Monday, 21 August 2017

श्रीधर तिळवेच्या कविता
शुक्रवार                                                 श्रीवाहिनी 

              आरंभ
आपण वास्तवाला स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा मुसक्यात बांधतो.
             फुटेज देणारा फुटेजमध्ये येतो आणि वास्तवाला स्वतःचे फूट देऊन मर्यादित करतो
               न्यूज ऐकणारा स्वतःच्या कानाने आवाज मर्यादित करतो आणि मग त्याला जे मर्यादित ऐकू आले तेवढेच सांगतो.
               तर आम्ही मर्यादाचिंन्होत्तम आहोत हे धान्यात घ्या बातम्यावर विश्वास आणि अविश्वास ठेवा आणि मगच त्या पहा.
               न्यूज  चॅनेल किंवा न्यूज ही जिच्यावर अंधश्रद्धा ठेवावी इतकी महान गोष्ट नाही. ती एक माहिती आहे म्हंटली तर आवश्यक म्हटली तर अनावश्यक
आजच्या ठळक बातम्या
              मार्क्सवादी पक्षाने नेते श्री. स्वामी ह्यांनी पत्रकाराने जी Fake story रचली त्यामागे संपूर्ण भांडवल शाही असल्याचे सांगितले यश आणि यश ह्यांनी ही भांडवलशाही पछाडून टाकते आणि मग यशासाठी माणसे कुठल्याही टोकाला जातात. पत्रकार रचविहार बिहारी ह्यांचे हे  कृत्य म्हणजे यश मिळवण्यासाठी कुठल्याही टोकाला जाऊ  इच्छिणाऱ्या भांडवलशाहीचाच अवतार आहे असे  म्हंटले त्याला उत्तर देताना उद्योगपती सुटाटा ह्यांनी भांडवलशाहीने ही दीक्षा समाजवाद्यांच्याकडून  घेतल्याचे सांगितले. रशियाने  माध्यमांचा वापर करून हजारो कुंभाडे रचली आणि त्यांचा पत्ता लागायला कित्तेक वर्षे लागली. भांडवलशाहीत निदान असे कुभांड कुणी रचले तर त्याचा पत्ता आठवडाभरात लागतो असे ते म्हणाले.
                काल कुरेशी ह्यांनी जे प्रतिपादन केले ते इस्लामच्या विरोधी असून अल्लाह एकच आहे ह्या तत्वाला बाधा आणणारे आहे असे प्रतिपादन दिल्लीचे इमाम बुरीन ह्यांनी केले. त्यांच्या मते Pluralismला इस्लाममध्ये स्थान  नाही अल्लाह एक आहे प्रॉफेट एक आहे कुराण एक आहे आणि  जगातले सर्व मुस्लिम एक आहेत असे त्यांनी प्रतिपादन केले. "हँ आमचे शत्रु मात्र अनेक आहेत आणि त्यांच्या बाबतीत plurality  आम्हाला मान्य आहे " असे ते म्हणाले. श्री सैय्यद बंडा ह्यांनी "मुस्लिम समाज हा सध्या धुक्यातुन चालला आहे " हे मान्य केले. इतर धर्मियांनी जशी Modernity स्वीकारली तशी मुस्लिम समाजाने स्वीकारली नाही त्यातूनच अनेक प्रश्न निर्माण झालेत असे ते म्हणाले. ख्रिश्चन धर्मात सुधारणा घडण्यासाठी जसा मार्टिन ल्यूथर जन्मला तसा  मुस्लिम धर्मात कुणी जन्मणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.  दुर्दैवाने मुस्लिम धर्मात मार्टिन ल्युथर निर्माण होण्याऐवजी ओसामा बीन लादेन निर्माण झाला असे ते म्हणाले. बाबरी मशीद पाडली जाणे ही  एक प्रतिकात्मक घटना आहे. एका अर्थाने तुम्ही तुमचा धर्म पाडून नवा इस्लाम धर्म उभा केला नाहीत तर आम्ही इतर धर्मीय तुमचा जुना धर्म पाडू असा तो इशारा आहे असे ते म्हणाले.
            सुपरस्टार जानू खान ह्यांनी प्रिया नार्वेकर ह्यांच्या वक्तव्यावर प्रथम प्रतिक्रिया घ्यायला नकार दिला मात्र फारच छेडले असता ते म्हणाले की कुणी कितीही बोंबा मारल्या तरी presence हीच खरी सत्ता असते. अभिनेते हेच presence असतात राजकीय नेते व भांडवलदार, पोप मौलवी हेच presence असतात आणि Text हीही presence च्या आधारेच interpret केली जातात तेव्हा प्रिया नार्वेकरसारख्या absence नशिबात असलेल्या लेखकांचा त्रागा हा वांझोटा ठरणे अटळ आहे.
             श्री विचित्रवीर्य कौरवे ह्यांनी चुंबनावरून चाललेल्या गोंधळाबाबत आश्चर्य व्यक्त केले ते म्हणाले की मूळ चुंबन नाहीसे झाले असून आता आपण टीव्हीवर जे  पहातो ती त्या चुंबनाची व्हिडीओ रिऍलिटी आहे. मूळ चुंबनाशिवाय अस्तित्वात आलेली चिन्ह चुंबने असे त्यांचे स्वरूप आहे. अशा चिन्हीय चुंबनावर चर्चा करण्यात आपण आपला खराखुरा वेळ  वाया घालवावा का ? ज्यांना टाईमपास करायचा असेल त्यांची गोष्ट वेगळी आहे. आज प्रत्येकाच्या  घरी टीव्ही आहे आणि प्रत्येकाच्या  टीव्हीवर प्रत्येक चॅनेलने सादर केलेलं चुंबन आहे एका अर्थाने प्रत्येकाच्या घरी तीस चुंबने किमान आहेत. पूर्वी असे नव्हते चुंबन झाले की ते संपून जायाचे आता त्याच्या प्रती चिन्हप्रती ह्या अशा फिरतात पूर्वी इतर लोक हे चुंबन पाहूच शकायचे नाहीत त्यामुळे ह्या चुंबनाचे interpretation करायला भाडोत्री समाजशास्त्रज्ञ, तत्वज्ञ लागायचे आता प्रत्येकाच्या घरी तीस तीस चुंबनप्रती तर ह्या मध्ये उगवणाऱ्या भाडोत्री विचारवंताची गरजच काय ? ज्याला त्याला त्या चुंबनाचा अर्थ लावू दे ना आणि ज्याला त्याला ठरवू द्या त्यांनी भर रस्त्यावर चुंबन घ्यायचे की नाही.
                    श्री रवीबाबा आज भक्तांना म्हणाले की, Life is a play to achieve the goal of purpose. Life is a chance to design yourself without any hierarchy. Life is a silence full of language. Life is a unfinished performance Life is deconstruction of your ego for creativity Life is the decentring of your presence Life is breaking boundary of all texts dispersing every semantics & rhetorics Life is something depthful with beautiful surface combining & shattering meanings & interpretations, signigiers & singnified, doubts & certaintities.
                  भक्त म्हणाले, "बाबा थोर आहेत. ते जे बोलतात त्यात खूप काही असतं. तो आशीर्वाद असतो. "
                  ज्योतिषी म. वा. भट ह्यांनी "मी ला subject ला तू जो काही आहेस तो planetary effect आहे हे समजावून सांगण्याचे शास्त्र म्हणजे ज्योतिष " असे आज सांगितले. "ज्योतिषशास्त्र हे postmodernism ला planetary dimension देतं ते postmodern science कसं फंक्शन करून शकेल ह्याचा एक आदर्श नमुना पेश करतं " असे ते म्हणाले. ह्यावर शयाम देव ह्यांनी postmodern science ही भानगड scientific नसल्याने लोकांनी ज्योतिषाच्या जाळ्यात फसू नये असं सांगितलं.
               श्रीधर तिळवे ह्यांनी पुन्हा एकदा पोमोचा मृत्यू झाला असं घोषत केलं. ते  म्हणाले.
               "ज्यांना भाषेच्या बाहेर कधी जाता आले नाही जे भाषेत कैद झाले अशा भाषिक आणि भाषूक लोकांचे भाषाचाळे म्हणजे  पोमो होय. भाषेबाहेर ना relativity असते ना universality ना certainty असते ना uncertainty. भाषा प्रत्येक गोष्ट सापेक्ष वा निरपेक्ष करते भाषा एखादी गोष्ट निश्चित वा अनिश्चित करते पण आयुष्यातील सत्ये ही भाषेत कैद असणाऱ्या माणसांना सापडत नाही जे भाषेबाहेर पडू शकतात तेच खरे क्रियेटीव लोक इतर भाषेत निर्माण झाले आहे त्याचे फक्त भाषिक अनुकरण करतात. पोमोला काही निर्माण करायचेच नव्हते म्हणून तो फक्त जे निर्माण झालं त्याला deconstruct करत राहिला त्यातून काही भाषांतर्गत सत्ये त्याला प्राप्तही झाली. जोपर्यंत भाषा आहे तोपर्यंत ह्या सत्यांचे महत्वही राहील पण उद्या भाषा नष्टच झाली तर ही भाषिक सत्येही नष्ट होतील. भाषातित सत्ये मात्र पुन्हा शोधली जातील आणि कदाचित नव्या
भाषेत मांडले जातील. तेव्हा हे असे दळभद्री तत्वज्ञान भारताने आयात जरूर करावे पण त्याचा वापर करताना विवेक सोडू नये. विवेक जो reason शिवाय शक्य नाही विवेक जो फक्त reason मुळे अस्तित्वात येतोच असे नाही"
         फॅशन किचन

