Wednesday, 9 August 2017



गुरुवार 
श्रीवाहिनी श्रीधर तिळवे नाईक 
आरंभीचा टॉक                            न्यूजरूममधून                                                        
                    आम्ही तुम्हाला जे  फुटेज दाखवतो ते  तुम्ही कसे  पहाल ? हे पहा तुम्ही ते   अनुभवाल होय ना ? तर हा अनुभव ! तो सर्वाना येतो पण यापेक्षा आम्ही जास्त काय पोहचवू शकतो का ?
                    तुम्ही म्हणाल अनुभवाचे म्हणून काही उन्नत रूप असते का ?  तर होय ! अनुभूती ही अनुभवापेक्षा आधीक थेट आधीक टोकदार ! आम्ही तुम्हाला अनुभव देऊ शकतो पण आता तुमच्या आसपास पहा तुम्ही आणि तुमचे जग ह्यांच्या दरम्यान कुठले फुटेज आठवणींचे रेंगाळते का  ? रेंगाळते ना ? तर हे फुटेज मधेच बाजूला गेले आणि थरारलात ना ? तर ही अनुभूती मात्र अनुभूतीत थोडे फुटेज मनातले बरं कडमडतेच
                    पण हे फुटेज आतले  आणि बाहेरले सगळेच नाहीसे झाले तर ! सगळे तुम्ही थेटच अनुभवले तर आली ना प्रचिती ? आली ना ? नाही ? पण संताना मात्र ती येते बरं का ? किंवा निर्वाण प्राप्त झालेल्या बुद्धांना
                   तर ह्या आमच्या फुटेजचा अनुभव घ्या.
                   पण प्रत्यक्ष जगाची मात्र प्रचितिच घ्या.

आजच्या ठळक बातम्या 

               सर्व गोष्टी सापेक्ष असतात आणि त्यांचा अर्थ तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला त्या गोष्टीपासून काय हवे आहे ह्यावर अवलंबून असतो असे  पिटर जेफरसन म्हणाले. ज्या पत्रकाराने फॅब्रीकेटेड स्टोरी  रचली त्याला त्या गोष्टीपासून निश्चतपणे काहीतरी हवे असणार तर ते नेमके काय हे जोपर्यंत समजत नाही तोवर ही घटना उलगडणे कठीण असे ते म्हणाले. ह्याच घटनेच्या संदर्भात श्री वाहीनी भेटल्यावर चंद्रबाबा "आपण एखाद्या गोष्टीला काही देतो हीच एक दंतकथा असल्याच " म्हणाले.  आपण अर्थ देत नाही तर त्या गोष्टीला अर्थ प्राप्त होत असतो आणि आपण जे काही ह्या घटनेविषयी बोलू त्यामुळे ती गोष्ट अर्थ प्राप्त करत जाईल असे ते म्हणाले. प्रत्येक गोष्ट एका संदर्भ चौकटीत जन्मते, वाढते आणि मरते. ही गोष्ट रचलेली होती तर ती एका विशिष्ट संदर्भ चौकटीतच रचलेली असणार आणि आज ती एका संदर्भातच वाढत आहे आणि एका संदर्भातच तिचा मृत्यू होईल असे ते म्हणाले.

                 समाजशास्त्रज्ञ एन. कुरेशी ह्यांनी बाबरी मशिदी बाबत वेगळाच मुद्दा उपस्थित केला. जगाच्या इतिहासात मुसलमान समाजाने जेवढी मंदिरे तोडली व मुर्त्या फोडल्या तेव्हा तो तो समाज इतका निराश झाला नाही पण एक मशीद पडल्यानंतर मात्र मुस्लीम समाज प्रचंड निराश आणि उदास झाला. हे असे का झाले ? की मुस्लिम समाज एकंदर आयुष्याबद्दल निराश आहे आणि ही निराशा तो बाबरी मशिदीच्या घटनेतून व्यक्त करतोय ? मुस्लीम समाजाच्या ह्या निराशेला जबाबदार कोण ? प्रत्येकवेळी इतरांच्याकडे बोट दाखवून ही निराशा  नाहीशी व्हावी म्हणून इतका उतावीळ झाला आहे की तो आता काहीही करायला तयार आहे. त्याची ही तीव्रता चांगल्या गोष्टीकडे वळवली जायला हवी  आहे आणि हे असे वळवणे हेच योग्य पण मुसलमांनानी  मात्र निगेटीव थिंकिंग चालवले आहे इतर धर्मिय Pluralism चा स्वीकार करता असताना मुस्लिम समाज मात्र Monolism चा प्रचार करण्यात गुंतला आहे. हे चित्र नवीन पिढीचा मुस्लिमच बदलू शकतो त्याने आता आऊटडेटेड झालेल्या म्हाताऱ्या पिढीला फेकून Pluralism चा स्वीकार करणारा नवा मुस्लीम समाज घडवावा असे आवाहन त्यांनी केले.

               प्रिया नार्वेकर ह्यांनी सर्वांनी मिळून सत्य निर्माण करण्याच्या संकल्पनेचा निषेध केला. सत्याची सामूहिक अंबलबजावणी सुरु आहे. सत्याचा सामूहिक शोध सहज शक्य आहे पण सत्य सर्वांना एकाच जागी एकाच वेळी सापडेल ह्यावर माझा विश्वास नाही असे त्या म्हणाल्या. ते एकाला सापडेल व तो नंतर काही सेकंदातच ते दुसऱ्याला सांगेल त्यामुळे सत्याचा प्रसार प्रचंड वेगाने होईल आणि कदाचित ते सत्य संपूर्ण  तासाभरातच संपूर्ण जगाचेच होईल पण म्हणून तासाभरात संपूर्ण जगाने ते सत्य शोधले असे म्हणणे हे मूळ सत्य शोधून काढणाऱ्यावर अन्यायकारक होईल असे त्या म्हणाल्या. टेलिव्हिजन हे आजकाल तासाभरात जगभर सत्य पसरवते असं त्या म्हणाल्या अभिनयाचा आणि सत्याचा काहीच संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले शास्त्रज्ञाचा अभिनय करणाराअभिनयपटू व प्रत्यक्ष शास्त्रज्ञ ह्यांच्यात जो फरक आहे तोच फरक अभिनय व सत्य ह्यांच्यात आहे असं त्या म्हणाल्या.

               काल चुंबनतंज्ञाच्या झालेल्या परिषदेत श्री. शैव तांत्रिक ह्यांनी '' हल्ली काही लोकांचा "सत्य construct केले जाते " ह्यावर विश्वास असल्याने हे लोक आपआपली सत्ये construct करत आहेत '' असा दोन्ही गटावर आरोप केला. ''मीडियातून दिसणारे चुंबन हे सत्य नसून ते  constructed सत्य आहे आणि ते कन्स्ट्रक्टेड सत्य सत्याविषयीची अनेक  सत्ये construct करतय '' असे ते म्हणाले. माध्यमातून सध्या ह्या जोडप्याच्या चुंबनाविषयी जी सत्ये प्रक्षेपित होतायत ती पाहिली  कि भोवळ येते. प्रत्यक्ष संभोग करून झाल्यानंतर जेवढी ग्लानी येणार नाही तेवढी ग्लानी ही सत्ये ऐकताना व वाचताना व पाहताना म्हणजे अनुभवताना  येते असे ते म्हणाले. ह्या सगळ्यांवर माझ्या तोंडाची वाफ सॉरी माझ्या देहाची वाफ दवडवण्याऐवजी मी घरी जाऊन माझ्या बायकोचे चुंबन घेतो असे ते हसत हसत म्हणाले. त्यांच्या ह्या कृत्याने चुंबनतज्ञाच्यात मात्र संताप पसरल्याचे कळते.

             रवीबाबा ह्यांनी आज ''मी माझ्या भक्तांना कुठेच कधीच कसलेच सत्य दिलेले नाही कारण सत्य हे असे कधी देताच येत नाही ''असे सांगून खळबळ  उडवली. ''दिल्लीत भेटायला आध्यात्मिक पुरुष म्हणजे काही राजकीय व्यक्ति आहे का ? '' अशीही पृच्छा त्यांनी केली. सध्या जग हे एक सपाटभूमी बनलेली आहे आणि ह्या सपाटीवर एखाद्या सत्याने हजार वर्षे टिकाव धरणे हेच मुळी अशक्य असल्याचे ते म्हणाले. त्यांनी भक्तांना आज "जय सपाट व्हा अफाट " असा नवा मंत्र दिला.

