shridhar tilve poems
w १ to १०
मी लिहीत राहिलो कागदावर लिहीत राहिलो
विष शब्दांबाहेरील शब्दात पीत राहिलो १
लोकांनी विचारले कि तू का लिहितोस इतके
उत्तरादाखल मी पुन्हा लिहीत राहिलो
मला लिहायचे नव्हते खोता इथे काहीही
कसा कुणास ठाऊक पण मी लिहीत राहिलो
तिच्या माझ्यात सारे मौखिक घडत होते
पण घडून गेल्यानंतर तिला लिहीत राहिलो
छापीलहो तू छापील किंचाळता राहिला प्रेस
मी छापखान्याबाहेर जाऊन लिहीत राहिलो
खूप काही मला करावयाचे होते
पण मी लिखाणापुरता मी सीमित राहिलो
केले भाषेबाहेर पाडण्याचे असंख्य प्रयत्न
पण तिथे पोहचलो तिचे भाषेच्या अंकीत राहिलो
कविता कोरे कागद आणि पेन
ह्या कृत्रिम मलामध्ये कसा टवटवीत राहिलो
काळजाचा माझ्या होता पाषाण ओबडधोबड
साहजिकच कवितेत मी खडबडीत राहिलो
त्यांनी दिलेल्या उत्तरांनी सर्व झाले समाधानी
मी एकटाच उत्तरांना प्रश्न विचारीत राहिलो
G १ TO १०
जबर समर्थक आहे मी मुक्त गजलेचा
वृक्षांना अन छंदाना बिनधास्त उडवीत राहिलो
माझी मुक्त तुम्हास अमान्य म्हणून
मान्यतेला तुमच्या थोबाडीत राहिलो
वाटणे फुटाणे शेंगदाणे उडाले टणाटणा
मी चिरमुरा होतो चिरिमिरीत कुरमुरीत राहिलो
तिच्या घरात गेले त्यांना काहीच नाही झाले
मी दारात काप गेलो कायम कलंकित राहिलो
मी गजल मुक्त करतो तुझे काही ऑब्जेक्शन ?
गालिब म्हणाला थँक्यु गजल उंचावीत राहिलो
शब्द आजारी नाहीत पण थकलेले आहेत
ही माझीच चूक त्यांना दवाखाने दाखवीत राहिलो
गजलेला माझ्याकडून काहीच अपेक्षा नव्हती
ती स्माईल देत राहिली अन मी हसवीन राहिलो
जी घरात राहत होती तिच्या अंगणात घेऊन आलो
थोडीशी मुक्ती होती थोडीशी मिळवीत राहिलो
आजची मुक्त स्त्री आणि आजची मुक्त गजल
ह्यांच्यात फरक नाही मी भेद मिटवीत राहिलो
R १ TO १०
तिच्या शिवाय कोणी नकोच होते मला
जाळण्यासाठी इतर पोटी फिरवीत राहिलो
जी मला म्हणाली मी विसरेन तुही विसर
ती सांगते मला तिच्या मी कायम आठवणीत राहिलो
मला वाटले होते तिच्याविना जीवन मरण
तिच्या विनाही मी मस्त ठणठणीत राहिलो
एकही आली नाही किंवा दोघी एकसाथ आल्या
एकतर उपाशी राहिलो किंवा डळमळीत राहिलो
ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभरी
ती बोर होती तिच्या गावात बाभळीत राहिलो
ज्या गावात ती बोर त्या गावच्या बाभळीत राहिलो
ती देत गेली सौन्दर्याने तिच्या शॉक
प्रणय संपला तेव्हा पडदे ओढीत राहिलो
तिला खूपच प्रयत्न केला वाईप आऊट करण्याचा
पण ती काळजात घुसली काळीज घुसळीत राहिलो
रस्ता लाईट सुद्धा तिला पाहावयास वाकलेल्या
मी रात्रभर मत्सराने गाडी वळवीत राहिलो
तीच म्हणाली मला तू घे घे सर्वस्त घे
त्या रात्रीचे तिचे मी रोमँटिक गुपीत राहिलो
पहिल्या भेटीत आमच्या काहीच बोलली नाही
झोपेन आवाजाच्या कल्पना करीत राहिलो
B १ TO १०
जिचे घेऊन पंख उडायचे होते सोबत
आयुष्यभर तिच्या चिमटीत राहिलो