          केस उगवतायत निरंतर अथकपणे
          काखेत, नाकात, भोकात
          ही मॉडेल लाईफस्टाईल पॅरीस रनवेवर पळून जाण्यास सज्ज झाल्यापासून

          जिलेटचे खोकेच्या खोके येऊन पडतायत
          केस एकमेकाला मोबाईल करतायत एड कॅम्पेनच्या दरम्यान श्यामली वर्गाचे फोटो पहात

          केस डिप्रेशनची भूछत्र पहात पनीर खातायत
          कॉन्ट्रॅक्टसची होमटाऊन पाहू देत नाहीत
          डोळे सकाळ होण्याआधीच केसात मावळतात
          केस कॉस्मेटिक टिप्स घेऊन रेझरतायत सुगंधतायत बीग प्लस स्मॉल प्लस
          केस लोंग  डिस्टन्स मॅरेज बांधून ठेवतायत एका बैलाला जो आ मुझे मार म्हणत नाही.
         केस ब्लॉन्ड होत एजन्सीमध्ये जातायत निळ्या  डोळ्यांनी
         केस वाढतायत वाढतायत
         आणि आख्ख पॅरीस आयफेल टॉवर बांधून  उडवतायत

          केस होमसीक होऊन मुंबईत परततायत आणि कपड्यांशी  निगोशियेट करतायत
         कपडे म्हणतायत
         बॉडी दे
         केस म्हणतात कशी  मी देऊ ?

          केस डिवोर्स घेतायत पहिला दुसरा तिसरा
          केस रिकोर्स करतायत पहिला दुसरा तिसरा
          केस फुलांप्रमाणे उमलतायत
          केस ज्यांनी ग्लॅमर पाहिलं नाही
          केस जे सर्वांच्यापासून लपवले गेले
       
          केस ज्यांना शरीराच्या  चोरवाटा आणि पोलीस वाटा माहित होत्या.
          सांगतायत
          गळत गळत
         स्वतःच निर्माण केलेल्या सैतानांची कहाणी
         मोडकळीला आलेल्या जिभेने
       
         केस पांढरे होतायत आणि कुठल्याही रंगात मिसळून
         नाहीशे होतायत
         केस
         जे फक्त कपड्यांना दिसले
         आणि कपड्यांनाच कळाले
         शरीरावर उगवून.
***

तुझी Negative बॉडी हाच  एक वब सस्पेन्स होता जो फुटत चाललाय कलिंगडासारखा आपल्या ह्या रिअल स्टफ्ड बेडरूमध्ये जे  कलिंगा वॉर चाललं होतं तुझ्या माझ्यात तुझा wordrobe च्या अष्टोप्रहार 
च्या wordrobe मध्ये स्पायडरमध्ये ते आता झालंय थेट नागडं स्क्रीनवर त्वचांची कुलुपं स्पायडरमध्ये फुटलेत मला जाणाययच काय स्पीन होतय तुझ्या त्वचेच्या आत ? स्पॅम की फ्लेम ? Emotions की Emoticons
           मी उत्सुकतेने पाहतोय आंघोळीसाठी तू उघडत असलेलं तुझं शरीर ! किती सहजपणे भिरकावले जातायत उड्डाणरिटर्न कपडे प्रथम आपण खूप लपवतो म्हणून भांडलो आणि आता काहीच लपून राहिलेलं नाही म्हणून भांडतोय तू पॅंटी ब्रा काढतीयेस आणि उत्तेजित करत नाहीयेस तू उत्तेजित होत नाहीयेस आणि बोलतही नाहीयेस ऑफिसमध्ये जे काही झालं ते कधी एकदा तुला सांगते ते ऑफिसात तुला सांगण्यासाठी काही घडलेलं नाहीये पर्यंत तुझी भाषा बोलून बोलून कंटाळलीये जे उबदार होतं ते आहात उबवतंय जे पिकत होतं ते आता पकवतय तुझी मिठी इतकी कंटाळवाणी केवळ सवय म्हणून. तू शांततेत्वाया वाटाघाटीत किस घेऊन आत नहायला गेलीयेस वयात येताना एक्सायटमेंट ताणणारी तू किती फॅटब्यूल होतीस ! आता सवयीत येताना फक्त फॅन्टसीचा ताण येतोय मग ताणाताणी आणि तीच क्रोधात  डिक्लेअर झालेली आणीबाणी shop grifting ची सोय नसलेली

मी निमूट ठेवतोय माझं गरम झालेलं sarcastrophic रक्त फ्रिजमध्ये
आणि तू कम्प्युटरसमोर
गेमच्या psychodramatic पसाऱ्यात
पिसारा फुलवत screenjacked
तू कुणासाठी नाचतीयेस ? अपसॉफ्ट होत
जंगल डीसप्लेस करून मिसप्लेस
विंडो ओपन करून ?
तू घराबाहेर निघून गेलीयेस सायबरवाटेने
आणि मी तुझी कोणत्याही क्षणी खबर मिळून
तू परतशील म्ह्णून
ह्या खैबरखिंडीत स्वतःलाच गाठतोय
NET लावून
***

एक्सपोजरची दहशत वाटावी
एतकीही एक्सपोज नको होऊ
प्रत्येक x पोज घेत आलं की
माझा y मोस्ट वॉन्टेडमध्ये झळकायला लागतो
हे थिरथिरणारं  पाणी
ही थिरथिरणारी आग
निथळत निथळत कशाचा मांडव घालणार आहे
मांड्यात
निळसर स्वीमवेअरचं हे गांडवनृत्य
कुठल्या कुठल्या पांडूलिपींना
दांडवणार आहे दुर्बोधतेच्या दंडकरण्यात
हे खरं आहे की
खतऱ्यात आहे माझी लीव इन रिलेशनशीपची हॅट
पण मग ते कळताच वादळ निर्माण करणारं
हे लव इन इंटिवेशन इतक्या सत्वर ?
माझा फुगा अद्याप फुटलेला नाही
आणि माझा भ्रमाचा भोपळा अजून तरी  रिऍलिटी पुरवतोय
Previous आणि Next
ह्यांच्या दरम्यान बाकी आहे माझ्या प्रेयसीची
कित्येक view more body
स्लाईड शो शेअर करण्याचा आमचा रेट थोडा खालावलाय
पण अद्यापही तडकण्याआधी काचा एकमेकाचा फेस दाखवतायत
माझ्या जॅकेटमध्ये अद्याप तरी तिचे पॅकेट आहे
ही Live wire improve होण्याचा chance आहे
आणि advance होण्याचाही
तेव्हा एअरहोस्टेस आहेस म्हणून सांगतो
तुला जिथं लॅण्ड व्हायचय तिथे माझी भूमी  नाही
तेव्हा ह्या पाण्यातून थेट तुझ्या घरी जा
तूर्तास  तरी तुझ्या तहानेचा अंत हा संत नाही.