                महाराष्ट्र ज्योतिषमंडळाचे प्रमुख श्री. अ. का. कुलकर्णी ह्यांनी ज्योतिष हे 'कृपा' असल्याशिवाय शक्यच नाही असे आज  सांगितले . वि. ना. कुलकर्णी ह्यांनी कृपा ही out of fashion असल्याने ज्योतिषशास्त्रासारख्या Postmodern science मध्ये कृपेला काहीच स्थान नाही असे प्रतिपादन केले. postmodern निराशेत  ज्योतिष हीच लोकांना एकमेव आशा  उरली आहे.  किंबहुना postmodern frustration मध्ये आशेला comeback मिळवण्याचे माध्यम म्हणून ज्योतिषाकडे पाहिले जावे असे त्यांनी प्रतिपादन केले. कला, विज्ञान, अध्यात्म आणि तंत्रज्ञान  ह्यांचा योग्य तो मिलाप करून ज्योतिष शाबूत राखता येईल असे ते म्हणाले.

                श्रीधर तिळवे ह्यांनी आज पुन्हा एकदा पोमोचा मृत्यू घोषित केला युरोपात जन्माला आलेल्या पोमोचा इंडियात मृत्यू घोषित करण्याचे प्रयोजन काय ह्या प्रश्नावर ते म्हणाले, "पोमोने विज्ञानाचा व वैज्ञानिक दृष्टीचा अंत घोषित केला आहे हे आपण नीट पहिले पाहिजे. आज भारताला विज्ञान व वैज्ञानिक दृष्टीची किती गरज आहे हे आपण जाणतो. विज्ञानाची मर्यादा जाणणे आणि विज्ञानाचा मृत्यू घोषित करणे ह्यात फरक आहे. वस्तुस्थिती अशी आहे. की आईनस्टाईनच्या Theory  of Relativity व हायझेनबर्गच्या Theorey of Uncertainty  मुळे अंतिम एकच एक सत्य शोधणाऱ्या पारंपरिक, सृष्टीय, क्षेत्रिय विज्ञानाचा मृत्यू झाला पण ह्याच दोन्ही सिद्धांतामुळे नवीन प्रतिसृष्टीय विशीय  विज्ञानाचा उदय झाला त्याचे काय ? ह्या नवविज्ञानाचा उत्सव साजरा करण्याऐवजी पोमो हा मृत्यू पावलेल्या जुनाट विज्ञानाचा मातम करण्यात धन्यता मानतो  म्हणूनच पोमोचा मृत्यू गेली काही वर्षे मी जाहिर करतोय. खरेतर नव्या विज्ञानाने आपणाला दोन गोष्टी शिकवल्या.
           १) सत्य हे सापेक्ष असते निरपेक्ष असे सत्य असत नाही - सापेक्षता !
           २) आणि ज्या जागी उभे राहून तुम्ही जे सापेक्ष सत्य बघता तेही अनिश्चित असते- अनिश्चितता ! सापेक्षता आणि अनिश्चितता पोमोने ह्या दोन गोष्टींचा गौरव करायला हवा होता पण त्याऐवजी मातम केला म्हणूनच पोमो इज डेड Let it die.सापेक्षता आणि अनिश्चितता ही  युनिव्हर्सल सत्ये  आहेत  का हे आपण काळजीपूर्वक तपासायला हवे असं ते म्हणाले
************************************************************************

फॅशन

           हे त्वचाळ युग हा वाचाळ काळ हे वखवखलेले क्षण हे वचावच करणारे धर्म हे वणवणणारे व्रण हे  सेलिब्रिटीज शोधणारे सण हा जाम करणारा तामझाम हा फ्लॅश होणारा फियास्को हा उरावर नाचणारा डिस्को.

             दुःख होणाऱ्यासाठी नाही रडण्याकरता जागा
             आसवे ढाळू पाहणाऱ्यांसाठी नाहीत एकांत देणाऱ्या बागा

              आहे  ते फक्त सेलिब्रेशन
               वांझोटे आणि गलेलठ्ठ

             फ्लश कर स्वतःचा गडगडलेला डोळा  कमोडमध्ये
             आणि चकाचक बेसिनमध्ये हात धुवून
             जाऊन बस  त्या डान्सफ्लोअरच्या वाटीत
             जिथे तुझी दहाही बोटे
             तूपतूपलेली असतील
           
             घीचा स्पेशल इफेक्ट घेत - देत
              निदान दिसतील.
***********************************************************************

कॉलेज कॉलेज

***********************************************************************

लव्ह ऑपेरा इन रुईया कॉलेज

वाढदिवसादिवशी

              छातीत शून्याचे शिंग खुपसून जखमातून उडून जातायत यमराजी  उच्छवास !  बकालीचा पासपोर्ट कुणीच काढत नाहीये तरीही ही पेशीपेशीत हतबलता ! सगळे पासवर्ड टाईमपासवर्ड ! भाषा ही गांडू आहे एवढच कळतय हजारो कविता लिहून ! होणाऱ्यांना होतायत प्रसूतीच्या वेदना आपणाला ऐन प्रेग्नसीतही गर्भनिरोधक  गोळ्यांचे भास.
             पोकळीला मिश्या  काढून निघून चाललय हे शहर !हलक्या कापसाचाही घण पडतोय उशीतून ! आजच्या झोपेचं  शरीर  सेक्सी आहे ही म्हातारं ? तिच्या ऍनकाँडावॉकमध्ये जेनिफर लोपेझचे घाटदार नितंब आहेत कि ननिर्मिती सावंतचे ज्योक ? तिच्या टुरटुरीत कुरबुर आहे की कुजबूज ? स्वप्नांची होते  आहे डॉल कन्स्ट्रक्शन  की मॉलकन्स्ट्रक्शन ?
             झोपेविषयी अंदाज करता येतात मात्र ते खरे की खोटे ह्याची आजमाईश होत नाही  डोकं दुखतय म्हणजे झोप मेंदूत  पादली बहुधा. ती सुगंधित करायला अनासिन घ्यावी की सॅरीडॉन ?
            उठून कुठं जावं ? कांदिवलीत कल्पनाकडं  की बाँबे सेंट्रलला सतीशकडं की मंगेश बनसोडच्या  हॉस्टेलरूमवर ? अभिधात आपलं व्यंजनात्मक प्रेत विखुरतय. प्रेतानंतरही पोकळी उतरतेच ! जन्मल्यावर खंत करावी की सेलिब्रेशन हे एवढ्या वाढदिवसानंतरही कळत नाहीये. मर्ढेकरांचा आणि आपला बर्थडे एकच त्याचाही मानसिक फायदा झाला प्रतिसादाच्या अभावाला तोंड देताना ! शेंबडा पोस्टमॉडर्निझम आता बोलायला लागलाय आपण त्यालाही धूप घातली नाही . इंग्रजांची सही तशी  आपल्याला कधी मानवलीच नाही त्यांनी दिलेले काही चेक कॅश करताना मात्र मजा आली भविष्यशास्त्राचा तळहाताला मिळालेला असाही फायदा ही बोटे टिकवताना आपण ब्रश  विकले  नाहीत हेही कमी नाही.
             चला वर्ष संपलं पूर्णविरामाचा  पारिजातक होत नाहीये पण खोलीभर  दरवळतोय  श्वासाश्वासाला कॉमा देत समाधानाचा परफ्युम ! तो आज वाढदिवसादिवशी नेमका कुणी आणून सोडला हे ३६५ वेळा त्याच्यात भटकूनही कळत नाहीये.

तो टोटल मारून टटोलतोय वाढदिवसाचे नवे कपडे
आणि आपला ३६६ वा नवा पाय
जुन्या ३६५ पायांना कापत
चालून येतोय.

