Friday, 24 March 2017

shridhar tilve poems

w १ to १०
मी लिहीत राहिलो कागदावर लिहीत राहिलो
विष शब्दांबाहेरील शब्दात पीत राहिलो १

लोकांनी विचारले कि तू का लिहितोस इतके
उत्तरादाखल मी पुन्हा लिहीत राहिलो

मला लिहायचे नव्हते खोता इथे काहीही
कसा कुणास ठाऊक पण मी लिहीत राहिलो

तिच्या माझ्यात सारे मौखिक घडत होते
पण घडून गेल्यानंतर तिला लिहीत राहिलो

छापीलहो तू छापील किंचाळता राहिला प्रेस
मी छापखान्याबाहेर जाऊन लिहीत राहिलो

खूप काही मला करावयाचे होते
पण मी लिखाणापुरता मी सीमित राहिलो

केले भाषेबाहेर पाडण्याचे असंख्य प्रयत्न
पण तिथे पोहचलो तिचे भाषेच्या अंकीत राहिलो

कविता कोरे कागद आणि पेन
ह्या कृत्रिम मलामध्ये कसा टवटवीत राहिलो

काळजाचा माझ्या होता पाषाण ओबडधोबड
साहजिकच कवितेत मी खडबडीत राहिलो

त्यांनी दिलेल्या उत्तरांनी सर्व झाले समाधानी
मी एकटाच उत्तरांना प्रश्न विचारीत राहिलो

G १ TO १०
जबर समर्थक आहे मी मुक्त गजलेचा
वृक्षांना अन छंदाना बिनधास्त उडवीत राहिलो

माझी मुक्त तुम्हास अमान्य म्हणून
मान्यतेला तुमच्या थोबाडीत राहिलो

वाटणे फुटाणे शेंगदाणे उडाले टणाटणा
मी चिरमुरा होतो चिरिमिरीत कुरमुरीत राहिलो

तिच्या घरात गेले त्यांना काहीच नाही झाले
मी दारात काप गेलो कायम कलंकित राहिलो

मी गजल मुक्त करतो तुझे काही ऑब्जेक्शन ?
गालिब म्हणाला थँक्यु गजल उंचावीत राहिलो

शब्द आजारी नाहीत पण थकलेले आहेत
ही माझीच चूक त्यांना दवाखाने दाखवीत राहिलो  

गजलेला माझ्याकडून काहीच अपेक्षा नव्हती
ती स्माईल देत राहिली अन मी हसवीन राहिलो

जी घरात राहत होती तिच्या अंगणात घेऊन आलो
थोडीशी मुक्ती होती थोडीशी मिळवीत राहिलो


आजची मुक्त स्त्री आणि आजची मुक्त गजल
ह्यांच्यात फरक नाही मी भेद मिटवीत राहिलो


R १ TO १०
तिच्या शिवाय कोणी नकोच होते मला
जाळण्यासाठी इतर पोटी फिरवीत राहिलो

जी मला म्हणाली मी विसरेन तुही विसर
ती सांगते मला तिच्या मी कायम आठवणीत राहिलो

मला वाटले होते तिच्याविना जीवन मरण
तिच्या विनाही मी मस्त ठणठणीत राहिलो

एकही आली नाही किंवा दोघी एकसाथ आल्या
एकतर उपाशी राहिलो किंवा डळमळीत राहिलो

ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभरी
ती बोर होती तिच्या गावात बाभळीत राहिलो
ज्या गावात ती बोर त्या गावच्या बाभळीत राहिलो