फक्त उत्तेजक वास
Pouring
किती वर्ष गाडलं होतंस जमिनीत स्वतःला
अशी फूल टू वाईन होण्यासाठी
दहशतवादापासून वाचलेला रेड
धार लावत धारावतोय
एक शांतता आहे  प्रत्येक थेंबात
गळ्यात तहान  आहे
आणि तिला तुझंच स्वप्न पडलं होतं
वयात येताना
पार्क हो
माझ्या समशितोष्ण हातात
रंग उडत चाललेल्या माझ्या प्रेमावर
हा शेवटचा मार
शिंतोडे उडवत नको येऊस
रक्ताचा accelerator दाबत
तुफान वेगाने नागव
ये
आणि ग्लासात अडकलेल्या माझ्या स्क्रिप्टचा
The End लिही.

                विशीत फाटलं जातीवरून म्हणून काय झालं तिशीत गाठेन माझ्या वर्गाचा झालास की आणि त्यावेळी दुसरीचा असलास  तर पन्नाशीत गाठेनच तुझ्या भाषेत.......
                कॉमासुद्धा विचारपूर्वक टाकणारी तू शेवटच्या पत्रात विरामचिन्हंच नव्हती.
                आणि आता हा  इमेल ज्ञ अमेरिकेला गेल्याचं कळल्यावर ड्रीप इरीगेशन नेहमीच फायद्याची ठरतात असं नाही हे  तर तुझ्याच फार्महाऊसवर तू सांगितलं होतीस क्रॉप तर ड्रॉप मोजणारे तुझे वनस्पतीजन्य डोळे मोठे करत
                 माझी मुळं रिकामीच राहिली खोलवर पाण्यात ती हातात घेऊन मी स्क्रीनसमोर बसलोय तुझा हा इमेल टेकहोम मेसेज की लीवहोम मेसेज ? "Why you talk to Tare " टॉकसुद्धा बिट्रेयल वाटायचा तुला आणि मी इतर पोरीशी बोलणंही टाळून फक्त तुझ्याबरोबर मैलमैल जायाचो बोलत आणि डोलत
                तुझ्या बॅकपॅकेटमध्ये मी नेहमीच असायचो नंतर तुझ्या मंगेतराशी बोलताना  माझं लक्ष्य कायम तुझ्या त्या खिशावर. प्रतिक्षा दीर्घकाळ ताणून शेवटी मी तोडली तुझ्या लग्नात उपवास तोडावा तशी आणि मग दीर्घकाळ जो समोर आलं ते अधाश्यासारखं  खात राहिलो. तुझी त्यावेळची निषेधपत्रे फक्त डोळ्यातच झळकत राहिली किंवा Dear Dendroctunus एवढंच चिठ्ठीत लिहून थांबली आता त्या चिठ्ठयाही वयाबरोबर उडून गेल्या.
                 प्रेमात immune system  नसतेच When I think & feel about love, I think about capacity not about capacity not about an abstract idea. Hardware Not software मी कळवळून बोलतोय आणि तू "Our love is first generation Wealth" म्हणून मख्ख. नुस्तीच इंद्रियजन्य संवेदनखोरी कधीच केली नाही आपण. Methodological chemistry च्या मैदानात काळीज आणि मेंदू समाजन त्वेषानेच भडकवले आपण आणि तरीही ही दोस्ती की हे प्रेम हे कोडं सुटलं नाही प्रत्यक्ष संभोगातही आणि आता हा मेसेज प्राणाचा अंत पाहणारा
                 "तिलाही तू कळालास. तू कुणाचाच नाहीस. माझाही." "माझाही " काय आहे ? प्रेम ? ग्रेट रिलीफ फंड ? फंडामेंटल एक्स्क्यूज ?

               tricky & testing game of conversation.
               पुन्हा सुरु ? काय सुरु ? उत्तर देऊ की प्रश्नात सोडू ?
               हात माऊसमध्ये सळसळतायत
               आणि तू ईमेलामधून थेट येतीयस
               कॅटवॉक करत.
                मेरे अंदर दस दिल है एक कातील एक मवाली एक कवी एक चिकित्सक और और और
                तू कुठल्या काळजात अडकलीयेस आणि कुठल्या काळजातून निसवतीयेस ? माझं चरित्र कधीच फेमवर आधारलेलं नव्हतं बदनामीच्या पायथ्याशी बसूनच मी नामवंत कवी झालो तुला माझ्यातलं काय नकोय ? कलंदरपणाचा कलंक ? मूडी असणारा झक्की स्वभाव ? काहीही कधीही कुठेही बडबडणारं मूल ?
              माझ्याजवळ कम्युनिकेशनचे कित्येक प्लान्स आहेत तुला  कुठला परवडतो ते तू बघ प्रेम करताना हजार एमएमएस पाठवण्यासाठी आणि फेस करण्याची कपॅसिटी माझ्या मुद्राभिनयात आहे मी स्टँडीग पॉज घेऊ शकतो आणि मोबाईलही माझ्या आऊटगोईंग ऑरगॅझममध्ये हजारो व्होल्टचा झमझमाट असतो मी इंकामींग कॉलरचा घाम काढतो
                कॉलर आयडेन्टी सोडण्याचा माझा स्वभाव नाही आठवणींचा मला अनरोमॅण्टीक तिटकारा आहे. त्यामुळे त्या प्लॅशफॉरवर्ड करण्यात माझा मेंदू वाकबगार आहे. मात्र त्या कवितेचा स्विंग येतात तेव्हा मी मैदान सोडून देत नाही शब्दांचा योग्य तो  फटका मारून मी त्यांच्यातून रन्स जमवतो.
                तेव्हा बघ
                 हातात सूरी घेऊन आलीस तरी माझ्या सायको शरीरात तुझं स्वागत आहे आणि फुले घेऊन आलीस तर सेंटली श्वासाश्वासात सेंटीमेंटल सुस्वागत.

               पब्लीक इमेजीस वाजवत चाललाय माझा डिजिटल ऑर्केस्ट्रा डयरसिटीचं मल्टीविजन सिटी सिटी मिठीमध्ये तुंतूचां टेक्सटाईल सेक्टर शोधत नाही कपड्याचं मूळ शेतकऱ्यांच्या आत्महत्या फॅशनपर्यंत पोहचवण्याचं तंत्र कापसाला अवगत  नाहीये.
              मॅच न सांगताच ओपन केली गेली ओपनर्स कमिटीनेच निवडले आपण दाखल झालो मैदानावर हिरवळ हुंगत खेळाइतकं मानवी काही नाही
              मरताना बाऊन्स बॅक झालो खिळ्यात अडकलो तेव्हा गुप्त पाण्याने खळखळाट केले बॅकफूटवर जाताना आख्ख रक्त मागं व्हेलं हेअरस्टाईल सेक्युअल केल्या चटके लागणारे फटके मारले हटके करत मजल दर मजल शतकापर्यंत पोहचलो आणि ज्याला नो बॉल समजलो तो यस बॉल निघून आऊट झालो
            अंगावर स्पॉन्सर झालेले कपडे आणि प्रत्येक डोळ्यात आपली इमेज
             शतक मारूनही ही बदक अवस्था कसली ? मॅन ऑफ द मॅच मुळूनही हा हात हातघाईला का ?
             आपणच निर्माण केलेल्या रनांचा प्रचंड डोंगर चकाचक फ्लॅश आणि आपण  ह्यातील एकही धाव पहायला एकही झाड  नव्हतं म्हणून अस्वस्थ
            उद्या पुन्हा हिरवे मैदान
            आणि वाळलेला विक्रमी हात
***  