कधीतरी मला ती तिचा देह देईल
आयुष्यभर अपेक्षेने तिच्या मिठीत राहिलो
दोन पोरे झाली तरी रोमान्स ताटकळलेला
वासनेला घराबाहेर वाट दाखवीत राहिलो
तिनेच इनिशियेटिव घेतला गरबा करताकरता
आयुष्यभर तिच्या लातावर मी पावले मोजीत राहिलो
आरसा पण खोटे बोलतो मेकपचा थर चढल्यावर
आरसा फोडीत राहिलो मेकप ओरबडीत राहिलो
तू सुंदर आहेस आणि तूच सुंदर आहेस
तिचा मूड ओसरला तेव्हा तिलाच पटवीत राहिलो
जे जे हटवले ते ते सर्वच रद्दी होते
"पण ती हटवली तर ?" अपवाद करत राहिलो
माझा मेंदू चालतो कसा ती जाणत होती नीट
डोके शक्यच नव्हते टोप्या बदलीत राहिलो
हातसुद्धा लाव नाही देणार मी तुम्हाला
रात्री बोलली पहाटे तिच्याच मिठीत राहिलो
S १ TO १०
कोटी कोटी आकडे आले चाल करुनी
करुनी मेंदू शून्य त्यांना मिळावीत राहिलो
एक तो परमेश्वर त्याच्याशी जोडण्यासाठी
माझ्या माणसांना मी तोडीत राहिलो
तलवार काढणारे कायम असुरक्षित राहिले
मी करुणेत माझ्या मुक्त सुरक्षीत राहिलो
पुनर्जन्म आहे कि नाही मला माहीत नाही
तो आहे विचाराने मी तरतरीत राहिलो
लांबी उंची खोली काळ दिशा पांच मित्यांच्या
जेलमध्ये मिथ्या कधी जेल ओलांडीत राहिलो
जगण्यात माझ्या नाही ग्रेस मी मान्य करतो
काँग्रेस गवतापासून स्वतःस वाचवीत राहिलो
शिव आहार देत राहिला आणि पार्वती मेन्यू
थाळीत पडून राहिलो कधी स्वतःत जेवीत राहलो
संन्यास फॅक्ट होता अन देह इनफॅक्ट होता
मेंदू स्वप्नात गुंतलेली बाहेर काढीत राहिलो
श्रीधर तिळवे नाईक
E १ TO १०
मला शोध होता खऱ्या खुर्या फुलांचा
प्लास्टीकी फुलामधले प्लास्टीक तुडवीत राहिलो
तथाकथित व्यक्तिमत्वात माझे काय होते
मी समाजाने केवळ बनून रचीत राहिलो
जगणे म्हणजे फोडणी अस्तित्वास मिळालेली
रेसीपी नला बनवून फोडणी आकळीत राहिलो
आयुष्य मिथ्थ्या आणि जगणे अभिनय आहे
हे कळताच जिथेतिथे अस्तित्व नटवीत राहिलो
तो माझ्यामुळे बनला किंवा मी बनवला गेलो
आयुष्यभर मी ह्या बनवाबनवीत राहिलो
ज्याला विस्तव भिडतो ते वास्तव आहे
मी वास्तवीक होतो म्हणून आगीत राहिलो
समाज पाषाण होता खालीवर न्हेत होता
मी कधी पर्वतावर तर कधी दरीत राहिलो
माझे अस्तित्व म्हणजे जगण्याचा किडा होता
कधी मेंदूत राहिलो कधी गांडीत राहिलो
स्वतःवाट पहात होते महाभारत घडण्याची
थोपवल्या कधी शतखंडित कधी शिरखंडीत राहिलो
M१ TO १०
काहीच साम्य नव्हते तुमच्यात माझ्यात मित्रांनो
इतकी वर्षे आपण एकत्रीत राहिलो
तो स्नेहभाव होता कि सेल्फइंटरेस्ट होता
कधीही कळले नाही तरी मैत्रीत राहिलो
करमणूक हवी होती पण कलंदर हवी होती
तिच्यासाठी एकमेकास विनाशर्त वापरीत राहिलो
सामाजिक होतो पण अराजकीय होतो
मैत्री अराजके होती पण राजे बनीत राहिलो
कधीतरी घ्या आपल्या वाटा होतील वेगळ्या
माहीत होते तरीही पाचवाटा बनवीत राहिलो
हमरस्त्यांनी चौफेर वेढा टाकला होता
ट्रॅफिकचे अफजलखान मस्त चुकवीत राहिलो