************************************************************************
वाढदिवसादिवशी पबमध्ये
ही नेटवर्क रिलीफ कीट घेऊन कुठ चाललीयेस अक्सेस नसलेल्या ह्या शहरात ? इथे बायकांना सक्सेस मिळतं इंटरफ्लोटिंगच्या गॅरन्टीवर ! जिथे इंटरनेटही जडशीळ  होऊन पडलंय तिथे  तुझ्या त्वचेतून उसळणाऱ्या त्सुनामी नॉनअप्लिकेबल  आहेत. एक व्हर्टिकल टेक ऑफ घेऊन एका पुरुषांत लॅण्डिंग करण्याचे volantor दिवस  संपले पोरी. नजरांचा खेळखंडोबा जागर करतोय व्हर्च्युअल साफसफाईत !स्पीडकंट्रोल गुंग असताना डिरेक्शन कंट्रोल सुटला आत्मभानाचा आणि अहंकाराच्या अटीट्युड टेस्टस काईट  फ्लाईंग करत राहिल्या माऊसभर.
             bolero करता करता तमाशात घुसणारा महापुरुष तुला  चालत नाही तर मी काय करू ? तुणतुणं वाजवणाऱ्याला कायं तुणतुणं वाजवतोय  म्हणून उठता  बसता  खुळ्यात काढणाऱ्या तुझ्या फालतू मैत्रिणी !
त्यांच्या टोन्टसचा मॉडरेट टेम्पो तुला extremist वाटतोय हाही माझाच गुन्हा काय ? बीथोवेनच्या Bolero a solo Wo  D 158  बद्दल मलाही आदर आहे पण स्वतःच्या अभंगबाज चेहऱ्याचा द्वेष करायला मी अद्याप शिकलेलो  नाही.
               ही vishing ची व्हिशीयस   प्रॅक्टीस सोडून दे म्हंटल्यावर क्रेडीट कार्ड्स चाळवत चाळवत राग कशाला देतेस ? प्रेमाचं व्हेरीफिकेशन करणारा नमुना अद्याप कुणाला सापडलेला नाही १ हे इनफर्मेशन चघळणारे ओठ चुम्बनी करायला मला किती  चुंबक  लावायला भाग पाडणार आहेस हे दख्खनखणी फिल्डिंगगुणी बये ?
            रक्ताचं राजकारण करणारं हे शहर आणि रक्त सेलिब्रेट करणारा हा माणूसदाणा पब
             एकटीच आलीयेस तर दुकटी हो माझ्याबरोबर
             ह्या प्रकाशाच्या क्रिमीनल कोनफीगरेशनखाली दबून जाऊ नकोस फक्त हा हात ठेव माझ्या खांद्याच्या बाल्कनीवर आणि तुझ्या काळजाचा बाल्कन प्रदेश माझ्या काळजाच्या वल्ड पीस सेंटरमध्ये कायमचा भाषांतरीत कर नाचता नाचता तडफदार बेभानीत
             बघ एक बुद्ध त्याच्या आवाजाची  कॉईन पाडत येतोय शांततेचा निर्वाणवटीत
             त्याला ह्या शहराचा PIN विचारून क्षुल्लक  करू नकोस
             काही राजवटी राजधानी शिवायही चालू द्याव्यात पोरी
             माणसाचं वैभव फुलातही टिकू द्यावं

             थांब !
              नाच !
              उमलं !
**************************************************************************
क्रीडा स्पोर्ट्स 
विजयी खेळी खेळून नाबाद परतल्यावर : सचिन तेंडुलकरसाठी

त्याच्या केसातून मांजरे उडत होती म्याव म्याव करत

त्याचे कपाळ स्क्रीनवरचे सगळे आयकॉनस मिरवत
त्याच्या त्वचेची चमकदार पब्लिसिटी करत होते

त्याचे डोळे दोन मोबाईल्स चमकवत
ऑडियन्सशी सर्वांगाने बोलत होते

त्याचे कान अंड्यातून कोंबडी बाहेर यावी तसे मेंदूतून
बाहेर आले होते.

त्याची नजर आनंदाने दुनिया गिळत होती

त्याचे दात पांढरे हिरे चमकवत सफाई पसरवत होते
आणि त्याने पाणी पिण्यासाठी उचललेली बॉटल
ढगाखाली नाच करत होती

त्याच्या नाकपुडया सर्वशक्तीमानता झाडत फुगत होत्या

त्याची जीभ भाषेत तरातर चालत इंटरव्यू देत होती

त्याचे तोंड खेळलेल्या खेळीचा च्युईंगगम चघळत होते

त्याचे ओठं बँकेत चुंबन डिपॉझीट करत होते

त्याचे हास्य +ve thinking ची नोट सवांना वाचून दाखवत होते

त्याची डोकेदुखी लांब टांगा टाकत पळून जात होती

त्याच्या दातदुखीने विजय पेनकिलर म्हणून पचवायला सुरवात केली होती

त्याच्या पायदुखीने स्टॅमिना नव्या कॅल्क्युलेटरवर मोजायला आरंभ केला होता

त्याचे खेळीचे विश्लेषण मोटार इंजीन लावून पळत होते

त्याची मान पैलवानकीचा अंदाज घेत होती

त्याचे हात मधून आकाशात घुसत ग्लोवज नाचवत होते

त्याच्या भुवयाखालून मध रेंगाळत चालायला लागला होता

त्याचे हॅण्डशेक तरणेबांड रक्त वाटत होते

त्याची बोटे मजबुतीच्या खांबाखाली हातात उभी रहात होती

त्याचे तळहात नशिबला हसत हसत होते

त्याचे अंगठे डील साईन करत होते

त्याची छाती काळजातले आईवडील आणि गुरु  expose करत होती

त्याचे हृदय आयुष्य हाताळत रक्तात ठेवत होते

त्याचे स्तन घड्याळांना नव्या खेळीसाठी सेट करत होते

त्याचे खांदे शॉटसची धार हवेत उडवत होते

त्याची बेंबी वल्डक्लास क्षमतेची तंबी देत होती

त्याचे वृषण त्रिकोणाचा त्रिभुज प्रदेश समृद्ध करत होतं

त्याची कंबर सात  अंबरे शिलगावत होती

त्याचे पोट चिंतामुक्तीचे ढेकर देत होते

त्याच्या मांड्या अवघे मैदान कॅरी आउट करून ते हिरवळवत होते

त्याचे पाय पृथ्वी वाजवत तिला भक्कम करत होते

त्याचे गुडघे अलगद सॉफ्ट हालचाली आठवत झांजा वाजवत होते

त्याचे लिगामेन्ट्स सेंटीमेंटल होत फुले मसलत होते

तो आणखी एका विजयाची खात्री देत

टीव्हीत वितळत चालला होता

आणि त्याची बायको कालपासून सांभाळायला दिलेला

त्याच्या  आत्मविश्वासाचा श्वास

स्वतःच्या चिमटीत प्राणांतिकपणे पकडून

त्याने दिलेल्या  सुईवर

रुक्मिणीसारखी उभी होती



*******************************************************************************

कित्येक गोष्टी अंधुकश्या दिसतायत टिव्ही आल्यापासुन

प्रेयसीचा स्तन आईचे मन भावाचा धन बहिणींचा फन भाचीचा रन भाच्याचा
मित्रगण

सगळं अंधुक होत चाललंय धाकधुक शाबूत ठेवत

बायका सोप ऑपेरा  पाहतायत आणि अधूनमधून जेवणही

वाढतायत

पुरुष फेस्टीवल्स आणि कास्टिवल्स दोन्ही अटेन्ड

करतायत

पोरं कार्निवल्स आणि हॉर्निवल्स दोन्हि  एन्जॉय करतायत

जे जाहिरातीत आहे ते घरी कधी येतंय ह्याची वाट पाहतायत

सगळ्यांचे डोळे

जी सोप ऑपेरात आहेत ती सारी भांडणे प्रत्यक्ष घरात कधी

एन्ट्री मिळतीये ह्याची वाट पाहत दबा धरून आहेत

कौन बनेगा करोडपतीतच मौन आहेत करोडो पती

फक्त एक जीभच आहे जिला आपल्या जागी स्वस्थ बसता येत नाहीये ती तिला मिळेल त्या जागी

जाऊन बसतीये आणि फॅड काढून वाट बघतीये

तिचा डंख हीच इंटरवल

किंवा स्पिरिच्युअल ब्रेक

*********************************************************************************

प्रेमाची अँटिक गॅरंटी देण्याइतकं टिकावू  नाही माझं तारुण्य फेस बदलताच फेज बदलणारं

हे फॅन एज माझ्या त्वचेवर शिगेशिग उगवतय रक्ताचा नायगरा उभा करणारं व्हायग्रा रिलोडेड

मॅट्रिक्समध्ये संभोगाचं डिस्नेवल्ड मी बारा गोळ्या खाऊन टाकतोय आणि तू मरत नाहीस व्हायग्रालाही

दमवणारी हि टिकावू शरीरपद्धत तू कधी आतमसात केली हे ट्रीपलएक्सीनी?

