Friday, 16 June 2017




श्रीधर तिळवेच्या कविता 

एका मोबाईल श्वासाचाच रिंगटोन ऍडजस्ट करत स्वतःच फुफ्फुस ऐकतोय एक मोबाईल थंड जिभेने उच्चारतोय झाडांचा दुप्पट मृत्यू एक मोबाईल शॉर्टकट घेताना दुष्काळात अडखळतोय एक मोबाईल गर्भपेशीतून मैत्रिणीच्या चहाड्या करतोय एक मोबाईल आत्मविश्वास ठासून भरत लोणकढी ठासतोय एक मोबाईल प्लानेट  फॉर्मेशनच्या नव्या थेरीची रॅडिकल कानउघाडणी करतोय एक मोबाईल गयावया करत गर्द टेग्युलेट करतोय एक मोबाईल उंदीर आणि माणसांना आवडणाऱ्या समान वासांची यादी जाहीर करतोय एक मोबाईल माणुसकीच्या नावाने गळा काढत सेल्समनशिपची अतिशयोक्ति करतोय एक मोबाईल  सासूच्या मेकप कौशल्याची पाठीमागून निदानालस्ती करत आवाजाला साम्य टोन देतोय एक मोबाईल  पुअर परफॉरमन्सला फटकारतोय एक मोबाईल स्क्रॅप गोळा केल्यासारखा शब्द गोळाकरत हकीकत सांगतोय एक मोबाईल पोटॅन्शियल जखमेला टाळण्यासाठी खोटी प्रशंसा करतोय एक मोबाईल पुअर अपशकुनांच्या उन्हाळ्याला दोष लावतोय एक मोबाईल हृदयातील कुजबुजीला रोमॅन्टिक गारवा पुरवत प्रेम कबूल करतोय एक मोबाईल काळ्या त्वचेविषयीचा दुस्वास उघड उघड सांगतोय एक मोबाईल हुंदके देत भाषेला मूकपणे विरोध करतोय एक मोबाईल स्वतःच जंगलीपण झाडत आरोळ्या मारतोय एक मोबाईल पिनड्रॉप नकार पचवत आक्रोश करतोय एक मोबाईल शुक्राच्या कानात मंगळी पुरुषीपणाने किंचाळतोय एक मोबाईल आवाजाने आत्महत्या केल्यासारखा कुणाचा मृत्यू कळवतोय एक मोबाईल जनेटीक ऑर्डरचं पाठांतर करतोय एक मोबाईल सुगंधीत बांधकामाचं मोजक्या विटा रचत. कौतुक करतोय एक मोबाईल वाटचुकलेल्या कॉम्प्युटर सीम्युलेशनची खरडपट्टी काढतोय एक मोबाईल भाषेचे मोलीक्युलस जिभेत सापडल्यासारखा उच्चारशुद्धीचा आग्रह धरतोय एक मोबाईल Dignosess सापडल्यासारखे खबर कळवतोय एक मोबाईल अर्थ स्पष्ट करत मॅच्युअर होतोय एक मोबाईल मॅच्युअर होतोय एक मोबाईल घरातील माणसांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत धुळीत अडखळत बोलतोय एक मोबाईल घरातील माणसांना अप्रत्यक्ष उल्लेख करत धुळीत खडखळत बोलतोय एक मोबाईल एकाचवेळी दोन आवाजांना जेवणाचा आग्रह करत कोणी एक फ़सेलच अशी करतोय एक मोबाईल म्युझियममधल्या निळ्या हिऱ्यांची चोरचौकशी करतोय एक मोबाईल स्माईल स्ट्रीटवरील माईलस्टोनची आठवण करून देतोय एक मोबाईल बाबा बाबा करत नुकत्याच शिकलेल्या भाषेचा उच्चार करतोय एक मोबाईल कुजबुजतोय एक मोबाईल पुटपुटतोय एक मोबाईल फुंकरतोय एक मोबाईल न सापडलेल्या साईटवर खेकसतोय एक मोबाईल आयडियालॉजीचं शॉकिंग हिस्ट्री म्हणून खंडन करतोय एक मोबाईल भाषा ही माणसाचं उरलेलं शेवटचं अन्न असल्यासारखं खोकत खोकत शब्द गिळतोय एक मोबाईल निदान बोलून गप्प बसवावे म्हणून मोठ्याने आरडाओरडा करत ओरडतोय एक मोबाईल प्रश्न सहज कळल्यासारखे उत्तर देतोय एक मोबाईल करन्ट