अणकुचीदार फोकस तयार होतोय कसमसीत ! उतरव त्यात माझी त्वचा नेस माझे कपडे कपडे जे ऍथलेटीक व्हेंचरचे ऑथेन्टिक परिणाम आहेत नेस आणि फाड
ह्या ब्लड डेनसिटीचा होऊ दे अंत
स्तनातल्या दुधात गायब कर माझ्या शर्टातला  चॉकलेट हिरो
बेंबीत कोसळू दे बिल्डिंग टी शर्टवरील स्पिरीच्युअल थीमची
चष्मा फुटू दे हायटेक अंडरवेअरचा
न्याहाळू दे हा उड्या मारणारा कांगारू
बनियनच्या असंख्य डोळ्यांच्या हातांना हाताळू दे बोटांना
त्याची झेप फॅशन डिझाईन करणारा फॅशेनेट होऊ दे पॅशनेट कवी
         बघ डेटींगमध्ये होतोय डाटांचा अंत
         आणि काळ टाईमलेस संत बनून नाहीसे करतोय सगळे  नाझीवादी
         उमलतोय दोन मांड्यात
         डटकर - डंकेकी चोटपर
***

तुझ्या Home Alone Holocaust ला विटलो पोरी
घरं इतकी नाझीवादी नसतात इंडियात
स्वतःला दुरुस्त कर
किंवा घरातून बाहेर पड
***

Face To Face From Fields 
१.      
            फ्रस्टेशनच्या बुदेलखंडात बुंद बुंद काळोखघाई ! आयुष्याची गुप्त खबर नीट पोहचवेल असा बहिर्जी नाईक कुठाय ? माझ्या मातृमुखी नाईक परिवाराचं स्टार परिवारात स्वागत नाही माझी तिळवे कुटुंबीयाचं सोनी परिवारात तिळगुळ घ्या गोड बोला नाही
                  गावातच जो कॉस्मॉपालिटीन झाला स्थलांतराच्या दुरव्यापी प्रोग्राम गिरवत त्याच्या पाटी फुटलेल्या धड्यांनी कुठं प्लेस व्हावं ह्या भारतीय समाजाच्या जातीवंत सिलॅबसमध्ये ?
                  वर्गरचनेचे खर्व आणि गर्व घर खाली करत खलीवली खलीवली करत राहिले सर्गरचनेत आणि निसर्ग शतपावली करत झोपून गेला कुंभकर्णासारखा ह्या तळहातावरच्या मानवी कुंभमेळ्यात
               आता तो उदास करणारा आईचा चेहरा पहावत नाही
               आतो तो आपलीच त्वचा जखमा - जखमात फाडणारा बापाचा हात सोसत नाही.
               आत्महत्येच्या आरश्यात ज्यांनी स्वतःच्या प्रामाणिकपणाचा चेहरा विद्दूप होताना पहिला त्यांना काय सांगावं त्यांच्या म्हातारपणात आयुष्याच्या चेहरेपट्टी बद्दल ?
                मोबाईलवर फोन आला कि थरथर कापतो जीव ! आयुष्य व्हाईसमेलवर सोडून कुठं जाता येईल ? तो प्रदेश कुठला जिथे माणसांचं रोमिंग नसेल ?
                कुटुंबाचं एक्स्टेन्शन म्हणून आपण जगलो
                की आपल्या जगण्याचं कुटुंब एक्स्टेन्शन होतं ?
                एकावर एक नातेवाईक फ्री मिळत गेला आणि सेलला लागलेल्या वस्तू हक्कानं मागत राहिला
                दडपणांचा प्रेशर कुकर उबवत आपण मारिली कवितेची शिट्टी आणि लोकांनी भाषा शिजली म्हणून आपणाला उतरवून घासाघासांनी खाल्लं.
                श्रीधर तिळवे कन्फेशनल सेंटर
                कुणीही यावे कन्फेशन देऊन जावे
अनेक तोंड खुपसली गेली तोंडाला पाने पुसत ! डॉन, राजकारणी, कवी, विचारवंत, भिकारी, वेश्या सगळे पाचवीला पुजलेले आणि आपण कायम सबसे तेज दाखवत शेज झालो. लोकांनी आपणाला फक्त झोपायला वापरलं हे कळेतोवर पांढरे पडायला लागले आपले केस आणि लिंग
              आणि मग आपण आपल्याच केसांनी आपलाच गळा काढत राहिलो तर लोग म्हणाले "कविता म्हणजे हेच काय ?"
              सूर्याला साक्ष करून अंथरुणातून उगवताना कोणत्या प्रकाशाची द्यावी  मी  अद्ययावत गॅरेन्टी
              स्वतःला समकालीन होताना जड होत चाललेली ही अपटुडेट भूतकाळाची पिशवी आता कुठल्या मॉलमध्ये सोडावी ?
              एक भरगच्च हाऊसफुल्ल गलेलठ्ठ दुपार
              आणि ही अतिशिण आलेली क्षणिसं हसणारी ओठांची दाक्षिणात्य मांडवली
              स्वगत उच्चारत भर लोकल ट्रेनमध्ये जो बुद्धासारखा चेहरा ठेवतो तो नटसम्राट कुठे हरवलाय ?
               मास्क फिटत चाललाय मेकप विस्कटत चाललाय एडी सांगतोय सर सीन अभीभी लिखके नाही आया है.
             हे डोंगरांनो हे मॉलांनो हे नदींनो हे बिसलरींनो हे जमींनींनो हे एफ एस आयनो हे झाडांनो हे फास्ट फूड स्टोल्सनो हे शरीरांनो हे एडसंनो हे ढगांनो हे कॉफीच्या मगांनो
            हे रांडेच्यांनो हे आयझवाड्यांनो  हे बापघाल्यांनो
            एकतर माझे  जंगल  मला परत करा
             किंवा तुमच्या आजच्या डिनरसाठी मला फाडून खा.
***