तुलाही माहित आहे कि काही क्षणांनी फिरवणार आहोत आपण एकमेकांकडे हि प्रयत्न

करूनही लिजेंडरी न झालेली पाठ तरीही व्हायग्राची मदत घेऊन लांबवतोय आपण हे क्षणभंगुर

अमरत्व असं नाहीये कि मला ताठ होता येत नाही पण दीर्घकाळ कणे मजबूत करणारी हि इन्स्टंट

उपाययोजना आता सवयीची बनतीये आणि सोयीचीही

तू उफानत ब्लॅक होल खोलतीयेस आणि मी तारकांचे पुंजे हातानी तुझ्या स्तनावर ओतत

गुरुत्वात रक्ताच्या तहानपिसाट स्ट्रिंग्ज एक आकाशगंगा बनावत पांढऱ्या स्पंदानी तिला तुझ्यात

घुसवतायत. खुलासा! झकास! पासपास!

आपण एकमेकांचं मृत्यूपत्र एकमेकांच्या नावाने करून एकमेकांची बॉडी इस्टेट एकमेकाला

देत दिवाळखोर होतोय एक जुनं जंगल संपतंय. एका दिवाळीत आणि एक नवं जंगल उगवण्याची

तयारी करतय व्हायग्राच्या अनयुज्ड निळ्या कुंडीत


*********************************************************************************

पाठसुद्धा हाताशी लागत नाहीये ह्या पाठलागात सभोवताली करोडो खाणाखुणा आणि

लक्ष्यावधी मार्ग प्रत्येक खुणेवर दहा ट्राफिक माग काढावा तर कसा काढावा हातमार्गानी.

काय चेस करतोय तेही कळेनासं झालाय वेगाची किक अस्थेटीकली चढतीये स्टेशने

आरश्याला लटकतायत पण थांबावेसे वाटत नाही पायच झोलरकोस्टर झालेत आणि टायरमध्ये

झिरपलेत ड्रायविंग ड्रिंकमध्ये मिसळून ड्रायवर सीटवर बसलेले अंग बोलत राहतं मोबाईलवर अव्याहत

ड्रिंकिंग, ड्रायव्हिंग, टॉकिंग, कळूनसवरूनही वेगळे काढता येत नाहीयेत अपघात, गाडीवर सतत

टांगते पण हि टंग आणि आसपासच्या टग्ज एक ऑटोमनेजमेन्ट करणारी चावी हवी आहे काळजाला.

सेफ ड्राइविंगचे जाहिरातबोर्ड मेंदूत नीट नाचवणारी एक फिट नर्तिका हवी आहे डोळे शब्द वाचतात

आणि अलगद भाषेत सोडतात माणूस भाषा आहे म्हणणारे लोक सर्वत्र आणि भाषेची बेइज्जत

सार्वत्रिक जगण्याचं कॉस्ट इफेक्टिव्ह सोलुशन शोधणारे रक्त कटकटीत ब्रेस्ट कॅन्सरशी लढतंय

दिव्याखाली बसून वायरलेस प्रकाशात व्हाव्या ब्लूटूथ दातही किडायचे थांबत नाहीयेत मग आयुष्य

काय थांबणार? भुकेची रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेयंटीफाय होत नाहीये बस ताठणाऱ्या गोष्ट ताठतात

क्या कुल है हम म्हणत फ्रिजमधले पाणी इंटरवल म्हणून पीत जे गाडीत गरम झालय.

चेस चालू आहे चेस खेळतोय पाठलागाची ना पाठ दिसतीये ना तोंड तरीही पिच्छा पिच्छा

पुरवतोय सोंगळ्या घेऊन

I am driving while talking now. I will call you later when I talk to destination correctly.


बाय हनी
भाषा संपवून घरी परतेन

*********************************************************************************

  
बघता बघता


घरी आला नाही तोच
जो ह्या सगळ्यांचे हफ्ते भरायला
बाहेर गेला होता
**********************************************************


सॉन्ग्ज अँड पोएम्स

एक गाण कळलं  की एक माणूस कळतो 
एक माणूस कळला की आख्खी  मानवजात 
एक मानवजात कळली की एकच एक एकम 

अहो रूपमाचा ध्वनिमार आणि रोज कोसळणारा कवितांचा पाऊस 
फ़क्त मोबाईलच बदलतोय त्याचं  रूप 
आणि आपला ग्लोबल म्हणवणारा पाय रोमिंग रोमिंग करत 
त्याच घराच्या भाड़ोत्री चिखलात 

स्वत:च स्वतःला कधी कळलो नाही 
स्वतःत कधी संपूर्ण जळलो नाही 
गाण्यातला साधा नखाएवढा शब्दहि 
सॅटेलाइट लावूनही उजळला नाही 

दुर्बोधतेच्या मिश्किल स्माईलीज 
आणि एसएमएस मधून येणारे रोजाना छाटपुट जोक्स 

बत्तीस दात दाखवून 
थोडीच परतणार आहे ट्यूबमधून बाहेर पडलेली पेस्ट ?

हा पेशंसचा डाव एकाच खेळीत मिलियनभर पत्ते टाकणार 
आणि आपण दोन डोळ्यांनी वाचणार 
आंधळ्या डोळ्यांनी टाईप केलेला आपला ईमेल अड्रेस 

ज्या माणसाला दोस्ताना कळला नाही 
त्या माणसाला कसे पावावे हे हितसंबंध वळवत बसणारे गूगलबाज शहर 

कैंडल्स जळतायत कीजच्या 
आणि आपल्या आयुष्याचं  मेण 
शेण खात
भारनियम पाळत
विझलेल्या दिव्याचं  क्षेत्रफळ मोजतय

वेळ अशी आलीये
की का लिहितोय तेही कळत नाहीये 

कदाचित म्हणूनच कवी म्हणून शाबूत आहे 
आपलं  गावरान

हा जांगड़गुत्ता हा रंगबाजार हा रंडीसत्ता हा शेअरमटका 
हा प्रेअरझोल हा पैश्याळ नवस हा सेलेब्रिटीफंडा हा गंडीवफशीव दंडा 

जर गणपतीही मागतो कार 
 लायकी बघून भक्ताची 
वा रोलक्स घड्याळ प्रभोदवीत 
तर फ़क्त दोन पाय शाबूत असणाऱ्या भक्ताने 
कुठली वेळ साधावी 
बंद पडलेल्या घडीत 

जीभ कापून माझी 
रेकॉर्डिंग रुमकड़े चाललेल्या माझ्या नॉनकॅमेरेबल शब्दानो 

गा, ब्लॉगा, ब्लब्लागा 
पण उघड्या डोळ्यांनी,  नागड्या कानांनी ह्या आर्टिफिशल इंटीलीजीन्सच्या बागेत 

तुम्ही जिवंत आहात ही खबर कानोकान पोहचलीच पाहिजे 
सारे कान्स फेस्टीवल्स पार करुन 

*********************************************************************************

श्रीधर तिळवे ह्यांची पर्यावरणतज्ञाशी बातचीत 

: ही वादळापूर्वीची शांतता आहे का?

: शांतता हेच सर्वात मोठे महावादळ दुर्दैवाने ते फारसे कुणाला प्राप्त होत नाही. तिच्यात 
      ब्रह्मांड अनहत आवाजात घोंघावतं 

: मी झाडांना हात दिले 
    काटणारे मानवी हात रोखण्यासाठी 

: जमाना ' आज रोख ' चा आहे आणि झाड़े अनेकांना उधारीची गोष्ट वाटते ती उदया परवा 
     पुन्हा लावू आज रोख कशात तर झाड़े काटन्यात मग झाड़े कटणारच 

S : मी पक्ष्यांना मेटलिक स्किन दिली 
     मानवी हव्यासाच्या पसाऱ्यापासून  वाचवण्यासाठी 

: त्यांना त्यामुळे उड़ता येणार नाही आणि स्थलांतर न करणारे फारसे टिकू नाही शकत ह्या 
      आजच्या जगात 

S : मी वाघांना उडण्याची शक्ति दिली 
     शिकाऱ्यांपासून वाचवण्यासाठी 

A : पण उडाले तरी भूक लागणारच ना ? मग उडून येणार कुठं  ? मानवी वस्तीत ! म्हणजे 
      शिकाऱ्यांच्यातच ! म्हणजे उडाल्यामुळे ते माणसांच्या तावडीत सापडण्याची शक्यता 
       जास्त 

S : हे सर्व इंटरनेटवर घडलं फोटोपेजमध्ये 

A : मग ठिकय पण त्याने झाडांना, पक्ष्यांना, वाघांना फायदा काय ?