रुटीन जगलो नाही टीनटॉप झालो नाही
वाऱ्यांचे बनवलेले तारे उधळीत राहिलो
बालपणीच्या माझ्या जरी बागा वाळून गेल्या
मी बालमित्रांत माझ्या कायम सुगंधित राहिलो
शहरात माझ्या कित्तेक फ्रेंडगॅन्ग बनत गेल्या
प्रेमाच्या ओथंबणाऱ्या बॅगा भरीत राहिलो
K १ TO १०
सुटेल कोल्हापूर अचानक म्हणून
कवितेने घाईघाईने शहर शिलगावीत राहिलो
हे कोल्हापूर शहर कायम ब्लॅक अँड व्हाईट
स्वबळावर कंटेम्पररी फ्रेश रंगीत राहीलो
क्षणाक्षणाला इतके वाट्याला दुःख आले
कि आले सुख तेव्हा मी अचंबीत राहिलो
माझा शिवाजी कधीही विशाळगडी पोचला नाही
मी एकटाच लढत लढत पावन खिंडीत राहिलो
हे शहर आहे कि इतिहासाची भुताटकी
कम्प्युटर चालून आले तरी सरंजामशाहीत राहिलो
कवितेत म्यान करून हे शहर सोडून जाईन
हे कायम राहील मी तलवारीत राहिलो
सज्जाची कोठी कधीही ताब्यात नाही आली
मी पावनगडावरून कारभार चालवीत राहिलो
माझाही शिवाजी केला माझ्याच ह्या लोकांनी
कधी हा किल्ला लढवीत कधी हा सोडावीत राहिलो
ना मला मान्यता दिली ना मला अटकान केला
ह्या शहरामध्ये कायम मी संशयीत राहिलो
P १ TO १० POMO
शेकडो जाळी बांधली पकडण्यासाठी मला
मी हिशेब कोळ्यांचे कायम चुकवीत राहिलो १
केऑस आला आणि आसपास दरवळत राहिला
मी माझ्या सुवासात नीट संघटीत राहिलो
हातात माझ्या कायम बादच पत्ते आले
मी हरू नये म्हणून डाव उधळीत राहिलो
व्यवस्था रचित राहिली प्रत्येकात काळेबेरे
त्वचेने काळा मेंदूने मी रत्न जडीत राहिलो
काळाने लोकांमध्ये कायम मला खिजवले
ती खूण होती कि त्याच्या मी खिजगिलतीत राहिलो
एनसायक्लोपिडीया ज्या शहाण्यांनी रचले
कलोनियल साम्राज्यात मी पिडीत राहिलो
माझ्या अप्रानेटचे नेमके नाकच नकटे
ते नीट चालावे म्हणून सुरेखा म्हणीत राहिलो
कटकारस्थान करून कटच काढून घेतला
तरीही मिसळीसारखा मी झणझणीत राहिलो
S१ TO १०
द्या क्षमा शांतिला माझ्या रक्त लागले
संन्यासी झालो तरीही मी रक्तांजीत राहिलो शेवटी
स्पर्शाने शाप होता मला वाटोळे होण्याचा
मी अनटचेबल कायम घटकंचुकीत राहिलो
F१ तो F१०
कधीतरी संपेल विहिरीच्यातील पेट्रोल
आयुष्यभर अपेक्षेने बैलगाडीत राहिलो
हाही हंगाम वाया
तरीही कुणास ठाऊक का मी शेतीत राहिलो
पडीक ठेवली तरच कदाचित फायद्यात जाईन
माहित होते तरीही जमीन उबवीत राहिलो
उगवाई अन सटवाई दोन बायांनी मारले
एकीच्या ज्ञानात राहिलो दुसरीच्या भक्तीत राहिलो
विठ्ठल पावला नाही कधी काळ्या आईला
जरी तिच्या करता पंढरीत राहिलो
वारीवरचा उडाला होता भरवसा
तरीही वसा म्हणुनी जात वारीत राहिलो
कर्जाचा डोंगर चढला मेंदूची झाली थप्पी
दोघांना व्याजावरती मी गोंजारीत राहिलो
मानवजात मरावी म्हणून दुष्काळ महापूर धाडले
देव मारत राहिला मी शेतीत तारीत राहिलो
बनवेगिटीचा बाजार अनावश्यक वाढत राहिला
माझे पीक अस्सल उगवीत आवश्यक उगवीत राहिलो
माझ्याही शेतात येऊन आर्किऑलॉजी करा