तुझ्या भाषेतला चिन्होरा भुंगोरा बनून फिरतोय कानाच्या श्रवणकमळात I love you तीन शब्द शब्दांचे जनेटिक clance  उगम पावतायत मायग्रेटरी हिस्टरी भुंजाळत तीन शब्द उच्चरताना ओठांचे उमललेले डिटेल्स प्रोसेसतायत पुन्हा पुन्हा फेक आणि रिअल ह्यांच्या दरम्यान 
            आसपास अविश्वासाचे जागतिकीकरण आणि संभ्रमांचा पोपटपंची विस्तार संशयाचे बागुलबुवा बिगुल वाजवत वर्ल्डवाईड रिमिक्स होतायत बाई आताशा वाजवूनच घ्यावी लागते कायदे इतके कडक होतायत कि शासन लैंगिक होत चाललंय. माझ्या बेडरूम मध्ये किंवा असं म्हण कि लिंग शासकीय होत चाललंय कोर्ट कचेऱ्यात. प्रेमाचं ओरीजीन विसरून कायद्याचे प्रोटोकॉल पाहत करावे लागतंय स्पर्श कायदा एका हाताने स्वातंत्र्य देतोय दुसऱ्या हाताने हिसकावतोय माझा Y क्रोमोझोम वायझेड होत नाही आताशा पिपासेत वासनेच्या मेट्रोकाँड्रियल X मध्ये चाचपत राहतो. आग किती आणि फुफाटा किती सॅम्पल सप्लायही डेंजरस होत चाललेत एकीकडे एड्स दुसरीकडे पोलीसी  शेडस
          असं समजू नकोस कि माझा अटेन्शन स्पॅन संपलाय किंवा मी कॉन्सन्ट्रेशन क्रायसीस मध्ये भंजाळलोय. ना! ती डोळ्यातील सल्फ्यूरिक अदा विझू नको देऊ मिसहप्पेनिंग सायरन इतक्यात नको वाजवू
         तू जे बोललीस त्याचा ब्लॅक इम्पॅक्ट ओसरू दे ऍम्प्लिफाय झालेली कातडीची अटीतटी फोकसू हृदयाच्या अग्रावर हा उग्रतेचा जश्न रिस्की आहे. पोरी तुझे कोवळे सेन्सॉर सेन्सीबल कर आणि मग हि स्किनव्हिलर ढकलत ढकलत ये सेल्फ डायग्नोसिसच्या रस्त्यावर
        माझी फोर व्हीलर डोअर उघडून वाट पाहतिये तुझीच अन्गझायटी अटॅकच्या लॅम्पखाली हि कुठली मांसल ग्रॅव्हीटी आहे. पार्वती जी बेन्ड करतीये माझ्या तुझ्या कण्यातील स्पेस पृथ्वीचा सरफेस कधीपासून करतोय तुझा चेहरा धारण करण्याचा प्रयत्न पण कधी तुझं नाक माझ्या दुर्बिणीपुढं नाक घासायला नकार देतं तर कधी डोळे सोल्यूशन सापडल्याने हवालदिल सेपरेशनमध्ये डिस्टर्ट होतात
         रिस्टार्ट क्लीक करून करून थकून गेलेत माझ्या क्रियेटिविटीची बोटं तू बाई आहेस कि युनिव्हर्स? रिकोलॅप्सिन्ग अवोईड करण्यासाठी किती काळ पंक्चरणार आहेस. माझे रंग काळाला ना आदि आहे ना अंत त्यामुळेच त्याचा मध्यातला ब्रश तुझ्या ओठातील गॅलक्सीज निर्मळमध्यम सापडाव्यात म्हणून शोधतोय तुझं अंतिम वर्जन
        तुझ्या प्रत्येक लाईट हार्टेड भेटीचं पोट्रेट लाईटपेक्षा अधिक वेगाने धावून मी पकडतोय पण माझ्या हातात येतंय तुझं फक्त नकली गंगावण. गंगावतारणाचा बिग बँग केसांना मुकतोय आणि पाण्याचा ड्रॉपलर इफेक्ट कॅनव्हासची डेन्सिटी पातळ करत डार्क मॅटरकडे पावले टाकत सरकतोय भरदुपारच्या कागदी कैलासपर्वताव
        मला तुझ्या शरीराची एक दशांश अमाउंटही पुरेशी आहे तुझं फेशियल करण्यासाठी तुझ्या दोन कानात दोन सोलर सिस्टीमची डूल अडकवून मला पाहायचाय तुझा धांदरट चेहरा. अवयवांचे लोअर एस्टीमेट मी कधीच काढत नाही मला आपादमस्तक बाई लागते परमेश्वराशी स्पर्धा करताना
        तेव्हा हो सारी शटर्स डाऊन करून स्टॅन्ड अप ! कसलाही स्टॅन्ड घेता !
        बघ कसलाही आविर्भाव आणता रेडीओसोर्स जमा करताय तुझा चेहरा
        आणि तुझं शरीर 
        माझा प्रत्येक स्ट्रोकला चिमटे काढत 
        माझ्या काळजाला प्रकाशमान करत
        स्वतःलाच कॅनव्हासवर मुद्रित करत चाललंय 
        ऐक 
        आणि कानासकट नष्ट हो माझ्या डोळ्यात
*********************************************************************

    जो प्रेमात पडायला उत्सुक कोवळया स्पर्शांच्या सेन्सरी मध्ये तो अचानक असा सेल्फसेन्सारड का झालाय ग्रीनरीच्या भरगच्च अंगप्रत्यगात? ज्याला रोज बाई लागायची तो हा हात अचानक राखीबद्ध का? ज्याच्या बोटावर उघड्या अंगाने पाठ नाचली ज्याच्या तळहातावर स्तानांनी निधड्या छातीने अराजकी राज्य केले तो असा राजकीय संन्यास घेऊन कुठल्या भगव्या स्क्रीनवर आयकॉनलाय? कॉईनींग करत ज्याने नाणी छापली दोन मांडयात त्याची टांकसाळ आज का आटवतीये आसक्तीची टांगसाळ?  
        हा कोणता स्पेशल इफेक्ट आहे जो माझ्या रक्ताची फिल्म रिलीज होऊ देत नाहीये तुझ्या रक्तात? हा ऍक्शन मोड आज अचानक डिफेक्टिव मुड़मध्ये का चाललाय?
       तब्येतीचे नखरे मी कधीच खपवून घेतले नाही तरी हा हेल्दी अंगताठा का काटा मोडून पडतोय काळाच्या मोडकळीस आलेल्या घड्याळात
       तू प्रेमाचा इजहार करुन निघून गेलीयेस आणि मी नेहमीसारखा समशितोष्ण होण्याऐवजी ही कोल्ड कॉफी पित बसलोय एक वीस वर्षाची मुलगी आपल्या प्रेमात पडलीये ह्यविषयी कसलाही उत्सूकपणा बरोबरत नाहीये माझ्या मध्यमवयीन पेशीत
        तू मला आवडतीये  पण त्या आवडीचे स्वरुप लैंगिक नाही तुला आशीर्वाद द्यावा इतकाहि बुजुर्गपणा दणकट नाही तळहातात एक सांजउदासीच व्याकुळलीये ट्यूबलाईटच्या आर्टिफिशीयल प्रकाशात वेग आवेगाचा पायाच्या अंगठ्यात मग्न आहे आणि मला माहित नाही आयुष्याला उदास करत कोण माझ्यातला उठून तुझ्याकडे पाठ करुन ह्या खिडकीतून चालता झालाय ?
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
        माझ्या कवितेत ना भक्ती रस होता ना रोमॅंटिक भावभावना मी  मॉर्डन सिझोफ्रेनिक अवस्थांना पडलो नाही बळी
        मी फ़क्त इन्टेंसिटीजच्या सिटीज उभ्या केल्या सेमीओटिक ग्लोबल गावाच्या पारावर ज्याला पाया नव्हता पण पारे होते चढणारे उतरणारे गाणारे मी जातींना शरण गेलो नाही मी सिद्ध केले की जातीच्या पल्याड उभे राहूनही लिखाण करता येते दोन पायावर उभे राहण्याची शिक्षा सोसत बसायला सीट मिळत नाही म्हणून रिझर्वेशन मागणाऱ्याताला मी नव्हतो मी उभाच राहिलो एकटाच शिष्यहिन गुरुहिन देवहिन खिळे ठोकले तरी मी घातली नाही देवाला आस्तिक साद मला बोलायचे तेच बोलत राहिलो बसलेल्यांशी
      मी हा माझा तो परका हा स्व तो उपरा असा भेदही केला नाही भेटणारा शूटर असो संत मी सगळ्यांशी हात मिळवला आणि तरीही पाची बोट निर्मल ठेवली शाबूत सहीसकट ह्या ग्लोबल व्यवस्थेंनं  नेहमीच मागितला माझा अंगठा म्युझियम मध्ये ठेवायला पण मी सगळ्या कॅमेऱ्यातल्या अदृश्य द्रोणाचार्याना उघड़ उघड़ ठेंगा दाखवला।
      माझे मोबाइल मी कधीच इन्शुअरड केले नाहीत की माझे पाय मी कधीच फिक्स डिपॉझिटमध्ये टाकले नाहीत  मी कधीच becoming नव्हतो त्यामुळे माझे दोन्ही आउटगोईंग आणि इनकमिंग झंझाळत राहले मध्ये मी घात करणाऱ्यांना घातांक कधीच कॅलक्युलेट केला नाही किंवा कॉम्प्लेक्स निवासस्थान म्हणून निवडला नाही।
     मी फ़क्त झुमलो बराबरमध्ये आणि ग़लतीत कालगती न काढता गतीत तोलदार वेग ठेवत आयुष्य बिनमुराद ड्राईव्ह केले।
    माझ्या तळहातावर यश नाही म्हणून काय झाले माझ्या अपयशाचा पारा अवघे विश्व रिफ्लेक्ट करतो हे काय कमी आहे?