ती देत गेली सौन्दर्याने तिच्या शॉक
प्रणय संपला तेव्हा पडदे ओढीत राहिलो

तिला खूपच प्रयत्न केला वाईप आऊट करण्याचा
पण ती काळजात घुसली काळीज घुसळीत राहिलो

रस्ता लाईट सुद्धा तिला पाहावयास वाकलेल्या
मी रात्रभर मत्सराने गाडी वळवीत राहिलो

तीच म्हणाली मला तू घे घे सर्वस्त घे
त्या रात्रीचे तिचे मी रोमँटिक गुपीत राहिलो

पहिल्या भेटीत आमच्या काहीच बोलली नाही
झोपेन आवाजाच्या कल्पना करीत राहिलो


B १ TO १०
जिचे घेऊन पंख उडायचे होते सोबत
आयुष्यभर तिच्या चिमटीत राहिलो

कधीतरी मला ती तिचा देह देईल
आयुष्यभर अपेक्षेने तिच्या मिठीत राहिलो

दोन पोरे झाली तरी रोमान्स ताटकळलेला
वासनेला घराबाहेर वाट दाखवीत राहिलो

तिनेच इनिशियेटिव घेतला गरबा करताकरता
आयुष्यभर तिच्या लातावर मी पावले मोजीत राहिलो 

आरसा पण खोटे बोलतो मेकपचा थर चढल्यावर
आरसा फोडीत राहिलो मेकप ओरबडीत राहिलो 

तू सुंदर आहेस आणि तूच सुंदर आहेस
तिचा मूड ओसरला तेव्हा तिलाच पटवीत राहिलो

जे जे हटवले ते ते सर्वच रद्दी होते
"पण ती हटवली तर ?" अपवाद करत राहिलो

माझा मेंदू चालतो कसा ती जाणत होती नीट
डोके शक्यच नव्हते टोप्या बदलीत राहिलो

हातसुद्धा लाव नाही देणार मी तुम्हाला
रात्री बोलली पहाटे तिच्याच मिठीत राहिलो

S १ TO १०
कोटी कोटी आकडे आले चाल करुनी
करुनी मेंदू शून्य त्यांना मिळावीत राहिलो

एक तो परमेश्वर त्याच्याशी जोडण्यासाठी
माझ्या माणसांना मी तोडीत राहिलो

तलवार काढणारे कायम असुरक्षित राहिले
मी करुणेत माझ्या मुक्त सुरक्षीत राहिलो

पुनर्जन्म आहे कि नाही मला माहीत नाही
तो आहे विचाराने मी तरतरीत राहिलो

लांबी उंची खोली काळ दिशा पांच मित्यांच्या
जेलमध्ये मिथ्या कधी जेल ओलांडीत राहिलो

जगण्यात माझ्या नाही ग्रेस मी मान्य करतो
काँग्रेस गवतापासून स्वतःस वाचवीत राहिलो

शिव आहार देत राहिला आणि पार्वती मेन्यू
थाळीत पडून राहिलो कधी स्वतःत जेवीत राहलो

संन्यास फॅक्ट होता अन देह इनफॅक्ट होता
मेंदू स्वप्नात गुंतलेली बाहेर काढीत राहिलो

श्रीधर तिळवे नाईक

E १ TO १०

मला शोध होता खऱ्या खुर्या फुलांचा
प्लास्टीकी फुलामधले प्लास्टीक तुडवीत राहिलो

तथाकथित  व्यक्तिमत्वात माझे काय होते
मी समाजाने केवळ बनून रचीत राहिलो

जगणे म्हणजे फोडणी अस्तित्वास मिळालेली
रेसीपी नला बनवून फोडणी आकळीत राहिलो

आयुष्य मिथ्थ्या आणि जगणे अभिनय आहे
हे कळताच जिथेतिथे अस्तित्व नटवीत राहिलो

तो माझ्यामुळे बनला किंवा मी बनवला गेलो
आयुष्यभर मी ह्या बनवाबनवीत राहिलो

ज्याला विस्तव भिडतो ते वास्तव आहे
मी वास्तवीक होतो म्हणून आगीत राहिलो

समाज पाषाण होता  खालीवर न्हेत होता
मी कधी पर्वतावर तर कधी दरीत राहिलो

माझे अस्तित्व म्हणजे जगण्याचा किडा होता
कधी मेंदूत राहिलो कधी गांडीत राहिलो

स्वतःवाट पहात होते महाभारत घडण्याची
थोपवल्या कधी शतखंडित कधी शिरखंडीत राहिलो


M१ TO १०
काहीच साम्य नव्हते तुमच्यात माझ्यात मित्रांनो
इतकी वर्षे आपण एकत्रीत राहिलो