सांगा किती शतके मी घाम गाळीत राहिलो
w १ to १०
मी लिहीत राहिलो कागदावर लिहीत राहिलो
विष शब्दांबाहेरील शब्दात पीत राहिलो १
लोकांनी विचारले कि तू का लिहितोस इतके
उत्तरादाखल मी पुन्हा लिहीत राहिलो
मला लिहायचे नव्हते खोता इथे काहीही
कसा कुणास ठाऊक पण मी लिहीत राहिलो
तिच्या माझ्यात सारे मौखिक घडत होते
पण घडून गेल्यानंतर तिला लिहीत राहिलो
छापीलहो तू छापील किंचाळता राहिला प्रेस
मी छापखान्याबाहेर जाऊन लिहीत राहिलो
खूप काही मला करावयाचे होते
पण मी लिखाणापुरता मी सीमित राहिलो
केले भाषेबाहेर पाडण्याचे असंख्य प्रयत्न
पण तिथे पोहचलो तिचे भाषेच्या अंकीत राहिलो
कविता कोरे कागद आणि पेन
ह्या कृत्रिम मलामध्ये कसा टवटवीत राहिलो
काळजाचा माझ्या होता पाषाण ओबडधोबड
साहजिकच कवितेत मी खडबडीत राहिलो
त्यांनी दिलेल्या उत्तरांनी सर्व झाले समाधानी
मी एकटाच उत्तरांना प्रश्न विचारीत राहिलो
जबर समर्थक आहे मी मुक्त गजलेचा
वृक्षांना अन छंदाना बिनधास्त उडवीत राहिलो
माझी मुक्त तुम्हास अमान्य म्हणून
मान्यतेला तुमच्या थोबाडीत राहिलो
वाटणे फुटाणे शेंगदाणे उडाले टणाटणा
मी चिरमुरा होतो चिरिमिरीत कुरमुरीत राहिलो
तिच्या घरात गेले त्यांना काहीच नाही झाले
मी दारात काप गेलो कायम कलंकित राहिलो
मी गजल मुक्त करतो तुझे काही ऑब्जेक्शन ?
गालिब म्हणाला थँक्यु गजल उंचावीत राहिलो
शब्द आजारी नाहीत पण थकलेले आहेत
ही माझीच चूक त्यांना दवाखाने दाखवीत राहिलो
गजलेला माझ्याकडून काहीच अपेक्षा नव्हती
ती स्माईल देत राहिली अन मी हसवीन राहिलो
जी घरात राहत होती तिच्या अंगणात घेऊन आलो
थोडीशी मुक्ती होती थोडीशी मिळवीत राहिलो
आजची मुक्त स्त्री आणि आजची मुक्त गजल
ह्यांच्यात फरक नाही मी भेद मिटवीत राहिलो
R १ TO १०
तिच्या शिवाय कोणी नकोच होते मला
जाळण्यासाठी इतर पोटी फिरवीत राहिलो
जी मला म्हणाली मी विसरेन तुही विसर
ती सांगते मला तिच्या मी कायम आठवणीत राहिलो
मला वाटले होते तिच्याविना जीवन मरण
तिच्या विनाही मी मस्त ठणठणीत राहिलो
एकही आली नाही किंवा दोघी एकसाथ आल्या
एकतर उपाशी राहिलो किंवा डळमळीत राहिलो
ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभरी
ती बोर होती तिच्या गावात बाभळीत राहिलो
ज्या गावात ती बोर त्या गावच्या बाभळीत राहिलो
ती देत गेली सौन्दर्याने तिच्या शॉक
प्रणय संपला तेव्हा पडदे ओढीत राहिलो
तिला खूपच प्रयत्न केला वाईप आऊट करण्याचा
पण ती काळजात घुसली काळीज घुसळीत राहिलो
रस्ता लाईट सुद्धा तिला पाहावयास वाकलेल्या
मी रात्रभर मत्सराने गाडी वळवीत राहिलो
तीच म्हणाली मला तू घे घे सर्वस्त घे
त्या रात्रीचे तिचे मी रोमँटिक गुपीत राहिलो
पहिल्या भेटीत आमच्या काहीच बोलली नाही
झोपेन आवाजाच्या कल्पना करीत राहिलो
B १ TO १०
जिचे घेऊन पंख उडायचे होते सोबत
आयुष्यभर तिच्या चिमटीत राहिलो
कधीतरी मला ती तिचा देह देईल