*********************************************************************************

एका चष्मे आणि गॉगल विकणाऱ्या विक्रेत्याची मुलाखत बाय श्रीधर तिळवे 


विक्रेता : साहेब गॉगल घेणार का गॉगल

श्रीधर : All postmodernist were poets. They dont understand science.

विक्रेता :  साहेब गॉगल घेणार का गॉगल

श्रीधर : अरे बाबा तुझा interview घ्यायला आलोय मी श्रीधर तिळवे दिग्दर्शक कधी कधी documentries                       बनवतो

विक्रेता : साहेब त्या पेक्षा गॉगल घ्या ना

Cameraman Sebi : पोस्टमॉर्डेन रंगीबेरंगी गॉगल म्हण म्हणजे साहेब घेतील साहेबाना बुद्धीचा फार शौक                                         आहे

श्रीधर : सॅबी , आधुनिकांनी चष्मे लावले , उत्तर आधुनिकवाल्यांनी रंगीबेरंगी गॉगल्स

विक्रेता : साहेब मग चष्मे देऊ का?

श्रीधर : किती खपतात रोज

विक्रेता : चष्मा एखाद दुसरा पण गॉगल वीस पंचवीस

श्रीधर : किती सुटतात ?

विक्रेता : साहेब खरं सांगू ...... पोटापुरतं सुटतात .......

श्रीधर : सॅबी , आधुनिकवाल्यांनी चष्मे लावले उत्तर आधुनिकांनी कलरफूल गॉगल्स  आपणही तेच करणार                  असू तर त्यांच्यात आपल्यात फरक काय राहिला

विक्रेता : पण साहेब फरक कशाला राहायला हवा ? तुकाराम महाराज म्हणून गेले भेदाभेद अमंगळ

श्रीधर : भेद आणि फरक ह्यांच्यात फरक आहे थांब हँ कि फरक आणि भेद आहे ?

विक्रेता : कायबी म्हणा पण भेदाभेद अमंगळ साहेब

श्रीधर : हा अशोक केळकरांच्या भेदविलोपनाविषयी बोलतोय का?

विक्रेता : नाही साहेब तुकारामांविषयी बोलतोय

श्रीधर : दोघंही एकच बोलतायत

विक्रेता : इचारू नये पण केळकरांना काही एक्सपिरन्स होता का साहेब कि उगी आपली तंगातंगी

श्रीधर : You are impossible

विक्रेता :म्हंजी काय सायेब साहेब ते सोडा म्या सांगतो ते ऐका
              गरज असलं तर चष्मा वापरा
             इम्प्रेशन माराय गॉगल
श्रीधर : आयला हीच तर कवितेची पहिली ओळ
विक्रेता :म्हनजे बगा सायेब तुमचं आमचं जमलं कि नाय ? येक गॉगल घ्या पन येक सांगतो येरव्ही आपलं जगताना थेट डोळं -भेदक !मग काय द्यू ?
श्रीधर :shot ! सॅबी close अप लाव . हा ग्रेट माणूस आहे .
--------------------------------------------------------------------------------------------------------

ON INTERNET

Me : Dear Honey
        I like your blasphermerical smell of skin when u are in ghoogat ( I cant say burqa as I am                  surrounded by purers )

You : Shayar?

Me : मेरे पागलपनका तुझपे दिल आ गया
        अब खुदा जाने कि ये रिअलिटी है या रिऐलिटी शो है।
        I like harmoney in Utopia ! तुझ्या श्रद्धेवर माझी श्रद्धा आहे ! सबकुछ अपनेही दिमागका दही है।  मै                ईश्वरको बुलाने ड्यूटीपे गया
        दरवानने कहा He has resigned
You : मतलब
Me : मतलब ईश्वर के  दरवानको  किसने रिझाईन किया पता नहीं
        मगर यहाँ डॉ लागू  बार बार कह रहे है।  ईश्वरला रिटायर करा।  मग म्हटले जाऊन तरी बघू                              ड्युटीवर ब्युटीवर येतो की नाही।
You : इस्माइल कहाँ है।
Me : आखातातून ईस्माईल आला। ढेर सारा पैसा।  मदरसा खोलूंगा वो भी वहाबी बोल रहा था।  तेरा नाच गाना           कैसा चल रहा है? शेख लोग महाशेखी आणि ! पैसा हजम बात ख़तम !  औरत हजम बात ख़तम।                       दोनों में क्या फर्क गिरता है।    
         Internet may be an escape from reality but for internetter it is reality when he internet. नहीं                   करता।
You : वैसे उनके आँखोंके सिवा दुनियामे रख्खा क्या है
          writing इस सदीका सबसे बड़ा धोखा है।
Me : थोड़ा हल्का होके आता हूँ।  रूक !
         हल्का होना बहोत जरुरी है।
         माँ कह रही है।
         उस रंडीके साथ क्या बात कर रहे हो ?
You : Chod !
Me : I m involved I am engulfed in your heart country which is now in gulf.
You : फिर इंग्लिश ?
Me : मै फालतू में अंग्रेजी झाड़ता हूँ।  सही कहती है।
        look right now we are in same text and that is enough
You : Enough ?
Me : Market तेरे मेरे प्यार को कंट्रोल कर सकता है क्या ? तुझे उसने दुबई में बिठा दिया तो क्या ? वापस नहीं          लौटेगी क्या ?

*********************************************************************************

                                                         मोबाईला ! मोबाईला !!

एकोणसत्तरावा शेवट

मोबाइल बोलतायत
ते बोलतायत त्यातून नवीन मोबाईल तयार होतायत
ते जुन्या मोबाईल्सना आऊटडेटेड करून
कचऱ्यात जमा करतायत
त्यांना कचऱ्यात जमा करण्यासाठी
आणि त्यांची जागा घेण्यासाठी
ते बोलतायत
ते बोलतायत त्यातून नवीन मोबाईल तयार होतायत

सत्तरावा शेवट

मोबाईल बोलतायत
अपेक्षित समाधानकारक
अनपेक्षित असमाधानकारक
रिकाम्या जागा सोडत
दहापैकी तीन प्रश्न सोडवण्यासाठी घेत
(उत्तीर्ण होण्याची ती अट आहे
अवतीर्ण होण्याची अपरिहार्यता)
मोबाईल पम्प उपसयतात
ते एक दिसतात
अनेक असतात
फारच कटकट सुरु झाली कि होतायत
उपसण्याचा फक्त आवात येतोय
अदमास येत नाहीये
अदमास कशाचा घ्यावा
दिसतो भलताच कावा
थांब जरासा
मला दिसूदे तुझा प्रत्येक बारकावा
मला घेऊ दे चावा
मोबाईल बोलतायत
माझ्या चेहऱ्यावर बसून

बहात्तरावा शेवट

मोबाईल बोलतायत
त्यांच्या बोलण्याला दुधाचा वास येतोय , बिअरचा वास येतोय , धारावीचा वास येतोय , भैरवीचा वास येतोय
माझ्या नाकातील वासांची डिक्शनरी परेशान होतीये
तिला कळत नाही
मोबाईलना बिनवासाचं बोलायला कसं शिकवायचं
ती बोलू देतीये
आणि मोबाईल बोलतायत
तिच्या डिक्शनरीतील शब्द नष्ट करत
सुवासपूर्ण

त्र्याहत्तरावा शेवट

मोबाईल बोलतायत
त्यांना माहितीये
Word Is Workship
OR
Work Is Wordship
OR
Word Is Wordship
OR
Word is Isship
मोबाईल बोलतायत
आणि मी ते जे बोलतायत
त्यांना पश्चाताप आणि अपराधी शांततेत
पुरत
त्यांना बोलण्यासाठी कुमक पुरवतोय

