Thursday, 10 August 2017

कॉम्रेड्ससाठी आणखी एक कविता

कॉम्रेड्स
तुम्ही एका अश्या झाडाची वाट पहात होता
ज्याला मुळे न्हवती
आणि जे आकाशापासून सुरु होऊन
आकाशातच संपले होते

अश्या झाडाला फक्त ढग येतात

तुम्हाला ते ढगदार दृश्य ढंगदार वाटलं
आणि तुम्ही ढगात गेलात
पोस्टमॉडर्निझम म्हणजे रूटलेस असणं
तिथून सुरु झालं

आता ढगांना स्थिर आकार नसतोच म्हणून
फॉर्मलेस सुरु झालं

इतकं प्रभावी झाड इतिहासात प्रथमच जन्मलं
आणि ते इतिहास वारण्याऐवजी
इतिहासच त्या झाडात वारला

आता History Is Dead अशी घोषणा
 भांडवल शाहीने दिली म्हणून
शेखचिल्लीच्या फांदीवर बसून का रडता आहात कॉम्रेड

उठा आणि उतरा

सगळे कॉम्रेड ह्या झाडावरून  उतरले कि
ह्या झाडाचे आभास  आपोआप नाहीसे होतील
मारा उड्या
एक.
दोन.
तीन

हिटलर , मुसोलिनी , स्टॅलिन आणि माओनंतर
जी गांड फाटून हातात आली
ती गांड म्हणजे पोस्टमॉडर्निझम कॉम्रेड

उलट्या पावलांनी मार्क्सवाद.
चालवला म्हणजे
स्टॅलिन माओ सुलट  होतील
असं कुठल्या पुस्तकात लिहिलंय कॉम्रेड

Text is created by text
म्हंटल म्हणजे
author नष्ट  होईल काय ?

हे साम्यवादाविरोधातले साम्यवादीच फ्रस्टेशन आहे
ह्याचा उमज पडेल काय ?

ऑथर टेक्स्ट जन्माला घालत नसून
टेक्स्ट ऑथरला जन्माला घालते
आणि माणूस व्यवस्थेला जन्माला घालत नसून
व्यवस्था माणसाला जन्माला घालते
असं म्हणणं ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत
हे तुम्हाला कळत नाही का कॉम्रेड

एक सेमिऑटिक कम्युनिझम आहे
तर दुसरा मार्क्सिस्ट कम्युनिझम
हे उमजून घ्यायचंय का कॉम्रेड ?

व्यक्तीला नष्ट करण्याची
ही गांडू मोहिम कितीकाळ
चालवणार  कॉम्रेड ?

मार्क्स  आता पांडू हवालदारसारखा
दिसायला लागलाय
इतकंही स्पष्ट सत्य
दिसू नये का कॉम्रेड

 इस्लामी टेररिस्ट आणि तुम्ही
ह्यांच्यात काय फरक राहिलाय कॉम्रेड ?

तुम्ही दास कॅपिटलचे दास
आणि ते कुराणाचे आभास

टेक्सट्स क्रियेटेड बाय टेक्स्टस ?

असं पुस्तक बनू नका कॉम्रेड

असं पुस्तकाचा विस्तार बनू नका

आपण माणूस आहोत

आपण हरलेलो नाहीये

आपलं पुस्तक आऊटडेटेड झालंय

भांडवलशाही विजयी झालेली नाही
तिचे पर्याय हरवलेत

या
पुस्तकातून बाहेर या
या
झाडावरून उतरून खाली या

आपण माळी  आहोत
आणि जंगल निर्माण करणे
आपल्या डाव्या हाताचा मळ आहे

या
माणूसकेंद्री सृजनशील हातांनी


*****************************************************************************




























No comments:

Post a Comment