आयुष्यभर अपेक्षेने तिच्या मिठीत राहिलो
दोन पोरे झाली तरी रोमान्स ताटकळलेला
वासनेला घराबाहेर वाट दाखवीत राहिलो
तिनेच इनिशियेटिव घेतला गरबा करताकरता
आयुष्यभर तिच्या लातावर मी पावले मोजीत राहिलो
आरसा पण खोटे बोलतो मेकपचा थर चढल्यावर
आरसा फोडीत राहिलो मेकप ओरबडीत राहिलो
तू सुंदर आहेस आणि तूच सुंदर आहेस
तिचा मूड ओसरला तेव्हा तिलाच पटवीत राहिलो
जे जे हटवले ते ते सर्वच रद्दी होते
"पण ती हटवली तर ?" अपवाद करत राहिलो
माझा मेंदू चालतो कसा ती जाणत होती नीट
डोके शक्यच नव्हते टोप्या बदलीत राहिलो
हातसुद्धा लाव नाही देणार मी तुम्हाला
रात्री बोलली पहाटे तिच्याच मिठीत राहिलो
S १ TO १०
कोटी कोटी आकडे आले चाल करुनी
करुनी मेंदू शून्य त्यांना मिळावीत राहिलो
एक तो परमेश्वर त्याच्याशी जोडण्यासाठी
माझ्या माणसांना मी तोडीत राहिलो
तलवार काढणारे कायम असुरक्षित राहिले
मी करुणेत माझ्या मुक्त सुरक्षीत राहिलो
पुनर्जन्म आहे कि नाही मला माहीत नाही
तो आहे विचाराने मी तरतरीत राहिलो
लांबी उंची खोली काळ दिशा पांच मित्यांच्या
जेलमध्ये मिथ्या कधी जेल ओलांडीत राहिलो
जगण्यात माझ्या नाही ग्रेस मी मान्य करतो
काँग्रेस गवतापासून स्वतःस वाचवीत राहिलो
शिव आहार देत राहिला आणि पार्वती मेन्यू
थाळीत पडून राहिलो कधी स्वतःत जेवीत राहलो
संन्यास फॅक्ट होता अन देह इनफॅक्ट होता
मेंदू स्वप्नात गुंतलेली बाहेर काढीत राहिलो
श्रीधर तिळवे नाईक
E १ TO १०
मला शोध होता खऱ्या खुर्या फुलांचा
प्लास्टीकी फुलामधले प्लास्टीक तुडवीत राहिलो
तथाकथित व्यक्तिमत्वात माझे काय होते
मी समाजाने केवळ बनून रचीत राहिलो
जगणे म्हणजे फोडणी अस्तित्वास मिळालेली
रेसीपी नला बनवून फोडणी आकळीत राहिलो
आयुष्य मिथ्थ्या आणि जगणे अभिनय आहे
हे कळताच जिथेतिथे अस्तित्व नटवीत राहिलो
तो माझ्यामुळे बनला किंवा मी बनवला गेलो
आयुष्यभर मी ह्या बनवाबनवीत राहिलो
ज्याला विस्तव भिडतो ते वास्तव आहे
मी वास्तवीक होतो म्हणून आगीत राहिलो
समाज पाषाण होता खालीवर न्हेत होता
मी कधी पर्वतावर तर कधी दरीत राहिलो
माझे अस्तित्व म्हणजे जगण्याचा किडा होता
कधी मेंदूत राहिलो कधी गांडीत राहिलो
स्वतःवाट पहात होते महाभारत घडण्याची
थोपवल्या कधी शतखंडित कधी शिरखंडीत राहिलो
M१ TO १०
काहीच साम्य नव्हते तुमच्यात माझ्यात मित्रांनो
इतकी वर्षे आपण एकत्रीत राहिलो
तो स्नेहभाव होता कि सेल्फइंटरेस्ट होता
कधीही कळले नाही तरी मैत्रीत राहिलो
करमणूक हवी होती पण कलंदर हवी होती
तिच्यासाठी एकमेकास विनाशर्त वापरीत राहिलो
सामाजिक होतो पण अराजकीय होतो
मैत्री अराजके होती पण राजे बनीत राहिलो
कधीतरी घ्या आपल्या वाटा होतील वेगळ्या
माहीत होते तरीही पाचवाटा बनवीत राहिलो
हमरस्त्यांनी चौफेर वेढा टाकला होता
ट्रॅफिकचे अफजलखान मस्त चुकवीत राहिलो