तो स्नेहभाव होता कि सेल्फइंटरेस्ट होता
कधीही कळले नाही तरी मैत्रीत राहिलो

करमणूक हवी होती पण कलंदर हवी होती
तिच्यासाठी एकमेकास विनाशर्त वापरीत राहिलो

सामाजिक होतो पण अराजकीय होतो
मैत्री अराजके होती पण राजे बनीत राहिलो

कधीतरी घ्या आपल्या वाटा होतील वेगळ्या
माहीत होते तरीही पाचवाटा बनवीत राहिलो

हमरस्त्यांनी चौफेर वेढा टाकला होता
ट्रॅफिकचे अफजलखान मस्त चुकवीत राहिलो

रुटीन जगलो नाही टीनटॉप झालो नाही
वाऱ्यांचे बनवलेले तारे उधळीत राहिलो

बालपणीच्या माझ्या जरी बागा वाळून गेल्या
मी बालमित्रांत माझ्या कायम सुगंधित राहिलो

शहरात माझ्या कित्तेक फ्रेंडगॅन्ग बनत गेल्या
प्रेमाच्या ओथंबणाऱ्या बॅगा भरीत राहिलो


K १ TO १०
सुटेल कोल्हापूर अचानक म्हणून
कवितेने घाईघाईने शहर शिलगावीत राहिलो

हे कोल्हापूर शहर कायम ब्लॅक अँड व्हाईट
स्वबळावर कंटेम्पररी फ्रेश रंगीत राहीलो

क्षणाक्षणाला इतके वाट्याला दुःख आले
कि आले सुख तेव्हा मी अचंबीत राहिलो

माझा शिवाजी कधीही विशाळगडी पोचला नाही
मी एकटाच लढत लढत पावन खिंडीत राहिलो

हे शहर आहे कि इतिहासाची भुताटकी
कम्प्युटर चालून आले तरी सरंजामशाहीत राहिलो

कवितेत म्यान करून हे शहर सोडून जाईन
हे कायम राहील मी तलवारीत राहिलो

सज्जाची कोठी कधीही ताब्यात नाही आली
मी पावनगडावरून कारभार चालवीत  राहिलो

माझाही शिवाजी केला माझ्याच ह्या लोकांनी
कधी हा किल्ला लढवीत कधी हा सोडावीत राहिलो

ना मला मान्यता दिली ना मला अटकान केला
ह्या शहरामध्ये कायम मी संशयीत राहिलो




P १ TO १०  POMO

शेकडो जाळी बांधली पकडण्यासाठी मला
मी हिशेब कोळ्यांचे कायम चुकवीत राहिलो १

केऑस आला आणि आसपास दरवळत राहिला
मी माझ्या सुवासात नीट संघटीत राहिलो

हातात माझ्या कायम बादच पत्ते आले
मी हरू नये म्हणून डाव उधळीत राहिलो

व्यवस्था रचित राहिली प्रत्येकात काळेबेरे
त्वचेने काळा मेंदूने मी रत्न जडीत राहिलो  

काळाने लोकांमध्ये कायम मला खिजवले
ती खूण होती कि त्याच्या मी खिजगिलतीत राहिलो

एनसायक्लोपिडीया ज्या शहाण्यांनी रचले
कलोनियल साम्राज्यात मी पिडीत राहिलो

माझ्या अप्रानेटचे नेमके नाकच नकटे
ते नीट चालावे म्हणून सुरेखा म्हणीत राहिलो

कटकारस्थान करून कटच काढून घेतला
तरीही मिसळीसारखा मी झणझणीत राहिलो




S१ TO १०
द्या क्षमा शांतिला माझ्या रक्त लागले
संन्यासी झालो तरीही मी रक्तांजीत राहिलो शेवटी