ट्रेन्डीविषयी तोतरे बोलतोय एक मोबाईल बायकोशी बोलताना जाणीवपूर्वक दार दोन वाक्यानंतर विषयांतर करतोय एक मोबाईल मोबाईल ह्या शब्दाचे स्पेलिंग पुन्हा पुन्हा सांगतोय एक मोबाईल ढगाची व्याख्या करतोय एक मोबाईल सूर्याला उगवण्याची वेळ देऊन ठरल्याप्रमाणे उगवण्याचा हुकूम देतोय एक मोबाईल शेअर्सची क्लीनिकल ट्रायल घेतल्याचा निर्देश करतोय एक मोबाईल समोरच्याचा आवाज ओळखता न आल्याने तोंडातल्या तोंडात बोलत त्याची आयडेंटी चाचपतोय एक मोबाईल spinal injuries मधून टोमणे मारतोय एक मोबाईल स्वतःच्या आयुष्याचे तात्पुरते भाषांतर करून ते कनवींस करतोय आणि मग आपणच केलेल्या वायफळ बडबडीने चकीत होतोय एक मोबाईल सरदारजींच्यावर घाबरत घाबरत विनोद करतोय एक मोबाईल एक मोबाईल नंबर मुखोद्गत करतोय एक मोबाईल भाषेत आयुष्य असल्यासारखं विधाने करतोय एक मोबाईल फाशीवर चाललेल्या कैद्यांचं पूर्ण वर्णन करतोय एक मोबाईल स्वतः घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटाविषयी बढाई मारतोय एक मोबाईल पुण्याविषयी उपरोधतोय आणि पुण्यात पुन्हा न येण्याचे वचन देतोय एक मोबाईल चंद्रावरचे दगड त्यांच्या अंगठीत असल्याची बतावणी करतोय एक मोबाईल  दुसऱ्या मोबाईल वरील मेसेज वाचत मुद्याला बगल देतोय एक मोबाईल कयामतीचे भाकीत करत सुस्कारा टाकतोय एक मोबाईल फक्त शिव्या देतोय एक मोबाईल एसएमएसबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय एक मोबाईल काल्पनिक विमाने उघडत शीळ घालतोय एक मोबाईल आलेला मेसेज मोठ्ठे डोळे करत वाचतोय एक मोबाईल तिन्ही बिलांविषयी विचारणा करतोय एक मोबाईल स्वतःच्या रूपावर रागावतोय एक मोबाईल रेंजला नावे ठेवतोय एक मोबाईल कस्टमर सर्वीस सेंटरबद्दल नापसंती व्यक्त करतोय एक मोबाईल आयुष्यभर मतिमंद राहण्याची शपथ घेतोय एक मोबाईल आयुष्यभर हुशारीनं वागण्याची शपथ घेतोय एक मोबाईल पोल्युशन फ्री घराची जाहिरात करतोय एक मोबाईल गणपतीचे स्तवन करतोय एक मोबाईल नोकरीचा लाईफस्पॅन वाढवण्याविषयी याचना करतोय एक मोबाईल डायबेटीवर शूगरफ्री उपाय सुचवतोय एक मोबाईल आसपासच्या लोकांना हटकत छदमीपणे हसत समोरच्याचे दात कानात घालतोय एक मोबाईल मंद हास्य करत बर्फ तोडतोय एक मोबाईल मुलांचे समालोचन करतोय एक मोबाईल गुलाबांविषयी नाकातून बोलत  माहिती देतोय एक मोबाईल नपुंसकतेविषयी बोंबाबोंब करत संभाषणतोय एक मोबाईल कमावलेल्या अंगठयाचे सांत्वन करतोय एक मोबाईल व्हायरसविषयी फक्त हावभावतोय एक मोबाईल फिदीफिदी हसत आयुष्यावर धरलेले दात स्पष्ट करतोय एक मोबाईल दंतकथा पटवून विज्ञानावर टीका करतोय एक मोबाईल वाघासारखा गुरगुरतोय एक मोबाईल  कसून खाकी प्रश्न विचारतोय एक मोबाईल सगळ्यांची गुपीत फोडत वादविवाद करत जांभई येऊ न देता कांनाना ऐकण्यास प्रवृत्त करत स्वतःचा जमेल तितका  उल्लेख करत अखंड बडबड करतोय ... ....