रुटीन जगलो नाही टीनटॉप झालो नाही
वाऱ्यांचे बनवलेले तारे उधळीत राहिलो
बालपणीच्या माझ्या जरी बागा वाळून गेल्या
मी बालमित्रांत माझ्या कायम सुगंधित राहिलो
शहरात माझ्या कित्तेक फ्रेंडगॅन्ग बनत गेल्या
प्रेमाच्या ओथंबणाऱ्या बॅगा भरीत राहिलो
K १ TO १०
सुटेल कोल्हापूर अचानक म्हणून
कवितेने घाईघाईने शहर शिलगावीत राहिलो
हे कोल्हापूर शहर कायम ब्लॅक अँड व्हाईट
स्वबळावर कंटेम्पररी फ्रेश रंगीत राहीलो
क्षणाक्षणाला इतके वाट्याला दुःख आले
कि आले सुख तेव्हा मी अचंबीत राहिलो
माझा शिवाजी कधीही विशाळगडी पोचला नाही
मी एकटाच लढत लढत पावन खिंडीत राहिलो
हे शहर आहे कि इतिहासाची भुताटकी
कम्प्युटर चालून आले तरी सरंजामशाहीत राहिलो
कवितेत म्यान करून हे शहर सोडून जाईन
हे कायम राहील मी तलवारीत राहिलो
सज्जाची कोठी कधीही ताब्यात नाही आली
मी पावनगडावरून कारभार चालवीत राहिलो
माझाही शिवाजी केला माझ्याच ह्या लोकांनी
कधी हा किल्ला लढवीत कधी हा सोडावीत राहिलो
ना मला मान्यता दिली ना मला अटकान केला
ह्या शहरामध्ये कायम मी संशयीत राहिलो
P १ TO १० POMO
शेकडो जाळी बांधली पकडण्यासाठी मला
मी हिशेब कोळ्यांचे कायम चुकवीत राहिलो १
केऑस आला आणि आसपास दरवळत राहिला
मी माझ्या सुवासात नीट संघटीत राहिलो
हातात माझ्या कायम बादच पत्ते आले
मी हरू नये म्हणून डाव उधळीत राहिलो
व्यवस्था रचित राहिली प्रत्येकात काळेबेरे
त्वचेने काळा मेंदूने मी रत्न जडीत राहिलो
काळाने लोकांमध्ये कायम मला खिजवले
ती खूण होती कि त्याच्या मी खिजगिलतीत राहिलो
एनसायक्लोपिडीया ज्या शहाण्यांनी रचले
कलोनियल साम्राज्यात मी पिडीत राहिलो
माझ्या अप्रानेटचे नेमके नाकच नकटे
ते नीट चालावे म्हणून सुरेखा म्हणीत राहिलो
तरीही मिसळीसारखा मी झणझणीत राहिलो
S१ TO १०
द्या क्षमा शांतिला माझ्या रक्त लागले
संन्यासी झालो तरीही मी रक्तांजीत राहिलो शेवटी
स्पर्शाने शाप होता मला वाटोळे होण्याचा
मी अनटचेबल कायम घटकंचुकीत राहिलो
कधीतरी संपेल विहिरीच्यातील पेट्रोल
आयुष्यभर अपेक्षेने बैलगाडीत राहिलो
हाही हंगाम वाया
तरीही कुणास ठाऊक का मी शेतीत राहिलो
पडीक ठेवली तरच कदाचित फायद्यात जाईन
माहित होते तरीही जमीन उबवीत राहिलो
उगवाई अन सटवाई दोन बायांनी मारले
एकीच्या ज्ञानात राहिलो दुसरीच्या भक्तीत राहिलो
विठ्ठल पावला नाही कधी काळ्या आईला
जरी तिच्या करता पंढरीत राहिलो
वारीवरचा उडाला होता भरवसा
तरीही वसा म्हणुनी जात वारीत राहिलो
कर्जाचा डोंगर चढला मेंदूची झाली थप्पी
दोघांना व्याजावरती मी गोंजारीत राहिलो
मानवजात मरावी म्हणून दुष्काळ महापूर धाडले
देव मारत राहिला मी शेतीत तारीत राहिलो
बनवेगिटीचा बाजार अनावश्यक वाढत राहिला
माझे पीक अस्सल उगवीत आवश्यक उगवीत राहिलो
माझ्याही शेतात येऊन आर्किऑलॉजी करा
सांगा किती शतके मी घाम गाळीत राहिलो
No comments:
Post a Comment