स्पर्शाने शाप होता मला वाटोळे होण्याचा

मी अनटचेबल कायम घटकंचुकीत राहिलो

F१ तो F१०
कधीतरी  संपेल विहिरीच्यातील पेट्रोल
आयुष्यभर अपेक्षेने बैलगाडीत राहिलो

हाही हंगाम वाया
तरीही कुणास ठाऊक का मी शेतीत राहिलो

पडीक ठेवली तरच कदाचित फायद्यात जाईन
माहित होते तरीही जमीन उबवीत राहिलो

उगवाई अन सटवाई दोन बायांनी मारले
एकीच्या ज्ञानात राहिलो दुसरीच्या भक्तीत राहिलो

विठ्ठल पावला नाही कधी काळ्या आईला
जरी तिच्या करता पंढरीत राहिलो

वारीवरचा उडाला होता भरवसा
तरीही वसा म्हणुनी जात वारीत राहिलो

कर्जाचा डोंगर चढला मेंदूची झाली थप्पी
दोघांना व्याजावरती मी गोंजारीत राहिलो

मानवजात मरावी म्हणून दुष्काळ महापूर धाडले
देव मारत राहिला मी शेतीत तारीत राहिलो

बनवेगिटीचा बाजार अनावश्यक वाढत राहिला
माझे पीक अस्सल उगवीत  आवश्यक उगवीत राहिलो

माझ्याही शेतात येऊन आर्किऑलॉजी करा
सांगा किती शतके मी घाम गाळीत राहिलो
















 श्रीधर तिळवे ह्यांच्या जुन्या कविता 

Wednesday, 22 March 2017

श्रीधर तिळवेच्या कविता

 युरेका द्विभागी
                                       जग आणि मी 

१. समथिंग वेन्ट रोंग                                १. समथिंग वेन्ट राईट
आणि जग जन्मले                                        आणि मी जन्मलो

२. जग जन्मल्यानंतर कित्तेक                   २. माझा जन्म
काळाने माणसाने त्याचा उत्सव                      हा आईचा उत्सव होता
ईश्वर म्हणून साजरा केला

३. आकस्मिकता जगाचा प्राण आहे              ३. मी प्राणायाम शिकत
                                                                     जगात दाखल झालो

४. जगापूर्वी कोणी काहीही बोलले नव्हते       ४. आईने मी जन्मावो म्हणून कसलाही नवस केला नव्हता
                                                                      'मी' झाल्यावर देवांना बघून घेऊ इतकी ती प्रॅक्टिकल होती

५. जगाच्या जगविषयी कसल्याही                ५. माझ्याकडून आईच्या कसल्याही अपेक्षा नव्हत्या
अपेक्षा नव्हत्या                                               त्यामुळेच माझ्याविषयी कसल्या अपेक्षा नव्हत्या

६. जगाचा जन्म हीच खरी क़यामत आहे        ६. मी एखाद्या आशीर्वादा सारखा जन्मलो \

७. जगाने आत्मचरित्र लिहिले नाही                ७. मी मात्र कविता लिहितोय


                                                   अन्न 

अन्न बनवलं जातंय                                           अन्न झाकलं  जातंय
अन्न ताणवलं जातंय                                          अन्न टाकलं जातंय

अन्न मळलं जातंय                                             अन्न गाळलं जातंय
अन्न तळलं  जातंय                                             अन्न फेटाळलं जातंय

अन्न भिजवलं जातंय                                         अन्न मागितलं जातंय
अन्न शिजवलं जातंय                                          अन्न सांगितलं जातंय
अन्न सजवलं जातंय                                           अन्न रांगेतल जातंय

अन्न प्रेमवलं जातंय                                           अन्न नागवलं  जातंय
अन्न फ्रेमवल जातंय                                           अन्न पांगवलं जातंय
अन्न दमवलं  जातंय                                          अन्न रुजवलं जातंय

इतकं होऊनही अन्न असमाधानी आहे                 इतक अन्न पुरूनही
अन्नाला आणखी काय  हवयं ?                           सर्वत्र भूक का उगवतीये


मी अन्न आहे                                                   भूक म्हणून उगवतोय


                                                   मी  आणि इच्छा 


१. मी इच्छेतून चाललोय गोगलगाय                         १. इच्छा माझ्यातून चललिये
टाळायची आहे. तिचा वेग तिची दुर्बलता                    ती टीप  म्हणून तिच्या सावलीतून फुलपाखरे
आहे. मात्र ती ज्याच्यावरून चाललिये तो                   म्हणून मी तिला सर्व करतोय माझी पेन्सिल बील
तिच्या मंदपनामुळेच अधिक वर्षे टिकतो आहे            लिहिताना धूळ लिहितीये आणि धूळ लैंड होण्यासाठी
                                                                               माझ्यात गवत शोधतीये