।। पहिला शेवट ।।
त्याला थेट काळजात गोळी घालून काळ निघून चाललाय आणि तो मरणापूर्वीची शेवटची बडबड सर्वत्र पोहचावी म्हणून हजारो मोबाईल्समधून निष्कान कर्णयोग साधत जीव पणाला लावू लोकांशी बोलतोय त्याला खात्री आहे लोक मरणापूर्वी तरी त्याला एकदा ऐकतील. तो बोलतोय. 
         आणि लोक त्याची ही शेवटची इच्छा सभा कधी संपतीये ह्याची वाट पहात कानावर हात ठेवून नेटमध्ये डुलक्या घेतायत. 

।। दुसरा शेवट ।।
मोबाईल बोलतायत बोलतायत बोलतायत भाषा पसरतीचे पसरतीचे कुटुंबनियोजन न करता  

भाषेचा स्फोट होतोय 
आणि भाषा मारतायत 

।। तिसरा शेवट ।।
मोबाईल बोलतायत आणि काळ त्यांना इतिहास जमा करत सर्वत्र पोस्टपेड  बील किती येणार म्हणून टेन्शनमध्ये उभाय 

।। चौथा शेवट ।।
आणि ज्ञानेश्वर हे नवीन अदभूत काय म्हणून चांगदेवाच्या वाघावर बसून त्यांना डोळे फाडून पाहतायत 
त्यांना प्रत्येक मोबाईलमध्ये एक रेडा दिसतोय 
आणि ते त्यांच्याकडून वैदिक मंत्र म्हणवून घेण्याची वेळ कधी येत ह्याची वाट पहात कतारमध्ये आहेत 

।। पाचवा शेवट ।।
सर्वत्र बारा वाजलेत 
सगळेच मोबाईल फक्त बोलतायत 
कुणालाच माहित नाही की रिसिव्हर एन्डला 
 मोबाईलवर कुणीच ऐकायला उपस्थित नाही 

।।  सहावा शेवट ।।
सगळे घड्याळ पहात शेवटचं बोलतायत 
सगळ्यांनाच माहित आहे 
आणखी बारा मिनिटांनी पृथ्वी नष्ट होणार आहे 
सगळे बोलत स्वतःचं बारावं साजरं करतायत 

।। सातवा शेवट ।।
प्रत्येक जण  शब्दां स्वार आहे 
सगळी व्हेहीकल्स नष्ट झालेत 
आणि प्रत्येक जण भाषा चालवत 
त्याच्या त्याच्या डेस्टिनेशनकडे पोहचतोय
  
।।  आठवा शेवट ।।
मोबाईल बोलतायत 
आणि नाहीच घडत नाहीये 
लोक काहीतरी घडावं म्हणून बोलतायत 

।। नववा शेवट ।।
मोबाईल 
ज्यांना एका जजने 
एक दिवसाच्या मौनव्रताची शिक्षा दिली होती 
मौनव्रत सोडतायत 
विंदा करंदीकर म्हणतायत 
"किंवा तोडतायत "

।। दहावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत 
आणि त्यांना लॉन्च केलेली कंपनी हवालदिल आहे 
प्रत्येक जण बोलतोय 
आणि टेक्नीकल डेफेक्टमुळे 
कुणी तिसराच ते ऐकतोय 
आणि चौथ्याला जे ऐकलं ते कळत नाही म्हणून 
कळतोय 
जे कुणी भलताच दहावा ऐकतोय 

।।अकरावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत 
आणि त्यांचा ब्लॅक अँड व्हाईट आवाज 
आणि कधी कलर्स मध्ये ट्रान्सफॉर्म होतोय 
ह्याची वाट पहात 
कलर डेलीव्हिजन पहातायत 


।।बारावा शेवट ।। 
सर्वत्र केऑस आहे 
ज्याचा ऑर्डरवर विश्वास आहे 
आणि ऑर्डर 
केऑस आपल्याला दुरुस्त करेल म्हणून 
भयग्रस्त आहे 

।। तेरावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत 
आणि रंगमंच वाट पाहतोय 
प्रेक्षक कधी कंटाळून निघून जातात त्याची 
त्याला मोबाईल मेकपरूममध्ये जाऊन 
काय गॉसिप्स करतायत
ह्याची विलक्षण उत्सुकता आहे 