चौऱ्याहत्तरावा शेवट

मोबाईल बोलतायत
माय फेस इज फ्लॅट
बट माय नोज इज आयफेल टॉवर
आयम टॉवरिंग
अँड मोबाईल्स आर टॉकिंग अँड टॉकींग
टेकिंग वॉकिंग
इन मी
यु नो

पंच्याहत्तरावा शेवट

मोबाईल बोलतायत
लिपस्टिकस आणि हॉकीस्टीक्स
एकत्रच खेळतायत
सॉनेट्स आणि नेट्स
एकत्रच नेटप्रक्टिस करतायत
पॉकेट्स आणि सॉकेट्स
एकत्रच जॅकेट्स घालतायत
मोबाईल चकीत आहेत
महिला हॉकी स्पर्धेत
प्रत्येकाला वेगळा फील आहे
आणि
ते मैदानावरून बोलतायत
त्यांची नजर खेळावर नाहीये
ते उघड्या झालेल्या पोरींच्या टांगानी
शॉकग्रस्त झालेत
पोरी खेळतायत
आणि मोबाईल जीव टांगणीला लागून
बोलतायत

शहात्तरावा शेवट

मोबाईल बोलतायत
इमॅच्युअर्ड
नॉट यट प्रिपेअर्ड

सत्याहत्तरावा शेवट

मोबाईल बोलतायत
And unfortunately
The scream is not justified
yet


अष्टयहत्तरावा शेवट

मोबाईल बोलतायत
मुक्काम पोष्ट आष्टयातून

एकोणऐंशीवा शेवट

मोबाईल बोलतायत
I am just kidding यार
काही कुणी बोलत बिलत नाहीये

पण मग बील का येतंय ?

ऐंशीवा शेवट

मोबाईल बोलतायत
probably its Mishappening
perhaps may be problem
may be promotion or that kind  of something
its thing yaar?
thing ?
Thing in Silence ?
Just........Just.....Just
मोबाईल फकींग बास्टर्डस
बोलतायत


एक्क्यांऐंशीवा शेवट

मोबाईल बोलतायत म्हणजे माणसे शब्दांशी म्हणजे शब्द माणसांशी म्हणजे माणसे झाडांशी म्हणजे झाड वाऱ्याशी म्हणजे वारा ताऱ्यांशी म्हणजे पारा चेहऱ्यांशी म्हणजे चेहरा मेकअपच्या सामानाशी म्हणजे मेकअपचे सामान मेकअप मॅनशी म्हणजे मेकअप  मॅन माणसाशी
म्हणजे माणसे
इंटरेस्टिंग


ब्याऐंशीवा शेवट

मोबाईल बोलतायत
आणि ब्लड एडिशन्स फ्लड एडिट करून हवेच्या ग्लोबल एडिट बॉक्सवर ग्लोब वॉर्म करत छापल्या जातायत
माणूस नावाच्या भाषेत

त्र्याऐंशीवा शेवट

मोबाईल बोलतायत
आणि त्यांना सतत बोलायला मिळावे म्हणून
माझ्या पर्सनल नोटबूक्स - मी
दोन्ही हातानी पुरवतोय

चौऱ्याऐंशीवा शेवट

मोबाईल बोलतायत
चौऱ्याऐंशी योनीचा फेरा
पाच मिनिटात एका कॉल मध्ये पुरा करत
त्यांना जन्मोजन्मी सेम परमेश्वर नकोय
त्यांना
प्रत्येक पाच मिनिटांनी
नवी कॉलर आयडेयंटी हवीये
मोबाईल बोलतायत
आणि मी माझी कॉलर ताठ करून
दर पाच मिनिटांनी माझं काळीज बदलत
त्यांच्याकडून परमेश्वरासारखा चाललोय.
माझी आयडेयंटी भिकेला लागलीये
तरीही ........

१०६ वा शेवट

मोबाईल बोलतायत
शंभर कौरव बोलून संपलेत
पाच पांडव बोलून संपलेत
एक कर्ण उरलाय
तो शेवटची वाट पाहतोय

पंच्याऐंशीवा शेवट

मोबाईल बोलतायत
एखादा शेवट झपकन मध्येच घुसतो
तरी
शब्द तरंगत चाललेत
तरंगता न येणाऱ्या माणसांकडे
जो कान लावून
शब्दांचे पोहणे ऐकतोय
वास्तविक शब्द हवेत तरंगतायत
आणि त्याला जे जलतरंगात पोहत
त्याच्याकडे येतायत असं वाटतंय
मोबाईल बोलतायत
दुःखी सुखी रुक्ष भक्ष्य आवाजात
रॉ आणि पातळ टोनमध्ये
डेनसिटी गायब झालेल्या कल्चरमधून
त्यांच्या त्वचेतून तरंग उठतायत
आणि तेही शब्दांना जाऊन मिळतायत
त्यांचा फोकस त्यांचा वर्तमान आहे
त्यांना त्यांचा भूतकाळ चाटून संपवायचाय
आणि ते बोलतायत
मोबाईल डेडली आवाजात बोलतायत
शवाचा फन्ना उडवत
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
     मे टायर्स आर टायर्ड Please Horn ! Blow your horn ! please ! go .........
अटेंड युवर अटायर्डस मी जाऊ देतोय ..... तर जा ना त्वचेचा झगमगाट थोडा चुंबनाची मिठाई पुरवणार आहे किस इज किस बेबी टच इज टच ! नाही तर नाही ! हो तर हो ! सिंथेटिक स्किन आणि रिअल स्किन ह्यांच्यात फरक कुठे राहलाय ? तुझ्याच विरहात जळाली त्वचा आणि मी ती बदलून घेतली. ये ! आती हैं तो खंडाला नहीं आती हैं तो खड्डे में डाला ! रोडरोमिओ अदा ! फिदा हैं तो बोल ! खोल तुझा झोल ! नाहीतर जा ना मी जाऊ देतोय ..... माझ्या काळजावर चढलय पिवळं प्लास्टिक पण तरीही ते कंडक्ट करतं वासनेची हिरवी इलेक्ट्रिसिटी तुझे डोळे आणि त्यातला रेडिएटरी निळा कम्पोनन्ट पाहून ! माझं मांस हायब्रीड आहे क्लोन आणि मूळ ह्यांचं म्हणून काय झालं ? तेही प्रोसेस संपलं कि सेन्सुअस होतं तुझ्या तळव्यात उमलत. रेषा रेषा वाचली जातीये हेडलॅम्पच्या जळजळाटात. एक जेल मॅट्रिक्स थरथरतंय त्वेच्या खाली! बोटांचा पिसारा दूर क्षणी उमलतोय स्तन भेटीत! तरीही जायायचं ब्रासकट तर जा ना मी जाऊ देतोय..... बघ हात मिठी ट्रान्सपोर्ट करायला उतावीळ  होतायत एक एक स्किन लेअर स्टिम्युलेट करतीये वासनेची वाढ झाडं   लागतायत बिन फळांची येऊ का उमलून ? बर्फात गोठलेली फुले शिशिराच्या गाडीत बसून आहेत. किती काळ पार्क करू तिला बॉडीत ? पार्किंग झोन वॉक आऊट होत चाललेत ट्रॅफिकवाले येतील गाडी उचलून न्हेतील.
      गेली !
      गाडी गेली !
      आता बस हा रिकामा रस्ता
      दोन हातांनी बोंबलवत !