२. मित्रांना                                                               २. मित्रांना
माझी गोगलगाय सहन होत नाहिये                          माझी फुलपाखरे सहन होत नाहीत
त्यांना वाटतंय                                                        त्यांना वाटतय                                                        
असोशी बाईकच्या वेगाने धावायला हवी                   इच्छा बाईकसारखी धावायला हवी
मंदत्व हे अपयशच आहे                                          तिने फुलपाखरे टीप म्हणून देणे
त्यांच्या दृष्टीने                                                      हे त्यांच्या दृष्टीने रोमांटिक आहे
ते मला 'गतिमन्द ' समजतात                                 ते मला मतिमंद समझतात
आणि गोगलगायित भिरकावून बाईकवर                 आणि फुलपाखरात भिरकावून
बसून निघून जातात                                               बाईकवर बसून निघून जातात



३. त्यांच्या बाईक्स                                              ३. त्यांच्या बाईक्स
त्यांना रस्त्यावर आणतात                                    त्यांना रस्त्यावर उड़वतात तर माझी फुलपाखरे
तर माझी गोगलगाय मला गवतात घेऊन जाते       मला फुलांवर बसवतात


मी पृथ्वीला अनुकूल होत आहे. माझ्यासाठी          मी अस्तित्वाहुन हलका होतो आहे
ते पुरेसे आहे                                                        आणि निर्वाणरस ज्या फुलात आहे
                                                                           त्यावर बसण्यासाठी अनुकूल होतो आहे

                                                                          माझे हे रूपांतर
                                                                           मला कुठे घेऊन जाणारय
                                                                           हे मात्र अद्याप स्पष्ट व्हायचे आहे.



                                                     कविताकी जवानी 

१. एक जवानी आद्याक्षरात आणि अक्षरात एक                     १. कवितेचं फ़क्त अद्याक्षर उतरतय आणि  
संसर्गजन्य स्तब्धता                                                             कागदाची व्हर्जिनिटी स्तब्ध

२. एक अटेन्टिटीव शॉट हवाय दिग्दर्शकाला आणि                 २. पहिल्या ओळीचा  धिंगाणा  काही केल्या          तू पदर पाडत ओलेती                                                              सेटल होत नाहीये हात तुझ्या पदरासारखा                                                                                                      निखळतोय  खोलत                                                                                            

३. नेमका रस्ता काढत घामाचा बिंदू तुझ्या नीमगोऱ्या          ३. स्त्रोत सापडत नाहीये त्या 'खोल' तेचा  
मानेखाली                                                                            फ़क्त एक बोलबिंदू

४. नागडं तर व्हायचच  आहे                                                 ४. कपडे तर काढायचेच आहेत
आणि तुला ते माहीत आहे                                                     त्याशिवाय थोडीच कविता लिहून होणारय ?

५. एक देखावा - दाखल होतोय मर्त्य कावळ्यासारखा            ५. अनुभव कागदापाशी परतलाय पण त्याचा         मर्त्य कावळ्यासारखा                                                             पण त्याचा अविर्भाव  असा
त्याचे काम फ़क्त 'कोक '  लणे                                              "मी वाट चुकलोय "

६. त्याने तुझ्या चोळीत  हात घातलाय                                 ६. अनुभवलेलं बरचसं अकाली मरून जातं
तो सावल्या दाबतोय                                                               'अकाली दल
आणि तू त्यांचा प्रत्यक्ष देह असल्यासारखा                               प्रत्येकाच्या पाचविला !
प्रतिसाद देतीयेस


७. ब्लाउज काढायला दिल्यावर                                         ७. अनुभवाला कपडे काढून नागड़ा ओतावा कि
    तू अजंठा                                                                          त्याच्या कपड्यासकट
    आसपास फ़क्त ठणठणा                                                   कागदावर ओतावा  !