।।चौदावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत 
आणि रिसिवर्स ऍण्ड 
हातात "रिसिवर्सर्स मॅनिफेस्टो " घेऊन 
क्रांतीसाठी नवी आयडियॉलॉजी शोधतायत 

।।पंधरावा शेवट ।।
सर्वत्र भाषा खेळ खेळतीये 
"भाषेसाठी भाषा "
भावना रिकाम्या होतायत 
त्यांना कुणीच इमोशनल कमीटमेन्ट देत नाहीये 
आणि संभावना 
फक्त आयटेमगर्लसारख्या पैसा वसूल नाचून 
नाहीश्या होतायत 

।। सोळावा शेवट ।।
मोबाईल बोलतायत 
आणि जे बोलत नाहीत 
ते वाट पाहतायत 
कधीतरी कुणीतरी राँग नंबर दाबेल 
आणि त्यांना राँग नंबर म्हणून 
अशी अनमिमेटेड ऐकण्याची फॅसिलिटी अवेलेबल होईल 









































Thursday, 15 June 2017

श्रीधर तिळवेच्या कविता
shriwahini monday
श्रीवाहिनी सोमवार
इंटरव्यू श्रीधर तिळवे ह्यांची बिल्डरशी बातचीत

एस   : हे शहर एका झाडासारखं होतं
          आता लॅण्ड नसलेल्या
          एस्केपर सारखं दिसायला लागलंय
          लॅण्डस्केप काढणारे हात
          आता बिसलेरी पिऊन साजरे करतात
          गहाळ झालेल्या नदीचे Beautiful structure
          वाळूच्या पावलांनी चालणारे संगणक
          प्लान करतायत "राहू इच्छिणारा माणूस "
            आणि बिल्डींगधारी
            Live Colour Pattern वर खूष
            Eco city च्या वावड्या उठूनही दशक झाले
             बांधकाम चालू आहे अजूनही ऍप्लिकेबल
             नितीन देसाईच्या स्टुडिओत जाऊन राहावं म्हंटलं
             तर तिथेही धुळीला मिळवणारे
             पोझिशन्स स्वीच ऑन स्वीच ऑफ करत
             प्रत्येकजण बांधतोय स्वतःच जग
             आख्खी सिटी प्लान करायला वेळ कुठाय
एस :     सगळं दारू चढल्यासारखं गर्दमध्ये धुंडल्यासारखं
              धुतल्या तांदळासारखे स्वच्छ राहू इच्छिणारे
            कोठाराबाहेर
            आपली बॉडी काही वैगुण्य वगैरे चाचपत
बी :      श्रद्धा बघता बघता उडून गेली
            बुद्धी बघता बघता उडून गेली
एस :    ज्ञानेश्वरांची दोन गावे
            दोन्ही वसलेली
            तरी ओसाडी संपेचि ना
            हा ओसाड भोसडा घेऊन कुठे जाऊ ?
            शेवटी पोकळी बिल्डिंगानी भरली
            आणि आता पोकळीलाही जागा नाही
बी :       इतकी भारतभरातून आलेली plural गर्दी
बी :      ज्याच्या त्याच्याकडे  ज्याचा त्याचा सर्वे प्लान
एस :     मग मीही बसलोच काही महिने अधून मधून
             इस्टेट एजन्टाचा धंदा टाकून - पैसे चणचणले
            तेव्हा त्याने पोट भरले
            पण pseudo style जशीच्या तशी
            अंगावर तिळासारखी
बी :     शेवटी बिल्डिंगा विकायला बांधल्या होत्या- विकल्या
एस :   त्यासोबत हे शहर विकायला बांधले होते का
           आणि ही मुलं
           ती कुणाला विकायला बांधले होते का
           आणि ही मुलं
           ती कुणाला विकायला बांधली  जातायत ?
बी :    Nothing is safe from crime
एस :   बिल्डिंगा बघून
          त्यात पाहणाऱ्याचं character कळत नाही
          मग घर मतलब क्या ?
बी :    Steel walls, Glass walls,
          Multivalency In Death
          Diverse Mixture of utilities
          Everything is malled
एस :   Mall until Death
बी :    "बाईसारखं टकाटक दिसणारं सेक्सी शहर बांधतोय
            श्रीधर तुझी तक्रार तरी कशाबद्दल आहे यार ?
             लूक ! आख्खी मुंबई सेटसारखी दिसत नाही काय ?"
एस :   "दिसतोय अवयक सुंदर
            पण एकत्रितपणे कुरूप - जागोजागी झोपड्पट्टीने नासलेली '
            "एकदा अख्ख शहरच रिसायकल करायला पाहिजे "
बी :       "हो पण रिसायकल करताना ते टिकेल ह्याची गॅरन्टी काय पेपरसारखं उडूनही जाऊ
               शकतं "
एस :     "मग पेपरवेट म्हणून  काय ठेवावं ? "
बी :       .. . . . . . . .  . .
एस :     " कविता ! चल आख्ख शहर बाग करू "
बी :      "पण बागा विकत कोण घेणार ? त्या फार महाग असतात यारा !"
   