********************************************************************************* 


 

   

 


१०६ वा शेवट

मोबाईल बोलतायत
शंभर कौरव बोलून संपलेत
पाच पांडव बोलून संपलेत
एक कर्ण उरलाय
तो शेवटची वाट पाहतोय
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

                                                                  II १ II 

         गाडीच्या ऐेसपैस जागेत पैस नाही म्हणून रेड्यासारखा काय पाहतोय ?
संभोगाचे प्रतिवेद तुझ्याकडून वदवून घेण्याइतपत संभोगेश्वर झालेली नाही माझी ब्लडी बीच जीभ !
मी तो हजारातला एक आहे ज्याच्यात एचआयव्हीला प्रतिबंध करणारं इनहेरीटेड जनेटीक म्युटेशन आहे
जे बाईतुन चालताना तिच्या त्वचेतलं    सिरॅमिक बॉण्डिंग जाता जाता पिघळवतं.
         हा पुरेसा वेळ पुरवणारा प्रवास
         हि पुरेशी जागा पुरवणारी बॅकसिट
         ताबडतोबीतही आक्खा मोर फुलवणारं जंगल माझ्या हालचालीत आहे आणि सूर्याचं ओरीजन शोधणारी निपॉनी करन्सी मी जाता जाता रक्तावतो.
        हा वासनेचा प्रकाश सहन होत नसेल तर का सोडून जात नाहीस गाडी? आरश्यातला माझा नागडीझम्मा पाहण्याची सक्ती मी कधी केली? खरी सभ्यता संभोगाला एकांतात सोडण्यात असते.
        तू मित्र आहेस आणि ड्रायव्हरही
        मित्राकडची नोकरी म्हणजे ९०-९० फंड
        म्हंटली तर सेवा म्हंटली तर डयुटी
        तुझी पादाकुलक शुद्धता माझं रेडिएशन एडिट नाही करू शकत
        जा उतर आणि रोमला विचार
        बॅकसीटवरचे संभोग हे हायजेनीक पुण्य की फील बॅड पाप?
                                                         
                                                                    II २ II 

        आता तुला काय  झालं?
        ज्याला जायाचं तो गाडीतून उतरून गेला आत्मसन्मानाच्या मार्गानं.
        इंजिनचं ब्रेकफील्ड पडेल दोन मिनटात बंद.
        माझ्या चेहऱ्याचे scars चुंबत कुठली बाराखडी सुरु करतीयेस?
        ह्या scars मध्ये सेक्स अपील आहे की काय?
       हि केअरींग बोटं इतकी डेअरींगबाज कधी झाली?
        ये ! कर ह्या गाडीची हॅंगींग गार्डन !
        हा कामाचा ऑड अवर गॉड अवर कर
        माझ्या कुठल्याच अवयवाला कसलाच ऑप्शन न देता
        तुझ्या दोन मांड्याच्या जीममध्ये करू दे माझ्या पोपटाला हिरवा व्यायाम
       थोडीशी स्विंग हो झिंग कमी होऊ न देता

      आठवणींचं स्टोरेज मिडीयम उधळून फक्त आत्ताची हो
   
      ओठांना दे कीसचा सडाफटिंग व्हॉइस
      मेन्यू उतरल्यासारखी नको अवतरूस
      एडिटिंगचा प्रोग्राम राख करून ये

       मुक्त शॉटमध्ये टिमटिमतोय  शॉवर. धबधबतोय घाम. टमटमतायत हात. झमझमतायत त्वचेची जाजम. माजातच ये
       मुश्किलीनं जमा झालेले फ्लॉवरड्रापस उमलतायत
       बिल्ट इन मायक्रोफोन वाजतायत
       डीस प्ले करणारं फक्त प्ले करतय
       ह्या पायातल्या क्रॉस ट्रेनरचा इम्पॅक्ट वाढतोय दर पावलात.

       ये ! ये ! ये !
       उडवून लाव आक्खी गाडी
       तुझ्या बॉडीत
       आणि पार्क हो
       सॅंडल काढून
       तम्मा तम्मा सॅण्डलहूडमध्ये

*********************************************************************************


       शत्रूबरोबर झोपायला मी काही गुप्तहेर नाही तेव्हा आधीच क्लीअर कर तू कोण?
       माझ्याजवळ आहेत माझ्या कंपनीचे डिटेल्स जे तुला उपयोगी पडतील तुझं करिअर प्रमोट करायला
        रिअल डेट आणि रील डेट ह्यांच्यातला फरक कळत नाही नुस्त्या डोळ्यांनी
       तेव्हा काय हवय?

       घरी दुधाची पिशवी येत असताना गाय विकत घ्यायला कोण मार्केटमध्ये जाईल?
       बाई सिन्सीयर नसली की डीनर फालतू होतो.
       फुलं घेऊ की नको?
       मी बुद्धु दिसेन की बुद्ध?

       पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दे हातात हात घेताना.
       रॅन्डम एनकाऊंटर रॅन्सम नको बनवू

      माझे कित्येक  वन नाईट स्टॅन्ड संभोगात पोहोचूनही प्रेमात जाऊन बसले नाहीत
      दुसऱ्या दिवशी पुन्हा मैत्रीत भटकलेत.

      हे सायबरअहमचे युग कुठल्याच खेळाला निश्चित नियम देत नाही
     तेव्हा चेसबोर्ड उधळून माझ्या रक्ताचा पाठलाग कर.
     स्टँडिंग अलोनचा मेंटेनन्स परवडत नाही माझ्या पायाला म्हणून तर ही प्रेमाकडं वाटचाल. माझ्या बॉक्स sat  Relationship Status दाखवणारी यंत्रणा नाही

      डोळे हे फसवे गडे वाकूनी त्यात पाहू नको


     हा उजव्या खांद्यावरचा स्पायडरमॅनचा टॅटू चुंब
     तुझ्या केसांचे जाळे त्याच्यात विखुर
     प्रत्येक पिढी स्वतःची लैंगिकता स्वतः शोधते

     आपल्याजवळ आहेत ऑपशन्स आणि प्रोटोकॉल नसलेलं शरीर
     कॅमेरे चुकव
     मी मीडिया ऑब्सेशन आणि हायपरसेक्युऍलिटीन भारावून जाणारा च्युतिया नाही
     शरीराच्या प्रत्येक कॉर्नरवर समाधान शोधणारा अजेंडा माझ्यातही आहे
     तो त्वचेचं सर्फिंग करत रूम टू रुम वाच
    सात जन्माची फेअरी टेल उध्वस्त करत येतोय तुझ्या आईबापाचा डिवोर्स
     त्याला वळण दे.


         ये ! आनंदी आनंद नागडे !
         फिंगरटीप्स वापर.
         हा गरम मिठीचा फुलफ्लेश एहसास उफ हा कमर्शिअल एकांताचा निखळ अंत


        ये ! ये !

        पेट्रोलिंग करणाऱ्या गाड्या उधळ तुझ्यात आवेगात
        Text Message Flirtation Sext Message Aleration होतंय
        ये!
       
         सगळं संपलंय की नवं सुरु झालंय?
         आणि हे काय
         मला म्हणायचंय I Love You
         आणि मी तुला वाचन दाखवतोय
         मोबाईलवर नुकतेच आलेले दोन ज्योक

*********************************************************************************
 
                                                                  शेअरबाजार

शेअर्समध्ये गळ्यापर्यंत बुडालेला मनुष्य
शेअर्स बुडाले म्हणून रडत चाललाय

शहरामध्ये ओठापर्यंत बुडालेला मनुष्य
शहर बुडाले म्हणून रडत चाललाय

शहामध्ये नाकापर्यंत बुडालेला मनुष्य
शह मिळाला म्हणून रडत चाललाय

रडत नाहीये फक्त तो
जो 'शू ' मध्ये डोक्यापर्यंत बुडालाय
आणि जो चालत आलेल्या पाण्यापासून
शहामृग बनवून
सर्वाना चेक देतोय

*********************************************************************************

                                                              कॉलसेंटर

         सगळ्या राजधान्या कॅपीटल पनीशमेंट देण्यात मग्न कॅपीटल लेटर्सही आता दहशतवादी वाटतात कॅपिटॅलीझमचे कॅपिटल आणि दास ह्यांच्यातला संघर्ष संपलाय असं वाटत असतानाच रक्त पुन्हा लाल रंगात लागलय परतायला.
         ही पिछेहाट आहे कि पहाट
         हे पिछेमूड आहे कि राहिलेल्या लोकांचा मूड
         क्रांत्यांची रहाट गाडगी मोजण्याचा काळ कधीचाच संपलाय चायनीज वॉल चीनी खेळणी निर्यात करण्यात वाकबगार होतीये पण त्यात स्थानिक कामगार जमीनदोस्त होतायत ह्याचं कुणालाच भान नाहीये. पॉलीटीकल स्टेटमेंट करायला घाबरतायत कवी प्रत्येक स्टेटमेंट शेवटी स्टेटला जाऊन मिळतं फेमची इस्टेट मिळत असताना मूळचंच कमी असलेलं कॅपीटल कोण बुडवणार? तेव्हा संवेदना घ्याव्यात संवेदना द्याव्यात बुडण्याची रिस्क न घेता हे बरे.
        ऑफिसात सबस्टन्स  आहे आणि स्टंटबाजीही! वर्क अवर्स मोजून पाळण्याचे दिवस इतिहासजमा !आरोग्याचे इन्शुरन्स उतरवायला इतक्या कंपन्या सज्ज असताना कुणाला हवं आहे आयुष्याच्या मूळ हेतूचं पुराण?
       Work is Warship.
        Extra time पाळणारे हिरो हिरोइन्स बाकीचे एक्सट्रा.
       बूमटाऊन रॅप आलापत डान्स करतायत पाय
       गांडुपणाचा दांडू आणि पांडुपणाची विटी ग्लॅमरस  करत काय करतायत टेबलाटेबलावर विखरून पडलेले हे जमाव ?
       अरे भडव्यांनो
       आम्ही थकलोय वी नीड रेस्ट हे सांगायला कम्युनिस्ट पक्षाचं सभासदत्व कशाला हवं?
रात्री न आलेल्या अर्धवट झोपेत उलटी करून पडलेलं रक्त त्यासाठी पुरेसं नाही का?