S : आता मी वाट पाहतोय 
      इंटरनेट माणसावर कधी चालून जातं ह्याची 

A : इंटरनेट माणसावर चालून आलं काय 
      किंवा माणसं इंटरनेटमधे चालत गेली काय 
      त्याने नामशेष होणे थोडच थांबणार आहे ?

S  : त्याला फ़क्त माझ्या कवितेला टच करायचय 
       मी वाट पाहतोय त्याला मांसल बोट फुटण्याची 
       जे माझ्या कवितेला टचटचीत टच करेल 

A : What an hot rounder style !    

S  : कविता इंटरनेटच्या पोटात 
       सुहागरात्रीची वाट पाहतिये 

A  : म्हणजे कवी आणि कविता एकुणातच निरोपयोगीच म्हणायचे झाडांच्या, पक्ष्यांच्या,
       पशुंच्या, संरक्षणाच्या संदर्भात

*********************************************************************************

IRREGULAR  INTERNET 

Me : What I thought as great appearance
         was just guest appearance

You : Indian English Is simulacra
          to cover up the absence to
          appropriate English

Me : Why is boobing boobs honey 
         Waiting for sugarcane?

You : Everything is fabricated. It means fabric is real !

Me : Staggering In Web?

You : Signs Everywhere
          but lack of signature

Me : Sense of inarticulateness
         be polite and patient

You : You mean polish ?

Me : Weightless body of silent accents
         moving moving moving and die

You : But I am not talking

Me : Dyeing?

You : Its killing man

Me : I mean on websheet
        I mean it's webshit on websheet
        I webmean its webshit on websheet
        I webmean webit's webon websheet
        Webi webmeans  webit's webshit webon websheet  

*********************************************************************************

मोबाईला मोबाईला                     
एकावन्नवा शेवट 

मोबाइल बोलतयात 

जे शब्द त्यांना पुरवले गेले 
ते उच्चारत 

ते माणसांना अर्थ देतायत

जे अर्थ माणसांनी त्यांना दिले होते 

प्रत्येक वाक्य 
आसपासच्या वाक्यांना अर्थ विचारत
आणि अर्थ पुरवत प्रकट होतंय 

 भाषा सर्व अवतार पहात 
चकित होतीये 
आणि तिचं  चकीत होणही
नविन वाक्ये  प्रकट करतय 

शब्द ब्लर होतायत ब्ला ब्ला होतायत 
ब्लू ब्लू होतायत ब्लो ब्लो होतायत

ब्लॉ ब्लॉ होतायत ब्ल ब्ल होतायत
ब्ली ब्ली होतायत ब्लौ ब्लौ होतायत
ब्लै ब्लै होतायत ब्लै ब्लै होतायत
ब्ल ब्ल होतायत blah blah  होतायत

त्यांना अहम ब्रम्हास्मि व्हायचय
आणि ते अहम ब्लम्हास्मि होतायत
त्यांना कळत नाहीये
हा दोष त्यांचा आहे की मोबाईल्सचा

भाषा मॅनेज केला गेलेला इवेंट होतीये
किंवा eVENT होतीये किंवा EVENT होतीये
किंवा event होतीये किंवा evEnt होतीये
किंवा EVeNT होतीये किंवा VNT होतीये

कुणालाच माहित नाही
हे Eventure कुठं घेऊन जाणारय ?

मोबाईल मोबाईल बा मोबाईल बामोईल
मोईलबा मोईबाल बाल बाईल बा मो ई मोब, मॉब, बाई
मोबाईल मोमो बोबो ईइ लल
बोलतायत

।। बावन्नावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
त्यांना कळत नाहीये की
ते इफेक्टीव बोलतायत की डिफेक्टीव

आजकाल डी ह्या अक्षराचा महिमा
असा काय वाढलाय
की लोचक 'डी' गॅंगला घाबरायला लागेलत

Deconstruction- Decast- Demand
Destable- Distraction- Denude

मेम्बर्स वाढत चाललेत

त्यामुळे जे Defective आहे
तेच effective ही वाटायला लागलंय

माणसे युद्ध जिंकतायत- केवळ D इफेक्ट आणि स्पेशल D इफेक्टच्या आधारे
आणि एकटीच घरी परततायत

माणसे नवरा / बायकोशी बोलताना एकटी होतायत
माणसे आईवडिलांशी बोलताना एकटी होतायत
माणसे मुलाशी बोलताना एकटी होतायत
माणसे मित्राशी बोलताना एकटी होतायत
माणसे नातेवाईकांशी/ बॉसशी/ नोकराशी
कुणाकुणाशी  बोलताना एकटी होतायत

माणसे
जी प्रत्यक्षात एकमेकाशी नीट बोलू शकत नाहीत
मोबाईलवर एकमेकांशी बोलून
नीट होण्याचा प्रयत्न करतायत

मोबाईल बोलतायत
Faceless, Voiceless, Senseless, Selfless, 'I' less
Topless, Bottomless, Headless, Heartless
Lessless.

।।त्रेपन्नावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
मी आणि बाई
ल लागलेत
ई........ e .............

।।चौपन्नावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
मोरूचा
बा

बोलतायत

।। पंच्चावन्नवा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
पंचा
पंच
पंचीग
पंचांग
त्यांना पंचावनवा शेवट
सापडत नाहीये

।।छप्पनावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
"अबतक छप्पन"

।।सत्तावनवा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
'सत्ता ' शेवट करावा म्हणून

।। अठ्ठावनवा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
अठ्ठा सट्ट्यावर लावत

।।एकोणसाठवा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
घाबरून
त्यांना आता लवकरच 'साठी' लागेल म्हणून

।।साठावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत

कळत नाही कॉल्सनी कधी गाठली साठी
स्क्रीनकपाळावर नाही तरी शब्दांची आठी

बोलणे संपले आहे असे बोलताना वाटते तोच
आणखी काही कॉल्स लागतात आमच्या पाटी

मोबाईलवर बोलणाऱ्यांनी गझल लिहावी की नाही
उत्तरआधुनिकता उमटली नाही पुरेशी ललाटी

ज्याने कॉल केला तो तर मरून गेला
मोबाईल शोधतो आहे त्याच्यासाठी ताठी

इतके लिहून झाले तरीही कळत नाही
की हा साठावा शेवट की ही शेवटांची साठी

।।एकसष्टवा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
तुम्हीही बोला

हॉट कूल कोल्ड बोल्ड थ्रीशोल्ड

आईशी बाईशी शाईशी ताईशी घाईशी खाईशी

पाईपाईची वसूली कर

फुगीर बधीर अधीर गंभीर काफीर फिरा

अडथळे गोतवळे श्रोतावळे आवळे विळे भोपले पार करत
प्रवास वनवास हव्यास सुवास मधुवास साजरे करा

टांगात फाका वक्षात वाका दारूत झोका काळजात  ठोका

बोला आणि खोला बोला आणि डोला बोला आणि टटोला

प्रिपेड पोस्टपेड हाफपेड फुलपेड झाडं लावा

।।बासष्टवा शेवट ।। 
मोबाईल बोलतायत
बोलता बोलता विचारतायत
"जागृती झोपेपेक्षा खरोखर श्रेष्ठ का ? का ?"

"इतिहास अस्तित्वात कशाला हवा "
"वर्तमानातच जगायचंय हे कळाल्यावर ?"

"Drafts, Mystry
Installation of fame
Under the falame
or  Under the blame ?
or Framed "

।। त्रेसष्टवा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
माणसांचा ड्रेस घालून
Fashion of Nothingness Passion for Everything Buddhas without God writs that God is unnecessary evil with civil intentions intensifying batchlorhood in wood celebrating in utter peace or piece or in awe of paw

Who is in exile                Mobile ?
Oh Not Again                  This bloody pain
Out of Order                     Disorder
Arrange this means disarrange everything than  this
forget yaar                        Bliss ! Bliss ! Bliss !
bliss of talking
oh Fuck me Oh Oh Oh
Hold it Behold it Suck Fuck Chuck Aha !
At Last- Aghast !