रिटेल रिबेल्स आणि होलसेल एस्टॅबलीशमेन्ट ! हे किरकोळ चणीचे प्रतिकार घेऊन कुठे जाऊ ? सगळे कवी चायनीज मालासारखे डुप्लिकेट आणि स्तस्त होत असताना कुठे पेरू इंडियन आयडेयंटीचा घन्साळ राईस शेतीसाठी एफ एस आय अवेलेबल न करणाऱ्या ह्या धनकॉस्मोपॉलीटीन शहरात ? इथल्या माणसांच्या नाकाला शेतीचे वावडे आहे जमीन दिसली की बिल्डींग सुचणारे हे लोक ! त्यांचा बिल्टअप घेऊन कुठला गेटअप सजवू ह्या मास्कपार्टीत ?
             मास्कमधून वाघ येतायत जोकर येतायत हत्ती येतायत त्यांची मुळे त्यांच्या काळजात आहेत की तीच ओरीजनल हृदयं आहेत हे कळत नाहीये एमटीव्ही म्युझीकमध्ये कॉम्बो डुप्लिकेशनचा  जम्बो कारखाना निरंतर चालू आहे एटीकेट्समध्ये सभ्यतेच्या छत्र्या उघडत जो तो करतोय ग्लायडींग
           मला इथे यावंच लागतं बिझनेस डीलिंगचा ब्रेक थ्रू शोधत हिरव्या रंगाचे गालिचे मद्याने ओले करत डॉगवॉक करतोय चालीचा औदुंबरी झरा
           माझ्या हाताला जखम झालीये आणि मी ती लपवत हॅण्डशेक करतोय इंतरांच्या हातावरील जखमांबरोबर दारू न पिणारे माझे डोळे सर्पासारखे ऑप्शन्स शोधतायत पॅरलल ड्रिंकचा मला कोल्ड ड्रिंक्स वर्ज्य आहेत आणि सौजन्याचा मधला मार्ग इथल्या पेय व्यवस्थेत गोची आळवत बसलेला ग्लोबल रागात.
           मला गावात जाऊन शेती करायचीये पण आत्महत्या  पाठीवर टाकून जमीन कसण्याचे त्राण आता माझ्यात उरलेलं नाही. शेतीत रिटर्न नाहीये आणि इथे समोर डोंगराएवढा बुफे शेतकऱ्याच्या गांडीला बूच मारून
इथे सेलिब्रेट होणारा मेन्यू सहन होत नाहीये कपाळ तडकतय आणि भुवया  फाटतायत आवाज न करता
          हा उत्सव आहे की आचका
          हा डंका आहे की डंख
माझ्या जखमेतून  वहात चाललय लाल रक्त
आणि प्रकाशात नाचणारी बॉडीलँग्वेज शेकडो हातांनी माझं शरीर संपवत चाललीये.
***

                  गावातून आलोय म्हणून मूर्ख समजू नका मी एका हाताने लॅपटॉप चालवतो एका पायाने ट्रॅक्टर वा नांगर कम्प्युटर न येणाऱ्यांना अडाणी म्हणता मग नांगरणी न येणाऱ्यांना आम्ही काय म्हणावे ? की आम्ही पिकवलेलं अन्न तुम्ही म्हणालात म्हणून मार्जिनलाईज करायचं केवळ तुम्ही चिन्हसृष्टीची प्रिस्क्रीफान्स देता म्हणून ? तुमच्या औषधांनी बरे झाले नाहीत आमचे आजार आणि आता वेळ अशी आलीये की औषधे आयुष्यापेक्षा महाग होतायत फुल्यांपासून  शरद पाटलांपर्यंत कित्येकांनी दिली तुम्हाला Black Corner Notice पण तुमचे इंटरपोल असे भक्कम फेक खांबाचे की शेतकऱ्यांच्या  डेड बॉडीज ओळखूनही न ओळखता ते चालत राहिले false identity चे पाय घेऊन इन्वेस्टीगेशनच्या तरंगत्या डिस्कवर आता  किती काळ मांडायची ही बैठकीची लावणी
              Farming आणि Pharming ह्यांच्या दरम्यान चालून चालून थकत चाललेत आत्महत्या आमच्या आयुष्याच्या हा फायनल ड्रॉफ्टही वाचायला तुम्हाला वेळ नसेल तर काय गांडीत घालायची  तुमची टाईम मॅनेजमेन्ट
              तेव्हा मायबापहो
              काहीही करून तुमची आय घाला
             आणि ऐका
           
              शेतकऱ्यांच्या भाषा कळत नाहीत तुम्हाला
              म्हणून तुमच्या कॉस्मो भाषेत बोलतोय
               ही cool light फार काळ cool नाही रहायची
               एकदा Heat दार झाली
               की कानासकट बॉडी जाळंल
               तवा दमानं
               दोन घास खाता खाता
               कान इमानानं इतकं करा.ऐका .

             नाहीतर शाहिस्तेखानाची बोटे कापली
             तुमची  . . . . . . . . . .
         



******************************************************************************











































































































































No comments:

Post a Comment