Regular Internet   
               
On
Press
See
Click
Surf
Phone
Choose
Move
Download
Leave

Intimate Intelligence 
Chouthi Navata : S poetrical presentation Intimate Intelligence
Waiting for Science And  its medicine
Intimate Intelligence
An intro to poet :
        I would like to thank Mr. Shridhar Tilve to take birth in today's lecture with a legglance & handdance contexting entries and exits propelling superflat buildings in Marathi culture. Marathi is English word introduced by Dnyaneshwar some thing Kulkarni or Nadkarni I don't know surname. It indicates emerging of new cultural group branded as Saushthav in 1992 of enthusiastic Nonthingist defascinated by various postwar commodities which nurtured mentalities of shirts, pant, underwear committed by suicidal bodies and their nudies. As you know today all budies are nuddies and terrorist are scattering death in their metros against them culturing 93 blast per day broadcasting sympathy on pathetic level.
         Shridhar Tilve has two legs, two hand, one nose, two eyes & admits it publicly with his superflat style denouncing postmodern conceptuality. He can show highlights of his lifematches in his oneday poems. To understand his t-20 penis you must disregard  monolingual enanglement. Though is a Marathi poet who knows English very well he has some clear misunderstanding about every situational street. He performs his street play without stop and pause it is an aesthetic treat to watch him perverting anti. Selfish drama in computes, comics and imagerle without any real communication. He killed poetrykar who raped 10 poets and ate pars of their bodies. He turned out to be a poet when he was arrested by Marathi Police in 1996 for writing a poem "BANDHKAM CHALLU AHE" which some people feel obscene. Maha times reported that when he was arrested thousands of comics, photos, poems, videotapes were pilling up around his body hiding every window wall and door pathological problem in their culture to his vagiana (which is not real ) accusing him for spoiling young hightech Marathi generation by refreshing their sexual and violent sensibilities through his poems and criticism.
He reads science fictions
He watches Bollywoodies 
He regularly shops in malls 
He collects sub cultural gadgets 
He participates in telemarkets 
He talks introversively 
He scrutinizes his manhood 
He has tendency to transplant the vagiana of every woman in his own legs and feel criticism in manly manner with womannerism
Shridhar Tilve is not an exception
He negotiates complications masterly and exploites them to bridge the Margis the Deshis the Potis and the Jamatis. He is boycotted by his contemporaries whom he called "PAST FUCKERS"
It is not easy to return to your roots.
Many itme it becomes fake. To experience the fakeness he comes to his villagian roots & then returns to Mumbai.
To bear and to cope with McDonalds, Apples, Microsofts, Sonys, Samsungs with Wadapav is not an easy task as all other in FOREIGN.
To give Marathiness to 'self' in situated American Pop Culture is constructed as backwardness in this Mumbai- Structure and Shridhar Tilve is desructwring it by applying Dnyaneshwar in M. Tv. Clieche
So click on Shridhar Tilve
You will find authentic, hybrid, mixed, cosmopolitine
FAKE
BASTARD
who is constantly mongrealizing his marginality
Keeping Zero level involvement
Steady And Rood
That has created his brand Name 'Ronin Nude'










































Tuesday, 13 June 2017

उजूच्या कविता श्रीधर तिळवे नाईक

एक छोटीशी मुलगी
ह्या महाप्रचंड उद्यमनगरातून चाललीये

तिचे काळीज सश्याचे आहे 
आणि  ती कासवाच्या  पावलानी
नीटनेटकी नेमकी चाललीये

लोखंड आणि पोलाद
तिला विकावयाचे आहे
आणि परिसाच्या स्पर्शाने 
तिच्य कडे पाठ फिरवली आहे