।। चौसष्टावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
श्रद्धेने
श्रद्धा ठेवा
श्रद्धा सगळं घडवते पर्वत हलवते
आणखी काय काय हलवते?

बस्स श्रद्धा ठेवा
श्रद्धा कामाला येते
श्रद्धेमुळेच कामे होतात

अर्धा डझन श्रद्धा
एक डझन श्रद्धा
श्रद्धा श्रद्धांशी बोलतायत
शब्द ही अंतिमतः श्रद्धा  आहे
म्हणून तर देवाचे शब्द प्रेषितांचे शब्द

श्रद्धेने वाचले पाहिजेत
श्रद्धेने ऐकले पाहिजेत
श्रद्धेने बोलले पाहिजेत
शब्द संशयास्पद झज्ञले तर
देव संशयास्पद होणारे नाहीत काय ?
श्रद्धा ठेवेल
त्याला देव हवा तसा मोबाईल पाठवेल

त्या मोबाईलवर हवे तेवढे बोला
अनलिमिटेड टॉक टाईम
पेड बाय देव

मोबाईल बोलतायत

।।पासष्टावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत
माणसे त्यांना खिश्यात घालून फिरतायत
माणसे शाबूत आहेत

।। सहासष्टावा शेवट ।। 
मोबाईल बोलतायत
त्यांना कवींची नावे माहित नाहीत, त्यामुळे काही बिघडतय असं त्यांना वाटत नाही त्यामुळे त्यांचे काही बिघडतानाही दिसत नाहीये
गर्भपात, इराक अमेरिका वॉर, टेलिव्हिजन, हिंदी सिनेमे, शाहरुख खान, ऐश्वर्या रॉय, सानिया मिर्झा, मॅकडोनॉल्ड, इंडिया इज शायनिंग, कंट्री विथ मेनी गॉड्स बट विदाउट  वन कनफर्म गॉड, बॉस, साईबाबा, बालाजी, टक्कल, बोलायला चिक्कार विषय आहेत.

मोबाईल त्यावर बोलतायत
त्यांना कवी कुठेच दिसत नाहीत
कवी इराकमध्ये नाहीत
कवी ट्वीन टॉवर्समध्ये नव्हते
कवी जागतिकीकरणाची policy ड्रॉफ्ट होत होती तेव्हा नव्हते
कवी इवन निरुपद्रवी दहशतवादीही बनताना दिसत नाहीयेत
कवींच्यावर काय बोलायचंच ?
इंडियात काही त्यामुळे प्रतिष्ठा प्राप्त होत नाही
अजून पिक्चर्स पाहून संपत नाहीत
मग कवी कधी वाचायचे ?
जे न देखे रवी  ते देखे कवी
कवी  ज्यांना बायकोचं  काय चाललय तेही कळत नाही ते सूर्य काय पाहणार ?

                     कवींना एकतर ह्या युगात टोप्या घालता येत नाहीयेत किंवा कवी पूर्वी टोप्या घालायचे आणि लोक फसायचे आता लोक शहाणे झालेत त्यामुळे ते कवींच्याकडून टोप्या घालून घेत नाहीयेत.
कवीनी नवीन युगात टोप्या घालण्यासाठी सेल्समन शिपची नोकरी करायला हवी
           
           कवींना बहुधा मोबाईलवर त्यांच्या कविता बोलता येत नाहीत.
म्हणून Poets are replaced by Mobiles
मोबाईल्स बोलतायत किंवा
असे म्हणा
मोबाईल्स कविता वाचतायत   

।। सदुष्टाचा शेवट ।।
मोबाईल बोलतायत - माझ्याशी

मै और मेरा मोबाईल अक्सर ये  बाते करते है
हम और दुनिया एकसाथ सायबरटेनिक हो जायेंगे तो ये होता वारे होता या वो होता एक साथ होते तो इस इलेक्ट्रॉनिक बाजारमे शांती को प्रोग्राम करके हम बिसलरिका पानी पिते पीते नदीकी शुद्धता को छूते Back to Nature का ड्यूयेट song ए. आर. रेहमानसे कम्पोज करवाके सेमिऑटिक जंगलमे गाते इंटरनेटसे दुनिया जंटल बनाते और हंसते
मगर ये हो  न सका
और अब ये आलम हैं कि
दुनिया, दुनिया का गम और उसकी जूस्तजूभी नही
गुजर रही है जिंदगी कुछ इस तरह
इसे किसी माउसकी आरजुभी नही
मी आणि माझे मोबाईल
अक्सर ये बाते करते है

।। आडुसष्टावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत - बोलू देत
आपल्याजवळ मोबाईल नाही म्हणून काय झालं ?
माझ्या जवळ M. TV. साठी लिहिलेल्या घोस्ट रायटिंगचे पाचशे रुपये आहेत.
चाळीस रूपयाचा आटा घेऊ. वीस रूपयाची भाजी, गवारी मला आवडते. तुला ? ठीक ! भेंडी घेऊ. पंधरा रुपयाची उडपी फिल्टर कॉफी पिऊ. शंभर रुपयाचा कवितासंग्रह. तुझी हरकत नसेल तर. शंभर रुपये ज्याच्यासाठी टाकावे असा कवी  कुठे आहे ? आहेत आहेत. ऐकीव माहितीवर  विश्वास नको ठेवू, बेस्टसाठी वीस रुपये. वेटरसाठी टीप सोडूया का ? मराठी माणूस टीप सोडत नाही अशी अफवा आहे ती  मोडायला ? अफवा मोडणं हे कवींच  काम आहे. सॅंडवीच मागवू का ?  चौदा रुपये ! थोडा थोडा चिल्लर खूप उरतीये ती उरते, वाजते आणि त्रास देते. पास संपलेले नाहीत अद्यापहे बरंच. एक पिक्चर टाकूया  का ? अरे हो विसरलोय  केबलवाला बाकीये  उरलेले त्यालाच बघ मोबाईलशिवायही दिवस जगलोच ना त्त ?
जगलो ना ?
_________________________________________________________________________________



लव ऑपेरा इन दहिसर


रक्त उपसुन संपलं तर ह्रदयपुरवठाच सुरु झाला थेट
आता ज्याला रक्तहिन क्रांति करून निर्वाणाला पोहचायचय त्याने काय हमामा खेळायचा ?

मेंदूला कोऑपरेटिव चळवळी कधीच झेपल्या नाहीत
त्याने फ़क्त अवयव कॅपीटल म्हणून वापरले आणि त्यांची उपयोगिता  भाड्याने देऊन तो सामाजिक झाला.

काउंटरवर साक्षात परमेश्वराला ठेवून
जो सिटीस्कॅन स्कीनमधून अवघे विश्व उलाढालतो
त्याच्या ढोलतमाश्यात
तुमचा रोल
ढील देणाऱ्या हाताच्या दयेवर चालला तर आश्चर्य ते काय ?

पायापुढे  हायवे नव्हते म्हणून लोवे उपलब्ध  होतायत काय ?
डोळ्यापुढे बिगशॉट्स नाहीत म्हणून स्मॉलशॉट्स अवेलेबल होतायत काय ?
नाकापुढे डीपब्रीदिंग नाही म्हणून झीपब्रीदिंग हवेतून सरकतय काय ?

हे आयुष्य सरतेशेवटी साऱ्यांनाच गंडवून जाते आणि मागे उरतात ते फक्त गंडे आणि तावीज.

आपला भूतकाल आणि बंगाली जादू करणारा बाबा ह्यांच्यात चष्मदीद फरक काय ?
कोई लौटा दे मेरे मरे हुए दिन ही भानगड काय आहे ?
भविष्य नसणाऱ्यांनाच फक्त भूतकाळ सुचतो काय ?

रात्री वनस्पती कार्बन डाय ऑक्सॉईड सोडतात म्हणून तर रात्री झाडावर भुते असतात
आता प्रत्येकाच्या नशिबी रात्री प्राणवायू सोडणारा पिंपळ कसा लिहायचा ?
नवजात अर्भकाला रिप्लेसमेंट म्हणून गाईचं दूध चालतं
पण गायीच्या वासराला रिप्लेसमेंट म्हणून कुणी माणसातील आईचं दूध पाजलंय काय ?