८. तुला बेडपाशी ओढ़त नेतोय                                          ८. अमर्याद डिझाईन्सचा कागद
    देखावा पुरुष                                                                         एक खोल आकाश              
    तारकांनी खिदळणारी आकाशगंगा                                     स्वतःचाच पाठलाग करत                                   तू तिच्यात स्वतःला पसरतीयेस                                           माइंडलेस उखाणा  आग लावतोय
                                                   

९. देखावापुरुष स्तन चोखतोय पण त्यापेक्षा प्रभावी        ९. काहीतरी उतरतय कागदावर पण ते ढग आहे की
तुझा पार्श्वआवाज हं हुं हं                                                धुकं ते स्पष्ट नाही


१०. मी विचार करतोय कि मी विचार करतोय                १०. मी सेक्स करतोय कि सेक्सचा मी सेक्स करतोय

११. तुझ्या नग़डेपणाची अन्थोलॉजी तयार होतीये         ११. भाषा कपडे काढ़तीये जे अंग उरेल ती कविता

१२. तुला फ़क्त खाट हलवून आत घुसल्याचा फील        १२. कविता अनुभवाला आत घेऊन कागद घुसळतीये
दिला जातोय आणि तुझा चेहरा असा जसा आख्खा        मी अनुभव आहे कि मी अनुभवाबरोबर आहे कि
देखावापुरुष तू गिळताना एन्जॉय करतीयेस                  मी अनुभवाच्या बाहेर आहे ?

१३. एक फ़िल्मी शांतता पसरलिये शॉटने                       १३. माझा माज उतरवला गेलाय मी देखावापुरुष
नंगरलेल्या तुझ्या अंगावर हे कमर्शिअल आहे कि            असल्यासारखा परततोय
रेडिकल ?    

 १४. तू पेमेन्ट घेऊन थेट माझ्या कागदातून बाहेर           १४. मी गलितगात्र होऊन कवितेला टायटल देतोय
पड़तीयेस तुझ्या पाठीवर टायटल 'कविताकी जवानी'       'कविताकी जवानी '




१. नेचर इज नॉट एट ऑल स्पिरिच्युअल                      १. गॉड इज नॉट नॅचरल 

२. कोणीतरी मरून कोळसे तयार केले                          २. ईश्वर काळ्या कोळश्यासारखा काळा ठिक्कर पडलाय

कोणीतरी त्यांना जाळून स्वतःला जीवंत ठेवतय           लोक त्याला कोळसा समजून जाळतील काय ?

३. निसर्गाला दयामाया नाही आणि ईश्वर निसर्गाला     ३.करुणा निसर्गाला ओलांडल्याशिवाय भेटत नाही
वाचवू शकत नाही                                                       करुणा प्रॅक्टिकल झाली तर कदाचित निसर्ग वाचेल

४. निसर्गाचा खून करणाऱ्याला नैसर्गिक म्हणावे का ?  ४. खून आध्यात्मिक नाही एवढे मी निश्चितपणे सांगू
                                                                                 शकतो

५. उत्क्रांति फार हिंसक होती आणि आहे                       ५. आत्मक्रांति अहिंसेत घडते

६. मी नैसर्गिक नाही                                                   ६. मी कैदेत नाही
पण निसर्गाच्या टांगात टांगा घालून चालण्याची          ' मी ' हीच कैद आहे
शिक्षा  मला देण्यात आलिये

७. हे वास्तव आहे                                                       ७. कधीतरी तुरुंगासकट उड़ेन
आणि मेंदु चालतोय तोवर ती अटळ आहे                     आणि माझा मेंदू गरुड़ासारखी कात टाकून नव्याने                                                                                          उड़ेल 

८. हे वास्तव आहे                                                       ८. आशा हा माझा शेवटचा शत्रू आहे
आणि त्यानंतर काहीच नाही                                       तो संपला कि 
हे दुःखदायक आहे                                                      हा मी उडालोच

९. सोसतोय                                                                ९. उडतोय






१. हातात असलेला पक्षी मला उडवून लवायचाय            १. ह्रदय अंगठ्यावर
माझी नजर उडत्या पक्ष्यावर आहे                                  उमटतय