मालक तिला आजही टॅलीत प्रचंड राबवणार आहे
आणि खाजगी कामगार आल्याने
मालक जे देतील ते ती निमूट स्वीकारणार आहे

तिच्या घामाविषयी
ह्या देशाला काहीच पडलेली नाहीये
आणि कम्युनिझमचे  तिने पायात घातलेली चप्पल
तुटून तुटून गेले आहे

खाजगी कामगार म्हणजे
तोंड सिंहाचे
आणि काम गाढवाचे

तिच्या डरकाळ्या तिचा पोटात विरुन  जातायंत
आणि तिची चिरंतन  भूक
तिला गाढव बनवून राबवणार आहे

तरीही ती हसतीये
आणि त्या हसण्याचा साधा जुजबी अर्थही
माझ्या हाताला कधी कळलेला नाही

हात  जे कविता लिहितात
आणि तिच्या घामात  झोपी जातात
***

मी सचीन तू सेहवाग
दोघांच्या  आत  ढाण्या  वाघ

आसपास मेलेले जंगल
त्याला हवीये मृतांची  दंगल

आपण खणखणीत दोघे जिवंत
दोघांनाही बनायचय अस्सल संत

तुझ्या ओव्यांनी  झाडांत  पहाट 
तुझ्या प्रेमाची वाऱ्यात लाट  

येऊ दे दोघावर कितीही संकटे
श्वासात  राहून घेऊ वादळाचे मुके

तुझी माझी पार्टनरशीप नाबाद
दोघांच्या स्कोअरमध्ये आनंदवन  आबाद
***

आयुष्याच्या पाचोळ्यातून
अस्तित्वाचे झाड निर्माण करणं
कुणाला साधलं ? -- तुला

घरांच्या भिंती कोसळताना
पेशींच्या विटा बनवून
नव्या भिंती  निर्माण करणं
कुणाला साधलं  ? -- तुला

तू आता ह्या क्षणी गोव्यात
गुलाबांनी जख्मी झालेल्या हातांनी
इतरांना मेंदी लावत असशील
आणि मी डी. जे च्या साऊंडस्केपमधून ह्या मुंबईत
ध्वनी गोळा करत
लोळागोळा झालेल्यांना स्टेप्स  स्टॅपल कश्या  करायच्या
ते शिकवत

तुझ्या डाव्या बाजूला असणारा फणस
तुला काटे दाखवत दाखवत
तुझ्या  कान- काळजात गरे उमलत ठेवण्याची
गोड करणी कुजबुजत असेल
आणि नागेशीच्या तळ्यात
कधीही राजहंस उतरत नाहीत
 ह्या वास्तवाने
तुझ्या मेंदूतली बदके उदासीत घुटमळत असतील

"आहे हे जग असे आहे राजू
आपण फक्त पॉझिटिव राहायचे
निगेटिवीटीने कधी पीके उगवतात काय ? "

बये
तुझ्या  सकारात्मतेच्या जमिनीच्या पाया
कुणी जन्माला घातला
हे  कोडे उलगडता उलगडता उलगडत नाहीये

मुलांची आत्यंतिक आवड असलेली तू
केवळ घटस्फोटित म्हणून अपत्यहिन

"उजू कोणीही निवड
आणि आई हो "

"नाही रे राजू
मुले कायदेशीरच हवीत
नाहीतर आयुष्य अनौरस होते "

तुझ्यासाठी तुला पटेल असा
कायदेशीर निर्व्यसनी नवरा कुठून आणू ?

दारूत झिंगत जाणारे पुरुषत्व तुला नको आहे
सिंगरेटीत मेंदू फुंकणारे पुरुष तुला मूर्ख वाटतात

सज्जन पुरुषांना तुझे घटस्फोटित असणे खटकते
त्यांना नवीन ताज्या मुली भेटतायत
आणि तुझे वय वजावटीत विखुरत चाललंय

"मला हवा तसा कुणी भेटेलच
कुठेतरी असेलच "

तू यश चोप्राची वाया गेलेली हिरोईन आहेस
कि सकारात्मक ऊर्जेचा अंतिम परिणाम आहेस ?