इकोफ्रेंडली गप्पा गॉसिप वाटण्याचा काळ आलाय
आसपास आता फक्त फॅशनचा तामझाम आणि चार दिवसाची चांदणी


मच्छरदाणी ओढून घे

हाताच्या अंतरावर आहे तुझ्या हृदयाची वाट लावणारा डास

********************************************************************************

कुणाचा खून झालाय माहीत नाही
पण एका कोल्ड वॉरची सुरवात झालीये हे निश्चित

आपल्या घराचा आकार
जसा हवा होता तसा घडत नाहीये

भिंती निष्कारण गरम होतायत
आणि फरश्या विनाकारण थंड

काहीतरी आहे जे रक्तात दाखल झालंय

अवशेषांना पहिल्यासारखा तुझा मधुर वास नाही
इतिहासात ती जुनी तुझ्या चेहऱ्याची निरागसता नाही

लोकशाहीच्या करारावर अचानक उगवतायत
इंदिरा गांधींच्या आणिबाणीतील दहशतवादी सह्या

प्रेम अंतिमतः हुकूमशाहीच बनतं का ?

पॉवर गेम इलेक्ट्रिसिटी खातायत

सेफ पॅसेज काढायला जावं तर फेक रिलीजन वाट अडवून उभा
श्रद्धेचा फाटफटपसारा वाढता

आपल्या ह्या घराचे भविष्य सुरक्षित आहे का ?

आपण एकमेकांच्या हातांकडे संशयाने पहायला लागलोय

आपली बोटे empirical short comings
आणि vatic conclusions नी त्रस्त आहेत

आपल्याच घरात आपण isolate होतोय

कम्युनिझम मागणाऱ्या  हालचाली
आता भांडवलाच्या व्यवस्थापनात मग्न होतायत

त्यांनीही स्वीकारलीये समाजवादाच्या मृत्यूची संहिता
घरात दाखल झालेली

उदारीकरणाचा अर्थ एक कोकोकोला शेअर करत पिणे
एवढाच काय ?

भूतकाळाच्या आठवणी ओरिजन्यालिटी देऊ शकत नाहीयेत
समकालीन वास्तवाला

वास्तवस्त्राव सुरु आहे
कुणाचा तरी खून झालाय
पण कुणाचा

मॅनिफेस्टो सेट करून करून गात्रांना येतीये ग्लानी
वसंत गांजा पिऊन प्रत्येक फुलाची अफिम बनवण्याच्या चक्करमध्ये

हे मिशनही impossible आहे
हे तुला आणि मला पुरत ठाऊक आहे
नशेच्या आधारे राजकारण उभं राहू शकतं
प्रेम नव्हे

present बद्दल प्रॉब्लेम हाच आहे की
ते Live telecast असते
Nuclear Terror आसपास
Nuclear Weapons दोन्ही पार्ट्यांकडे
नागासकी व हिरोशिमा वर बॉम्ब टाकणाऱ्या देशात
तुला जायचं आहे

जा

हात कुणाचेच बांधले गेलेले नाहीत - पायही

माणूस म्हणजे वाळवंटातला  गव्हाचा दाणा

तू मला शोधणार कशी ?

इंटरनेटच्या  वाळूच्या बडेजावात
जे बदलायला तयार नव्हतं
ते बदलण्याची इच्छा करत दबा धरून
जनावरांच्या पावलांनी किंवा माणसाच्या पावलांनी
Application नुसार

दंतकथा मरण पावलेत- लिजेंड होण्याआधीच
दातापासून दाताकडे जाण्याची शक्यताही संपत चाललीये

सात दिवस दे
फक्त एक महिना दे
फक्त एक आठवडा

मी तुझ्याकडे  काळ मागतोय
मी समाजाकडे  पैसे मागतोय
दोन्हीही मिळत नाहीयेत
म्हणून फसवणूकीचा गोरखधंदा काढून बसावं का ?

माझे  नकारमासे तुझ्या फिशटॅकला सहन होत नाहीयेत

पूर्वेकडून येणारे प्रकाशही
आता फेंगशुई  मागतायत

फक्त माहितीचा साठा साठत

ह्या साठ्यांच काय करायचं ?

पुरवठा - साठा - पुढे काय ?

फक्त फीडबँक  पुढे काय  ?

दगडात शिकार मॅनेज करून मध मिळेल काय ?

मानवतावाद म्हणजे स्वतःला केंद्रीय स्थानी आणण्याचे राजकारण
आपण मानवतावादी होतो आहोत काय ?
होतो काय ?
आपण मानवतावादी काय ?
आपण काय ?
पण..... ..... काय ?

पण

Archaeology नेही recover नाही झालो आपण
फुको फुकाचा खटाटोप
फुंक आली उडून गेला

संध्याकाळी उदास इतिहास
शुभ  प्रभातची expiry date उंबरठ्यावर उभी

मार्कर नसलेलं मार्केट
आपणाला घाई नव्हती
पण तरीही त्या भेटीची मृत्यू झालाय

झपाटाच असा की
कोसळफन बाजारात तुम्हाला उलथी पाडणारी
उठा, विकासा आणि विकत घ्या
कमॉन फास्ट

माझ्या घरात ह्या मार्केटची A B C D ही नव्हती
आणि तुझ्या घरात थेट CD

बाप कम्युटर इंजिनिअर असल्याचा कॉस्मो फायदा

वायदेबाजार वाकबगिरी
"पोकळ शाश्वतेबरोबर वाहात जावू काय ?"

"नको जाऊस असाच अपयशात मर "

"लोक बुद्धीच्या मार्गाने  सत्ताच मिळवतायत
मग बुद्धीवादावर विश्वास कोण ठेवेल ?"......... "

"टेररीस्ट होऊ का "

"पैसे येत असतील तर ते ही चालेल sorry हे मी बोलायला नको होतं  ....... पण काय करू ? अभाव "
"काहीही " म्हणवून घेतो "

"हो अभाव काहीही करवून घेतो "

"पण हा अभावाचा फील का ?"

"आपण imcomplete आहोत आणि ते आपणाला सहन होत नाही "

"टेन्शन फ्री होण्यासाठी काय करू ?"
"फ्री हो "
"म्हणजे मी तुला फ्री मिळेल हो ना "
"हे असं होतं आर्थिक आणि राजकीय "

मी मार्केटमधून drop-out झालेला स्टुडंट आहे
तुला हे कळत नाहीये

मी माझ्या न्यू कॉलेजमधील नलवडे सरांच्याबद्दल बोलतोय
"त्यांनी मला नेक्स्ट अमर्त्य सेन म्हटलं होतं
आणि मी Economics सोडलं तेव्हा थयथयाट केला होता."

"Half welfare and fullfresh pulpfiction पण मग
तुझी ती active spirituality कुठंय ?"
"मुद्दामच वाट भडकवत ठेवलीये "

"You are always half hearted every time. Some time I feel you have not complete heart जरा दिल तो दिखा. oh.......Half-backed also तेरा कुछ नही हो सकता गधे "

"There were two types of post modernity First Capitalistic postmodernity which stood against socialistic Monopattern & Socialistic postmodernity which stood against imperialism, colonislism monopatterned "

"ह्या डिस्कशननं आपलं नातं सुधारणार आहे का ?"

"सगळे डिस्कोर्स शेंगासारखे फटाफट फोडून खाल्ले
आणि ही माझी हृदयस्वामिनी आता मला विचारते आहे
महाराज ही फोलपटं कुठल्या डस्टबीनमध्ये टाकू ?"

"हा terminological nonsense बंद कर "
माझा नवरा न झालेल्या  गृहस्था
नाहीतर मी तुझ्या मित्राबरोबर पळून जाईन "

तू improvisation ला काही चान्सच देत नाही
सगळं Text concrete करण्याचा हा हट्ट का ?"

"राजहट्ट, बालहट्ट, स्त्रीहट्ट आपल्या संस्कृतीत क्षम्य आहेत चल जेवायला बसू मी जेवण करते तू भांडी घास "

बॉर्डर्स क्रॉस केल्या जातायत पण गॅप मिटत नाहीत

आपण कुठं चाललोय ?