    ओका आणि भुंका
     माणुसकी न पाळणाऱ्या ह्या ह्युमन मॅनेजरमेंटवर निदान.

*********************************************************************************      
   college college                                         

पहावे त्याच्या हातात मोबाईल निघाला
भाषेला कैद केल्याचा फील आला

क्लासरूम मध्ये मधूनच रिंगटोनचा आवाज
डिस्टर्बन्स प्रत्येकाला सवयीचा झाला

स्क्रीनवर तीच आता चढणे अन उतरणे
हायकिंग सपाट झाले हिमालय टची झाला

आय लव यू म्हणणे फारच पुचाट झाले
प्रत्यक्ष सेक्स हाच एक्सप्रेशनल झाला

मेसेजचे ढग सर्वत्र पोहचले
नदी झाला माणूस प्रदूषणही झाला

गुगलचे वर्गात बागडणे सुरु झाले
हा व्हिजीटींग प्रोफेसर मेन प्रोफेसर झाला

आम्हास वाटले ह्याने ज्ञान मुक्त केले
मुक्तिदाता समजलो ज्यास तो जेलर निघाला

*********************************************************************************


हे राजकारण आहे
कि नवे वळण आहे

हत्ती नाहीसे झाले
सिलॅबसात त्यांच्यावर प्रकरण आहे

घोडा अडीचमध्ये संपला
घौडदौड फक्त आवरण आहे

प्याद्यांचे कुणास काय
ते तर आजन्म शरण आहे

उंटांनी तिरके चालून वाळवंट गाठले
डोईवर चंद्रग्रहण आहे

वजीर पोट सुटून वजनदार झाला
जागीच खिळून अंत:करण आहे

शेवटी दोन राजे उरलेत
पाहू कुणाच्या नशिबी मरण आहे

********************************************************************************* 



























































Friday, 18 August 2017

श्रीधर तिळवेच्या कविता

अशी कामवासनेची रेसिपी बनून
बसू नकोस माझ्यासमोर

संपूर्ण विश्वच ज्याचे ताट
त्याला लिमिटेड थाळी ऑफर करून काय मिळणार ?

हे खरं कि काही वर्षापूर्वी
माझ्या रक्तात माद्या आणि गाद्या नाचत होत्या

पण आता सगळा कापूस विरघळून गेलाय
आणि मी ढग नसलेलं आकाश बनून गेलोय

माझा नकार तुझा अपमान नाही
बाण  नाहीशे  झालेल्या शिवधनुष्याचा
मृदु मुलायम टणत्कार आहे

मी बॉलीवूडसाठी सीन्स पुरताच कामूक होतो
आणि सिन संपल्यावर मूक होऊन
आकाशात परततो

तेव्हा तुझ्या मोबाईलचे मला  सिमकार्ड बनवू नकोस

माझा देह खुल जा सीमसीमवाली गुहा राहिलेला  नाही
आणि चोरून कामवासना मॅनेज करणाऱ्या चाळीस चोरांची गरजही
मला उरलेली नाही

तेव्हा जा
कामूक वाटेला सभ्य बनवून

आणि माफ कर
तुझा चेक बाउन्स झाल्याबद्दल

मी बँकेबल राहिलेलो नाही मुली

मी बँका बुडवून चलनवलनात शिल्लक राहिलेल्या
कोऱ्या नोटेवरची सही आहे
जी कधीही उडून जाऊ शकते
***

बघता बघता हा Planet Humanet केला आपण
बघता बघता पृथ्वी Humiliate केली

स्वतःचं  गुरुत्वाकर्षण  मोजणं  विसरून
आपण पंक्तिप्रपंच   केला जगाच्या
ह्याच्या त्याच्या गुरुत्वाचा

एकमेकाचे चंद्र एकमेकाच्या गळ्यात टाकून
स्वतःला सूर्य समजणारे आपण

आपणाला कळतही नाही
जो बल्ब आपण तयार केला
तो बल्ब आता विझत चाललाय

आणि घटकाभर ऑन असलेल्या खटक्यावर
मटका लावून
नंबर मोजत
आपण जगत चाललोय

मित्रहो
तुमच्या वीजनिर्माणतेवर जंगले जगत नाहीयेत
ती पृथ्वीच्या महाजालावर जगतायत
आणि तुम्ही पृथ्वीला झालेल्या कॅन्सरसारखे
पृथ्वीच्या  नैसर्गिक अवयवात प्रसार पावतायत

तुम्हाला दिसत  नाही
व्यक्ति मेली
कि तिच्या आतला कॅन्सरही मरतो
हे साधे सरळ सत्य
***


पॅंटी अँड अंडरपॅन्ट
 ह्यांच्यातून वाहणारा वारा
एकाच टाईपाचा असतो


पॅशन आणि फॅशन
ह्यांच्यातला फरक नष्ट झाला
कि लोक अंतःकरणालाही कपडेबाज बनवतात
आणि धागा आणि ब्रॅण्ड ह्यावरून
वाद घालत
माणसाचा दर्जा ठरवतात


कुठल्याही आबोहवेत
मी पूर्वी टोपी घालून जायचो
तर लोक टोपी बघायचे
आता सोनेरी टोपी घालून जातो
तर लोक टोपी बघत नाहीत
सोनं बघतात


लोक इतके मूर्ख
कि देवाला आणि देवीलाही कपडे घालतात
आणि त्यांना कोणते कपडे घालायचे ह्यावरून भांडण लढवतात


 मी दिगंबर होत चाललोय
आणि लोकांचे कपडे माझ्यापुढे
आपोआपच गळायला लागलेत


तुम्ही ज्याला शोधताय
तो वारा मीच आहे
***

किसीने हँसकर छुपाया किसीने रोकर दिखाया
मगर ए दर्द तुझे हमने यहाँ हर दिलमे पाया

कभी मौतमे जाकर सोये कमी निंदमे मौतको देखा
कभी खुदको जलते देखा कभी दुनियाको मरघटमे जलाया

भरी जेबने सपने दिखाये खाली जेबने अपनेदिखाये
पैसा जबभी पास आया हमेशा आईना बनके आया

दो शुन्योंके बीचका हैं माथेमेटिक्स  लाईफ
पता नही किसने यहाँ  किसका हिसाब हैं लगाया

हर बजुर्गने कहा अपटूडेट रहो टीप टॉप रहो
मानो जीना कपडे पहनना है जिसे पेरिसने सिलाया
***

दिया किसीने जलाया मगर बुझेगा अन्दर तय है
जिन्दगी ना चुन सका मगर चुनेगा मौतका  मन्जर तय है
***

तुला माझे असे वाढणे अवजड वाटत चाललय
कॉन्टॅक्टचा फायदा हवा पण कॉन्टॅक्टची जबाबदारी नको

मी निसर्गतः केबल वाढवत कनेक्शनस  वाढवत वाढतो  आहे
आणि तू
कनेक्शनस काटणाऱ्या स्पेशलिस्टाच्या शोधात
मुंबईला एका मेजरची घरी
येत जात आहेस

मला तू शरीर भिड़वतीयेस असा  संशय आहे
आणि तू
मी टीव्ही असल्यासारखा
माला ऑन ऑफ़ करत

तुझा मेजर आपल्या रिलेशनशिपची बोर्डर निश्चित
करतोय
आणि तू तुझी फाळणी करत
दोन्ही ठिकाणी झेंडावंदन करतीयेस
 ***