२. हातात असलेला पक्षी माझ्याबाबत पझेसिव              २. पक्षी उडतायत त्यांची नजर  
झालाय इतका की                                                         माझ्या तळहातावर रहायल्या आलेल्या
मी त्याला कितीही उडवून लावलं तरी तो उड़त नहीं         ईश्वरी हृदयावर आहे

३. हे एक अभूतपूर्व दृश्य आहे                                        ३. माझा हात
समस्त कोल्हापुरकरांनी माल एक किताब दिलाय          खुनी आहे
'द म्यान विथ द गोल्डन बर्ड '                                         असा उडणाऱ्या पक्ष्यांना संशय आहे

४. अलीकडे मला शंका येतिये                                       ४. माझ्या नजरेनं
हा पक्षी आहे कि उत्क्रांत झालेला  डास                         उडणाऱ्यांची पिसे गळून पडतायत
                                                                                 आणि लोक म्हणतात  
                                                                                 'मी उडणाऱ्या पक्षांची पिसे मोजतो '

५. हातात असणाऱ्या गोष्टी नेहमीच का                       ५. उडणाऱ्या पक्षांना वाटतय
बोअर करतात ?                                                          मी हातातल्या पक्ष्यांशी एंगेज आहे


६. मी हातातलाच                                                        ६. कम्युनिकेशन गॅप आहे सर्वत्र आणि दुर्दैवाने माझा
उडण्याची विद्या शिकवतोय                                        दूसरा हात अद्यापही डुलकी घेतोय







१. चार बोटातून चार नदया वाहतायत आणि            १. वाळवंटातून चार बोटे वाहिली म्हणून थोडाच माझा
अंगठ्याला जाऊन                                                  अंगठा पाणी वटवणारय ?
हात साक्षर होतोय
काळजाचे महित नाही

२. तळण्यावर चरबी चढ़तिये रक्तवाहिन्या              २. उंट
इतक्या                                                                  पारदर्शक - खड़ा - तळहातावर

३. हातावर काय लिहिलय मी नशिबावर विश्वास      ३. मी उंटावर ये जा करुन थकलोय
ठेवणारा होणार कि कर्मवार भिस्त ठेवून                  त्याची पाण्याची पिशवी पाण्याचे जागतिक रहस्य आहे
स्वतःचे जीवन लिहिणार ?

४. तीन नक्षत्र दिसतायत मात्र आभाळाचा पुरवठा     ४. वाळुपासून संगणक बनतायत म्हणे पण त्याला             थांबलाय बहुतेक                                                     वापरणारा सेवटी हा हात आहे

५. प्रोलिटरियट माणसाला आयुष्याची निरर्थकता    ५. हात डोक्यापासून सुरु होतो बिनडोकांना ते कळत नाही 
परवडते का त्याच्यासाठी हा हात अर्थपूर्ण आहे          ते हातांना स्वयंभू समजतात

६. शेवटी सर्व काही अनुत्तरीतच राहते                     ६. संगणकाने तरी काय भले होणारय कही प्रश्न हाताच्या हस्तांतरे कितीही करा                                             अंतरावर उभे राहतील एवढंच






१. निर्माण काही होत नाही जे आहे                         १. नष्ट कधीच होत नाही  जे मरते 
ते निर्माण आहे                                                     ते फ़क्त एकमेकात विलिन होणारे तुकडे आहेत

२. निर्मिक नाही.                                                  २. नष्टच नाही
जो  आहे तो फ़क्त निर्माणाची इन टोटल                एकमेकात विलीन होणाऱ्या तुकड्यांच
सावली आहे                                                          इन टोटल ध्वनी आहे


३. आपण फ़क्त दरम्यान आहोत                          ३. शेवट शोधू नको. मध्य सापडला कि शोधण्याचाच अंत 
दरम्यानलेलो आहोत.                                         होईल
व्हाया दरम्यान डेस्टिनेशन दरम्यान







१. एक गोरा अमेरिकन काळ्यासारखा                    १. माझा काळ्या रंगाचा कॉम्लेक्स कितीकाळ माझा          
मस्त  ज़िम्म चाललाय                                          एफएसआय कमवणार