जग कायमच सुंदर बनवत जाणारे तुझे
मायाळू  पदर
कुठल्या कापसात उत्क्रांत झालेत ?

तुला फक्त चांगली हाऊसवाईफ बनायचे होते
आणि तू आमच्या घरात
हाऊससीस्टर बनून
अख्खे घर सांभाळते आहेस

कधी कधी वाटतं
आम्ही सर्वच तुझी मुलं आहोत
आणि तू आमची आई आणि मास्तरीण

तुझ्या सडेतोड बोलण्याचा तोल
मला भावतो
आणि कधी कधी माझ्या साधनेला तुझ्यात
शिवपार्वतीच्या समतोल गावतो

शिव पार्वती बहीणभाऊ असते  तर
ते आपल्यासारखे असते

तू हवेत पारिजातक सोडतीयेस
आणि माझ्या चौथ्या चक्रात
त्यांचा सडा पाडतोय

मी सुगंधलोय तुझ्या आठवणींनी
आणि ही मुंबई सिटी विचारतीये
"हा गजरा किती रुपयाला देणार श्रीधरभाऊ ? "
***

भूगोल म्हणजे टाकलेला इतिहास
आणि त्याचा जिवंत  रसरशीत पणा

मृत्यू म्हणजे भूगोल नाहीसा होणे

तुझी बॉडी तुझा भूगोल होती
आणि
आता ती नाहीशी झालीये

उरलेला इतिहास
आम्हाला इतिहास संशोधक बनवतोय

तू अशी होतीस तू तशी होतीस

वस्तुस्थिती एकच
तू नाहीयेस
***

परीक्षा घ्यायला मला कधीचं आवडलं नाही
मला सगळ कस सहज उमलल्यासारखं हवं होतं

परीक्षा द्यायला तुलाही कधी आवडलं नाही
तुला सगळ कसं सहज आल्यासारखं हवं होतं

पण सहज तर
आपल्या वाट्याला
खरीखुर्री फळंही आली नाहीत
आणि
दिवस तर नेहमीच परीक्षेसारखे उभे ठाकले

आज
प्रश्न पत्रिका विंडोतून फेकून द्यायच्या ऐवजी
तू स्वतःच विंडोतून उडी घेऊन
नाहीशी झालीयेस
आणि तुझ्यानंतर वाढलेल्या प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा पहात
अवघे घर नापास झालंय

आपण भारतीय
जबाबदाऱ्या आणि कर्तव्याच्यांकडे
आयुष्य गहाण टाकतो
आणि जगतो

आपण कायम दास अवस्थेत
पाश बनवणाऱ्या व्यवस्थेत

आपण सतत शूद्र असल्याचे फिलिंग घेत
आणि शूद्र म्हणून इतरांशी डीलिंग करत

तू अपवाद नव्हतीस
म्हणून तू
आयुष्यातला आयुष्यात वारलीस
***

मी एक गुंतागुंतीचे प्रकरण आहे
ज्याचे मुखपृष्ठ तू आहेत

जिंदगी है गर 'किताब
तो उसका नही है कोई बाप 

ना पुरुष  ना बाप 
म्हणून  पृथ्वीला ताप  

मौज हा माणसाचा  शेवटचा प्रताप आहे
आणि आपणा  दोघांनाही तो गाठावयचा आहे
*
शाळेत आपल्याला जुळी  भावंड समजायचे
कॉलेजात खुळी बहीण  भावाची जोडी

आणि आता
काटकोन त्रिकोण
ज्या ची  तिसरी  बाजू अदृश्य आहे

आपण रोज चौकौन काढतोय
आणि त्यात जुन्या गावाचे रिमिक्स पाहतोय
****
हातात गन असलेला पुरुष
महापुरुष वाटण्याचा काळ आलाय
आणि तुला हवाय असा नवरा
जो माझ्याप्रमाणे नलवार फेकून देईल
पण कोणत्याही क्षणी उचलायची  कळ राखेल

जो माझ्याप्रमाणे निर्व्यसनी  असेल
पण दारूच्या अड्यात थम्स अप पिईल

मी एक अपपुरुषाचा आदर्श निर्माण केलाय का ?

*

चिलम ओढणारे पुरुष तुझ्या पुढून जातायत

तुझ्या हातातला गुलाब त्यांना दिसत नाही

त्यांना हुक्काबार हवा आहे

***