आजही माझ्या ताटात मिठाचा अनपेक्षित मोठा खडा
सर्वत्र विरघळलेला
आणि मी चकार शब्दही न काढता खारट हातांनी
भांडी घासतोस

FACE TO FACE 
आयकॉनीक होत चाललेला प्रत्येक हंगाम
शेतकऱ्यांच्या आत्महत्येची साईट अवेलेबल नाही
कामगारांनी खुदकुशीची पाठवलेली नोटीस गुल

काळ शेफारलाय की शरीफ झालाय ?
तारिफ करून तरफ बांधणारे हात

कॉस्मोग्राफीच्या अवाढव्य उलाढाली
सेंटीमेंटल वाटतायत
कमर्शिअल परमेश्वराच्या सगुण मार्केटप्लेसमध्ये

धर्मांतर झालं हे नक्की
चिन्हांतर झालं हे नक्की

मतपालटीचा अमोघ राजकीय चमत्कार
घड्याळ बांधून हिंडला
काळाच्या शंभर कोटी एक्स्पायरी डेटपैकी
एकीशी डेटींग करून

हे सेटिंग कुणी लावलं माहीत नाही
अडाणी लोकांनी केले मॅचफिक्सींगचे आरोप
आणि मॅच फेकणाऱ्यांनी
सर्वांना फेक ठरवत
उभा केला
अस्सल सेंच्युरीबाज स्कोर

आता तेंडुलकरच्या बॅटीवर माझे ब्लॅक कॅट
कुंबळेच्या स्पीनवर माझे जे जे स्कुलिंग डीन

चित्रं स्मगल करणाऱ्यांनी स्मगल  केली
इथली फांदेबाज सरंजामशाही
आणि फाईवस्टार हॉटेलं विसावली
महाराजांना  वेटर म्हणून मॅनेज करत
लकलकनाऱ्या नक्षत्री महाराजवाड्यात

हे युग आलं
आणि त्यानं माणसाला बहाल केली क्लोनिंगची कित्येक युगे

ना ओमशांति ना गर्दशांति
ना हिरॉईन ना हेरॉईन

नशा अरेंज करणाऱ्या रेव्ह पार्टीत
कुठे घेऊन जाऊ माझे रेव्हरंड पाय

माझं लगेज ग्लोबल होत चाललय
आणि पृथ्वी
आख्खा ग्लोबल वॉर्मिंगच बील
माझ्या नावाने फाडून
हिमयुगात पसार

FROM PUB 

लोकांना हवीये ऑटोबायोग्राफीकल फोटोरिअलिटी किंवा फॅन्टॅस्टिक ड्रिफिक्शनॅलिटी लोकांचे डोळे स्वप्न पहात नाहीत स्वप्नाचा भाग बनतायत लोकाचं नाक सुगंधत नाही अत्तरतं लोकांचे ओठ शब्दातही लीपस्टिकची शेड शोधतात किसच्या आवाजात लोक कानात एमपी थ्री लावून आवाजाचा वन टू फोर करतायत लोक केसात  ढग उडवतायत शाम्पूच्या दोऱ्यात लोक एकमेकात ये  जा करत एकमेकाला रचतायत काल्पनिक  हातांनी

आपण आहोत लोकांची रहदारी
कधी तुझ्या दारी कधी माझ्या दारी

मला येऊ दे तुझ्या हृदयात
थेट ! एकदाच !

हा लोक नावाचा सार्वत्रिक प्लग काढून
प्रायव्हेट आणि अनलिमिटेड
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Womenapause च्या कॅच २२ सिच्युएशनस ह्या देहात लॅण्ड व्हायला खूप वेळ आहे मी वूमानायजर कधीच नव्हतो पण फर्टिलिटीच्या अंतिम तऱ्हा मात्र तिच्यातच भोगल्या आता कळतय की संभोग ही काही फार मोठी कॉस्मॉस ऑर्डर नाहीये नर आणि मादी ही फाळणी फार आदिम आयडेंटटी क्राईसीसची आद्य सुरवात आहे.
विश्वालाच माहीत नाहीये ते स्त्री आहे की पुरुष

सौन्दर्य वाचून रोमँटिक होणे फार सोपे आहे तुझ्या मानसिक छातीला स्तनांच्या रोमान्सात डान्स करण्याइतकं टिनएजर राहिलेल नाही आपलं Made to disorder रक्त ! लिंगसुद्धा बिल्डींगसारखं खडं करू पाहतं हे हायवे हृदय ! सगळं कसं छिन्नविछिन्न होत चाललय चित्रविचित्राच्या ओबडधोबड अंगरंगभंगात ! रात्री सेक्सबॉम्ब टीकटीक करतात आणि सकाळी बॉडीमध्ये डिफ्युज झालेले सापडतात. अध्यात्माचा  राजहंस कुठले कोल्ड व्हायरस घेऊन उडतोय स्पेसलगेज मॅनेज करून ? एक अगली मॉन्स्टर सॅच्युरेटेड फॅट्स मॅच्युरेटेड करत चाललाय इमेल्स ऑफिसमधला एक तास वेस्ट करतायत असं आता तुला इमेल करताना वाटतं सिगारेट आणि कॉफी ह्यांच्या मधोमध उभी असणारी तुझी आठवण आता रुटीन चेहरा करून हसते एक्साईटमेंटच्या शोधात असलेली कम्युनिकेशन्स आता बालहट्ट वाटतायत एकेकाळी मी फक्त तुला पाहण्यासाठी तुझ्या बॉसला भेटायचो आता बॉसला भेटायचं असलं की तुला भेटतो तुला वाटतय हा उमेनॉपॉज आहे पस्तीशीत रक्त गुंडाळणारा हे तसं बरंच आहे  की माझ्या नोज सेल्समधली भगवी वस्त्रे तुला माहीत नाहीयेत खरेतर आजच्या पॅरीस सेंटनं भारावलेल्या फॅशन युगात ती पुरेशी पॅशनेबल राहिलेली नाहीयेत त्यांचा गंध नाकाच्या खाली सरकणार नाही ह्याची  काळजी घेणारी टंग सेलमधली भाषिक फळी मात्र गेली दोन महिने बेपत्ता आहे.

मला कळत नाहीये ती माझ्या देहात आहे की देहाबाहेर ?
तिचा गेस्ट डिसअपिअरन्स डेवलप करत चाललाय आणि मी वेटलेस होत नेटलेसनेसचा स्टॅमिना वाढवत उभा आहे शून्याच्या अंगणात शेकडो पायांनी

दरवाजा उघडलाय
आणि मी खिडक्या पाहतोय.   
***

श्रीवाहिनी हे नववे चॅनेल हे श्रीधर तिळवे ह्यांच्या चॅनेल सीरिजचे सर्वोच्च शिखर मानावे इतकी ही वाहिनी समृद्ध आहे. १९८२ ते १९८७ ह्या काळातील त्यांच्या आत्मचरित्राचे पडसाद आत्मचरित्रातील काल्पनिक क्षण (आकक्ष) च्या पहिल्या खंडात तर १९८७ ते १९९३ च्या आत्मचरित्राचे पडसाद अस्पष्टपणे व अप्रत्यक्षरित्या अ. डॉ. हॉ. का. बा. ना. सु. ना. ह्या साहित्यकृतीत सापडतात श्रीवाहिनी ह्या संग्रहात १९९४ ते २००७ ह्या कालखंडातील आत्मचरित्राचे क्षण अप्रत्यक्षपणे उमटलेले दिसतात ह्या तिन्ही कृतीतून एका पिढीचा सलग व खंडीत असा विखुरलेला व इंटरनेटेड प्रवास ठळकपणे सापडतो. लिव इन रिलेशनशीपमधील ताण असोत वा Alan Sonkal चे कांड असो त्यांचा स्पष्ट ठसा ह्या संग्रहातील कवितांच्यावर उमटलेला आहे. मीडियाचा वाढत चाललेला प्रभाव हा तर ह्या वाहिनीच्या आकृतीबंधात स्पष्टच उमटलाय मोबाईल आणि मोबिलिटी ह्यांच्यातला ताणाबाणा सोसत स्वतःची मिडिआटीक आणि इडीयटीक आयडेन्टीटी पणाला लावत जगणारा  नायक इथे अनेक पातळ्यावर हेलपाटत व झेलपाटत टेक्नोसॅव्ही होत विखुरतो, स्वतःला गोळा करतो, चालतो आणि पुन्हा विखुरतो चौथ्या नवतेची कॉस्मो मराठी भाषा एकाच वेळी इंग्रजाळत आणि मराठीळ्त ह्या  संग्रहात अवतरते ती तऱ्हा पाहून मराठी भाषा कात टाकून पुन्हा नवा उत्सव  साजरा करण्याच्या मूडमध्ये आहे हे स्पष्ट होते
                           
                                                एकंदर ढण्टढण ! ढणननन !



  

































































  





















































No comments:

Post a Comment